Mea culpa
Mead मीड् n.--- मध, सातू, इ. चे मद्य. = Meadow (काव्यात).
Meadow मेडो n.--- कुरण, वावर. आर्द्र, सपाट, गवताळ भूप्रदेश. a.--- कुरणाचा.
Meagre मीगर् a.--- रोडका, तुटपुंजा, भरड, शुष्क, निरास, हलक्या दर्जाचा.
Meal मील् n.--- जेवण, पीठ. दळलेले धान्य (रवा, कण्या, इ.), एका वेळचे भोजन. भोजन (-क्रिया). Mealy मीलि a.--- पिठूळ.
Mean मीन् a.--- नीच, क्षुल्लक, अधम. v.i.--- अर्थ असणे, दाखवणे, असणे. क्षुद्रबुद्धीचा, हलकट.
Meaning मीनिंग् n.--- अर्थ, उद्देश, तात्पर्य, मानस.
Meaningful मीनिंगफुल् a.--- काही स्पष्ट अर्थ (म्हणजे भाव, लाभ, उपयोग) असलेला, अर्थपूर्ण, अर्थयुक्त (हिंदी: सार्थक).
Meander मिअॅण्डर् v.--- वळसे घेत जाणे, भरकटत जाणे.
Meanness मीन्नेस् n.--- हलकेपणा, नीचपणा, तुच्छता.
Means मीन्स् n.--- ऐपत, साधन, द्रव्यबल.
Meantime मीन्टाइम् n.--- =Meanwhile मिन्व्हाइल् n.--- मधला काळ. ad.--- मधल्या काळात.
Measles मीझल्स् n.--- गोवर (अंगावरच्या पुरळाने चिन्हित होणारा रोग).
Measly मीझ्ली a.--- गोवरासंबंधी; गोवराच्या पुटकुळ्यासारखा; ठिपक्यांचा / ठिपकेदार, अत्यल्प, क्षुल्लक, तुटपुंजा.
Measure मेझर् v.t.--- मोजणे, किंमत / परीक्षा करणे. n.--- माप, मेज, परिमाण, वृत्त, छंद. In a measure - एका अर्थाने, काही अंशात. Measure up to - -साठी पुरेसा पडणे, -पर्यंत पोचणे.
Measureless मेझर्लेस् a.--- अपरिमित.
Meat मीट् n.--- मांस, भक्ष्य, अन्न.
Mechanic मेकॅनिक् a.--- यंत्राचा, यांत्रिक. n.--- कारागीर.
Mechanics मेकॅनिक्स् n.--- यंत्रशास्त्र.
Mechanism मेकऩिझम् n.--- यंत्राची कळ, युक्ति.
Medal मेडल् n.--- पदक. v.t.--- पदक बक्षीस देणे.
Medalist मेडॅलिस्ट् n.--- पदके करणारा / मिळविणारा.
Medallion मेडॅलियन् n.--- एखादा ऐतिहासिक महत्वाचा प्रसंग / घटना, एखाद्या व्यक्तीची थोरवी इ. चित्रित / लेखबद्ध करणारे मोठे पदक / पट / पट्ट.
Meddle मेडल् v.i.--- मध्ये पडणे, हात घालणे, लुडबुडणे, शिरणे, पडणे, अडमडणे.
Meddling मेडलिंग् a.--- लुडबुड्या, लुबरा, लांडा कारभारी.
Meddlesome मेडल्सम् a.--- लुडबुड्या, लडबड्या.
Media (‘Medium’ चे अनेकवचन) माध्यमसमूह, जनसंपर्कमाध्यमें, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ.).
Mediacare n.--- औषधोपचार, वैद्यकीय उपचार.
Mediaeval मिडीव्हल् a.--- = Medieval
Mediate मीडिएट् v.t.--- मध्यस्थी करणे, मध्ये असणे, मध्ये पडणे. a.--- मध्यम, मध्यस्थ, अप्रत्यक्ष.
Mediation मीडिएशन् n.--- मध्यस्थी, मध्ये असणे.
Mediator मीडिएटर् n.--- मध्यस्थ, मध्यस्थी करणारा.
Medic मेडिक् n.--- = Medico
Medical मेडिकल् a.--- वैद्यकीचा, वैद्यकीय.
Medicare मेडिकेअर् n.--- औषधोपचार, वैद्यकीय उपचार.
Medicate मेडिकेट् v.--- औषधोपचार करणे.
Medication मेडिकेशन् n.--- औषधोपचार.
Medico मेडिको n.--- वैद्य, वैद्यकीय व्यवसाय करणारा. वैद्यकाचा विद्यार्थी.
Medicine मेडिसिन् n.--- औषध, दवा, वैद्यशास्त्र.
