Crum = Crumb
Crumb क्रम् n.--- तुकडा, मगज, चूर, गीर, चुरा.
Crumble क्रम्बल् v.t.--- कुस्करणे, चुरडणे, चुराडा होऊन पडणे, धासळणे.
Crumbly क्रम्ब्लि a.--- भुसभुशीत, धीसूळ, ढिला.
Crumple क्रम्पल् v.t.--- गुधडणे, चोळामोळा करणे.
Crunch क्रंच v.--- दातांनी रगडणे, चावून चुराडा करणे; पायांनी/चाकांनी चुराडा करणे, असा चुराडा करीत जाणे ; चेपणे, मालाने, चावा, रगडा, रेटा. कमतरतेची/चणचणीची/टंचाईची/खडखडाटाची/संकटाची/अटीतटीची/आणीबाणीची स्थिति.
Crupper क्रपर् n.--- घोड्याचा पुठ्ठा, खोगिरीची टुमची.
Crusade क्रूसेड् n.--- धर्मयुद्ध. v.i.--- मोठ्या त्वेषाने हल्ला करणे.
Cruse क्रस् n.--- लहान पेला.
Crush क्रश् v.t.--- ठेचणे, चेंदामेंदा करणे, जमीनदोस्त करणे. n.--- नाश, चुराडा.
Crust क्रस्ट् n.--- कवच, खपली, पोपडा. v.i.--- खपली धरणे.
Crusty क्रस्टी a.--- कठीण, कठोर, उद्धट, तापट.
Crutch क्रच् n.--- कुबडी, पांगुळगाडा. v.t.--- धिरा देणे.
Crux क्रक्स् n.--- दुर्गम/अवघड/कठीण गोष्ट. मुख्य/गाभ्याचा/कळीचा मुद्दा.
Cry क्राय् v.i.--- रडणे, ओरडणे, आक्रोश करणे. Full cry : पुरा पाठलाग, जोरदार पाठ पुरावा. Far cry: दीर्घ अंतर, मोठा फरक, मोठे परिवर्तन.
Crymotherapy क्राय्मोथेरपी n.--- = Cryotherapy.
Cryogenic क्रायोजेनिक् a.--- नीच तापमानासंबंधीचा. नीच तापमानात चालणारा/कार्यशील. नीच तापमान लागणारा.
Cryotherapy क्रायोथेरपी n.--- थंड तापमानाचे / तापमानात करण्याचे उपचार / उपचारपद्धति.
Cryptic क्रिप्टिक् a.--- बुचकळ्यात टाकणारा, विचित्र, चमत्कारिक, गूढ. a.--- सांकेतिक, गुप्त अक्षरांत / भाषेंत / खुणांनी इ. सुचविलेला/कळविलेला (संदेश, मजकूर, अर्थ इ.)
Cryptogram क्रिप्टोग्रॅम् n.--- सांकेतिक संदेश/वचन.
Crystal क्रिस्टल् n.--- काच, मणी, स्फटिक, बिलोर. a.--- निर्मळ, स्वच्छ, बिलोरी.
Crystallize क्रिस्टलाइझ् v.t./v.i.--- रवा पडणे, खडे बनणे.
Cub कब् n.--- पिल्लू, बच्चा, पेटा, छावा.
Cube क्यूब् n.--- घन, समभूज काटकोनचौकोनी घनाकृति. v.t.--- घन करणे, घणाचे रूप देणे.
Cubeb क्यूबेब् n.--- कबाबचीनी, कंकोळ, सुगंधमरीच.
Cube-root क्यूब्रूट् n.--- घनमूळ.
Cubic क्यूबिक् a.--- घन, घनाकार. घन (परिणामाचा), त्रिघात (परिणामाचा), त्रिघाती(हिंदी).
Cubicle क्यूबिकल् n.--- आडोसे/पडदा टाकून मोठ्या जागेत/दालनात बनविलेली छोटी जागा/स्वतंत्र खोली.
Cubit क्यूबिट् n.--- हात, गज (अठरा इंचाचा).
Cuboid क्यूबॉइड् a.--- काटकोनचौकोनाची घनाकृती = rectangular parrellelepiped.
Cuckold ककल्ड् n.--- कुलटा-पति.
Cuckoo कुकू n.---
Cucumber कुकंबर् n.--- काकडी, खिरा.
Cud कड् n.--- रवंथ, रोंथ, (स्वतःचा, तोंडातील) घास.
Cuddle कडल् v.---अंगाची गुंडाळी करून पडणे, कुरवाळणे.
Cuddly कड्लि a.--- वेटोळ्यात पडून राहणारा, कुरवाळण्याजोगी, गोन्जारण्याजोगी.
Cudgel कजेल् n.--- सोटा, टोणका. v.t.--- सोत्याने मारणे. ‘To take up the cudgels (for, on behalf of ): च्या बाजूने भांडणे, च्या वतीने वाद घालणे/लढा देणे, -लढा/संघर्ष पुकारणे.