Troika ट्रॉयका n.--- (रशियन पद्धतीची) बरोबरीने चालणाऱ्या तीन घोड्यांनी ओढण्याची गाडी. तिघान्चा गट, त्रिकूट.
Troll ट्रोल् n.--- जर्मनलोककथेतील बुटका किंवा दांडगा (भूत / राक्षस).
Troop ट्रूप् v.i.--- समूहाने / समूहासह जाणे / येणे. n.--- सैन्य, जमाव, मंडळी.
Trooper ट्रूपर् n.--- घोडेस्वार.
Trope ट्रॉप् n.--- रूपालंकार, रूपक.
Trophy ट्रॉफी n.--- जयचिन्ह. जयपुरस्कार, विजय-प्रतीक, विजयोपहार.
Tropic ट्रॉपिक् n.--- विषुववृत्तापासून उत्तरेस / दक्षिणेस २३ १/२ अंश अंतरावर असणारे विषुववृत्तास समांतर असे काल्पनिक वृत्त (सूर्याच्या दक्षिणोत्तर चालीची / क्रान्तीची मर्यादा दर्शविणारे क्रान्तिवृत्त. a.--- =Tropical.
Tropical ट्रॉपिकल् a.--- क्रान्तिवृत्तांतला.
Tropics ट्रॉपिक्स् n.--- क्रान्तिवृत्त. a.--- क्रान्तिवृत्ताचा.
Trot ट्रॉट् v.i.--- दुडक्या चालीने चालणे / फिरणे, धावता / झटपट दौरा करणे / फेरफटका मारणे, घोडा हांकणे. n.--- दुडकी चाल.
Troth ट्रॉथ् n.--- सत्य, विश्वास, भरंवसा.
Trouble ट्रबल् v.t.--- इजा / पीडा देणे, दुःख देणे, त्रास देणे. n.--- दुःख, पीडा, संकट, त्रास, तसदी, खटपट.
Trouble-shoot ट्रबल्-शूट् v.t.--- (अडचणी इ.) / -ना टिपणे / नष्ट करणे, -वर मात करणे.
Trouble-shooter ट्रबल्-शूटर् n.--- दोष / विकार / विवाद इ. शोधून इलाज करणारा तज्ज्ञ / मध्यस्थ / दूत.
Troublesome ट्रबल्सम् ad.--- त्रासदायक, खणपटीस बसणारा, पीडा देणारा. बोकांडी बसणारा, जिकीरीचा.
Trough ट्रॉफ् n.--- टांकी, द्रोण, डोण, कोटंबा, परात, थाळी, परळ.
Trounce = Thrash.
Troupe ट्रूप् n.--- (संगीत / नाटक-) मंडळी, समूह, संघ.
Trousers ट्राउझर्स् n.--- इजार, पायजमा.
Trousseau ट्रूसो n.--- वधूचा पोषाख, वधूच्या कपड्यांचा बस्ता.
Trove = Treasure-trove.
Trow ट्रो v.i.--- विश्वास ठेवणे, कल्पना करणे, वाटणे.
Trowel ट्रॉवेल् n.--- करणी. v.t.--- करणीने बनविणे.
Truant ट्रुअन्ट् a. & n.--- आळशी, उनाड, अनुपस्थित, गैरहजर. v.t.--- उनाडक्या करणे. To play truant --- कामचुकारपणा करणे; अंगचोरपणा करणे. (शाळा, कार्यालय इ. पासून) रजेवाचून अनुपस्थित राहणे).
Truce ट्रूस् n.--- मुदतीचा तह, तहकुबी; संधि, तह, युद्धबंदी.
Truck ट्रक् v.t.--- मालाची अदलाबदल करणे. n.--- अवजड सामान वाहून नेणारे, मोठे (४ वा अधिक चाकांचे) स्वयंचलित वाहन (पहा: ‘Lorry’). हमाल / प्रवासी इ. नी वापरायची सामान वाहून नेण्याची हातगाडी / / गाडा / ठेला(हिंदी). लहान लांकडी चाक, सामान नेण्याची गाडी (पहा: ‘Trolley’, ‘Barrow’); मोबदला, विनिमय. (पैशांऐवजी) मालाच्या / वस्तूच्या रूपांत दिलेली किंमत / मोबदला; देवघेव, देवाणघेवाण, व्यवहार, व्यावाहारिक संबंध. (पहा: ‘Barter’). v.t.--- ‘truck’ वर लादणे. ‘truck’ ने वाहून नेणे. To have no truck with : -शी कसलेही संबंध ना ठेवणे.
Truckage ट्रकिज् n.--- ‘truck’ -द्वारा वाहतूक / वहन. अशा वाहतुकीचे भाडे.