Medieval / Mediaeval मिडीव्हल् a.--- मध्ययुगा (Middle Ages) चा / सारखा, मध्ययुगीन.
Mediocre मीडिओकर् a.--- सामान्य, मध्यम.
Meditate मेडिटेट् v.t.--- विचार / चिंतन करणे, योजणे.
Meditation मेडिटेशन् n.--- ध्यान, चिंतन, योजना.
Meditative मेडिटेटिव्ह् a.--- ध्याननिष्ठ, विचारी.
Mediterranean मेडिटरेनिअन् a.--- भूमध्य.
Medium मीडिअम् n.--- मध्यम परिमाण, साधन, योग.
Medulla मेडला n.--- भेद, मज्जा, गीर, गर.
Medulla Oblongata मेडला आॅब्लाँगाटा n.--- पाठीच्या कण्याचा मेंदूत शिरलेला भाग.
Medullar मिडलर् a.--- मेंदूसंबंधी, मज्जासंबंधी.
Meed मीड् n.--- फळ, सार्थक, बक्षीस, इनाम, किंमत.
Meek मीक् a.--- गरीब.
Meekness मिकनेस् a.--- गरीबी, लीनता.
Meet मीक् v.t. and v.i.--- भेटणे, गांठ पडणे, मिळणे, जमणे, भेटाभेट होणे, एकत्र जमणे. a.--- योग्य, हुशार, साजेसा, उचित.
Meeting मीटिंग् n.--- भेट, सभा, संगम, बैठक, मजलस.
Meetness मीट्नेस् n.--- योग्यता.
Mega मेगा (स्वरापूर्वी Meg) (शब्दास जोडले जाणारे उपपद) मोठा, मिलियन् (म्हणजे दशलक्ष) पटीचा.
Megahertz मेगाहSर्ट्स् n.--- (संक्षेप: MHz) (pl. Megahertz) प्रतिसेकंदास एक-दशलक्ष हे विद्युच्चुंबकीय लहरी इ. चे आवर्तनामान मोजण्याचे माप.
Megalomania मेगॅलोमेनिया n.--- मोठ्या गोष्टीचे वेड, स्वतःच्या मोठेपणाबद्दलची मनोविकृति, आत्मप्रौढीचे वेड.
Megrim मीग्रिम् n.--- तीव्र डोकेदुखी (विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागाची). अर्धशिशी.
Melancholia मेलंकोलिया n.--- = Melancholy (n.)
Melancholy मेलंकलि a.--- शोकाचा, खिन्न, विषण्ण. n.--- खेदाची / उदासतेची / विषण्णतेची अवस्था / विकृति, विषाद.
Melange मेलान्ज् n.--- भेसळ, खिचडी, मिसळ, गर्दी, गण, चय, पुंज.
Melanin मेलॅनिन् n.--- केसांना / त्वचेला रंग देणारे शरीरांतील गडद तपकिरी द्रव्य.
Melanism मेलनिझम् n.--- त्वचेखाली / केसांत काळ्या रंगाच्या अति वाढीमुळे येणारा काळेपणा, कृष्णवर्ण.
Meld मेल्ड् v.t. and v.i.--- मिसळणे, एकत्र बांधणे, संघटित करणे.
Meliorate मिलिओरेट् v.t.--- नीट करणे, सुधारणे.
Mellifluence मेलिफ्लुएन्स् n.--- मधुस्त्राव, अजस्त्राव.
Mellifluent / Mellifluous मेलिफ्लुअण्ट् / मेलिफ्लुअस् a.--- मधुस्त्रावक, मधुस्त्रावसदृश; मधुर, गोड.
Mellorism James Sully या लेखकाने ‘Pessimism’ नामक ग्रंथांत वर्णिलेला, दुःखप्रधान संसारात कर्मत्याग ना करतां दुःख होईल तितके कमी करणाऱ्या (सकाम) कर्माचा पुरस्कार करणारा एक पंथ (टिळककृत ‘गीतारहस्य’- प्रकरण १५ पहा)
Mellow मेलो v.t.--- पिकविणे, सौम्य करणे, शमविणे. a.--- पिकून मऊ झालेला, मृदुल, कोमल, सौम्यमधुर, शांत, सौम्य.
Melodious मेलोडिअस्
Melodrama मेलड्राम n.--- भावनाप्रधान प्रसंगांनी भरलेले (सुखांत) नाट्य. सनसनाटी कथानकाचे भावप्रधान (आनंदपर्यवसायी) नाट्य.
Melody मेलडि n.---
Melon मेलन् n.--- खरबूज. Watermelon - कलिंगड, टरबूज.
Melt मेल्ट् v.t. and v.i.--- वितळणे, रस करणे / रस होणे, पान्हा फुटणे, पान्हा आणणे, पाझरविणे, द्रवणे.