Truckle ट्रकल् v.i.--- नाक घासणे, दांती तृण धरणे, हांजी हांजी करणे.
Truculent ट्र(ट्रू)क्यूलण्ट् a.--- क्रूर, कठोर, उग्र, पोशवी.
Trudge ट्रज् v.i.--- पायपिटी करणे. n.--- पायपीट.
True ट्रू a.--- खरा, अस्सल, बरहुकूम, प्रामाणिक. ad.--- खरोखरी. True hearted --- खऱ्या अंतःकरणाचा, सात्विक.
Truffle(s) ट्रफल्(स्) n.--- भूगर्भात / भूस्तराखाली वाढणारी एक खाद्य बुरशी. एक प्रकारची मलई-प्रचुर चॉकलेटची मिठाई.
Truism ट्रूइझम् n.--- सरळ / साधे / क्षुल्लकसत्य. साधे / सर्वविदित / तत्व. स्वतःसिद्ध गोष्ट / स्थिति. स्पष्ट वस्तुस्थिति.
Truly ट्रूली ad.--- खरोखर.
Trump ट्रम्प् n.--- पत्त्याच्या खेळांतील हुकूम. अशा हुकमाचे पत्त्यांतील पान. विश्वासार्ह सामान्य माणूस. (पत्त्यांच्या खेळांत मारण्यासाठी) हुकूम खेळणे. v.t.--- (पत्त्यांच्या खेळांत) हुकूमाच्या पानाने अन्य पानास / ते पण खेळणाऱ्या खेळाडूस मारणे (म्हणजे त्यावर मात करणे). -वर मात करणे, -ला हरविणे / मागे टाकणे, -पेक्षा मोठा / महत्वाचा / प्रभावी असणे. ‘Trump up’ v.t.--- (आरोप इ.) -ला खोटेपणाने बनविणे / उकरून काढणे. (उदा. ‘Trumped up chaarges’ = बनावट आरोप).
Trumpery ट्रम्परी n.--- क्षुल्लक गोष्ट, पोरखेळ.
Trumpet ट्रम्पेट् n.--- तुतारी, कर्णा, शिंग. v.t.--- तुतारीच्या आवाजाने जाहीर करणे.
Trumpeter ट्रम्पेटर् n.--- कर्णा / शिंग वाजविणारा.
Trundle ट्रण्डल् n.--- घरंगळ, चाकाच्या आधारे सरकण्याची प्रक्रिया. (छोटे) चाक. v.--- घरंगळणे, सरकत जाणे, चाकाच्या साहाय्याने चालणे. घरंगळविणे, चाकाच्या आधारे चालविणे.
Trunket ट्रंकेट् n.--- छाटलेला. v.t.--- छाटणे.
Trunk ट्रंक् n.--- पेटी, संदूक, खोड, सोंड, धड.
Truss ट्रस् n.--- गठ्ठा, गुंडा, बिंडा. शरीरास (विशेषतः कंबरेजवळील भागास) आधार देणारे जाड वेष्टनाचे बंधन (अंतर्गळ इ. रोगासाठी). v.t.--- गठ्ठा बांधणे, गठडी वळणे.
Trust ट्रस्ट् v.t.--- विश्वास ठेवणे. n.--- विश्वास, भरंवसा, भरोसा, उमेद, आशा, ठेव, जिम्मा, हवाला, उत्तरदायित्व, जबाबदारी, उधारी. एका विशिष्ट विश्वासार्ह व्यक्तीवर दुसऱ्या विशिष्ट व्यक्तीच्या हितार्थ, वहिवाटीसाठी / व्यवस्थापनासाठी सोपवलेला, त्या दुसऱ्या व्यक्तीचा विशिष्ट साधनसंपत्तीमधील हितसंबंध. न्यास, अशी न्यासव्यवस्था. विश्वासाने सोपविलेला सुरक्षित ताबा. v.t.--- -वर विश्वास ठेवणे /भरंवसा करणे. (विश्वासाने) आशा / अपेक्षा करणे. v.i.--- भरंवसा धरणे, उधार देणे. a.--- ठेवणुकीचा.
Trustee ट्रस्टी n.--- जिम्मेदार, पंच, व्यवस्थापक. जीवर ‘trust’ सोपविला आहे टी व्यक्ति, विश्वस्त.
Trustworthy ट्रस्टव(र्)दी a.--- विश्वासार्ह, विश्वासपात्र.
Trusty a. / n.--- खात्रीचा, विश्वासू, भरंवशाचा. = Trustworthy (person)
Truth ट्रुथ् n.--- खरेपणा, प्रामाणिकपणा, खरे, सत्य.