Ang-Ans

Angel एन्जेल् n.--- देवदूत, अप्रतिम.
Angelic अॅन्जेलिक् adj.--- देवदूतासमान, देवदूतसंबंधी, दिव्य, दैवी.
Anger अॅङ्गर् n.---राग, कोप, क्रोध. v.t.--- राग आणणे.
Angina (= Quinsy) अॅन्जिना / अॅन्जाइना n.--- श्वासरोधासह होणारी तीव्र उरोवेदना. (पूर्ण संज्ञा : Angina pectoris; pectoris = छातीचा)
Angio- अॅन्जायओ / अॅन्जिओ --- ‘शरीरगत बलिका’ या अर्थाचे उपपद.
Angiogram अॅन्जियोग्राम् n.--- क्षकिरणांना अभेद्य द्रव्य रक्त आदि शरीरद्रव्यांत मिसळून तद्द्वारा शरीरातील (रक्त इ. च्या) वाहीनांतील वस्तुस्थितीचे विकरण चित्र.
Angiography अॅन्जियोग्राफी n.--- ‘Angiogram’ काढण्याची प्रक्रिया.
Angioplasty अॅन्जियोप्लास्टी n.--- संकुचित झालेल्या/चरबीयुक्त द्रव्यांनी तुंबलेल्या (म्हणजेच Atherosclerosis झालेल्या) रक्तवाहिन्यांना त्यांत घुसविलेल्या लवचिक द्रव्याच्या फुग्याने रुंद करण्याची (व तद्द्वारा रक्तप्रवाह मोकळा/सुरळीत करण्याची) उपचारप्रक्रिया.
Angle (for) अॅङ्गल् v.i.-- (साठी) खटपट/ छुपे प्रयत्न/आडमार्गाने यत्न करणे (eg. Sam Manekshaw promoted sycophancy and angled for post - retirement prospects), गाळाने मासे धरणे. n.--- कोपरा, कोन.
Anglicism अॅङ्ग्लिसिझम् n.--- इंग्रजी भाषेचा संप्रदाय.
Anglicize अॅङ्ग्लिसाइझ् v.t.--- इंग्रजी भाषेच्या रीतीप्रमाणे करणे, इंग्रजीकरण करणे.
Angrily अॅन्ग्रिली ad.--- रागाने.
Angry अॅन्ग्रि a.--- रागाचा, रागावलेला, क्रुद्ध.
Angst अॅंग्स्ट् n.--- चिंता, विवंचना, (भव-) भय (संसार) दुःख, (Anguish +Anxiety).
Anguish अॅङ्ग्विश् n.--- पीडा, दुःख, व्याधि, यातना.
Angular अॅङ्ग्युलर् a.--- साकोण, कोनाचा, कोनाकार.
Angularity अॅङ्ग्युलॅरिटी n.--- सकोनता, वक्रपणा .
Anight अॅनाइट् ad.--- रात्री, रात्रौ, रात्रीस.
Animadversion अॅनिमॅड्व्हर्शन् n.--- दोष, दोषारोप.
Animadvert अॅनिमॅडव्हर्ट् v. t.--- दोष लावणे.
Animal अॅनिमल् n.--- प्राणी, जंतु, पशु. a.--- प्राण्याचा.
Animal-food अॅनिमल्-फूड् n.--- मांसान्न, “Animal” ला लागणारे अन्न.
Animal-function अॅनिमल्-फंक्शन् n.--- प्राण्याचा व्यापार.
Animal-life अॅनिमल्-लाइफ् n.--- प्राण्याचे जीवन.
Animal-cular अॅनिमल्-क्युलर् a.--- क्षुद्र जंतूसंबंधी.
Animalcule अॅनिमल्क्यूल् n.--- लहान जीवजंतु.
Animate अॅनिमेट् v. t.--- सजीव करणे, चेव आणणे.
Animated अॅनिमेटेड् a.--- जिवंत, सजीव, सतेज, उल्लसित.
Animation अॅनिमेशन् n.--- चेव, उठावणी, तेज, चैतन्य, जिवंतपणा.
Animism अॅनिमिसम् n.--- सृष्टीतील सर्व नैसर्गिक वस्तु/घटना सचेतन/संवेदनशील शक्ति घडवीत/चालवीत असतात असे मानणारा पंथ, एका प्रकारचा आधिदैवत/आधिदैविक पंथ.
Animist अॅनिमिस्ट् n.--- Animism चा पुरस्कर्ता/अनुयायी.
Animistic अॅनिमिस्टिक् adj.--- Animism संबंधीचा/च्या स्वरूपाचा
Animosity अॅनिमाॅसिटी n.--- वैरभाव, अदावत.
Animus अॅनिमस् n.--- भावना (विशेष करून विरोधी) उत्पन्न करणारी प्रेरणा, पूर्वग्रह, अढी.
Anise अॅनिस् n.--- बडिशेप, शेप, शोप.
Ankle-bone अॅन्कल्बोन् n.--- घोट्यातले हाड.
anklet अॅङ्कलेट् n.--- वाळा.
Anna अॅना n.--- आणा, गंडा (पैशांचा).
Annals अॅनल्ज् n.--- वार्षिक वृत्तांत, ऐतिहासिक लेख.
Anneal अॅनील् v. t.--- तापवून गरम करणे.
Annex अॅनेक्स् v. t.--- सामील करणे, जोडणे. n.--- पुरवणी.
Annexed a.--- सामील केलेला, नवीन जोडलेला.
Annihilate अनायहिलेट् / अनायअलेट् v. t.--- मागमूस मोडणे, नाहीसे करणे.
Anniversary अॅनिवर्सरी n.--- प्रतिवार्षिक दिवस, जयंति, वार्षिकोत्सव, वार्षिक विधि. --- of birth -- वाढदिवस. --- of a death - मृततिथि, a.--- वार्षिक, प्रतिसांवत्सरिक.
Annotate अॅनोटेट् v.t.--- टीका-भाष्य करणे.
Annotation अॅनोटेशन् n.--- टीप, टीका, भाष्य, व्याख्या.
Annotatorअॅनोटेटर् n.--- टीकाकार, भाष्यकार.
Announce अॅनाॅउन्स् v.t.--- प्रसिद्ध/जाहीर करणे.
Annoy अॅनाॅय् v.t.--- त्रास/दुःख देणे,छळणे, अस्वस्थ करणे.
Annoyance अॅनाॅयन्स् n.--- त्रास, छळ, उपद्रव, क्षोभ, अस्वस्थता.
Annoyer अॅनाॅयर् n.--- दुःख देणारा, दुःख करणारा.
Annual अॅन्युअल् a.--- वार्षिक,सालाबादी.
Annually अॅन्युअलि ad.--- दरसाल, प्रतिवर्षी.
Annuitant अॅन्युइटन्ट् n.--- वर्षासनी, वर्षासनवाला.
Annuity अॅन्युइटी n.--- वर्षासन, वार्षिक नेमणूक.
Annul अनल् v.t.---रद्द करणे, मोडून टाकणे, अवैध करणे.
Annular अॅन्युलर् a.--- कंकणाकार, मंडलाकार.
Annunciate अॅनन्शिएट् v.t.--- खबर/वर्तमान आणणे.
Annunciation अॅनन्सिएशन् n.---जीजसच्या अवताराची गॅब्रिएल् देवदूताने मेरीस उद्देशून केलेली घोषणा. त्या घोषणेचा दिवस. त्याचा उत्सव.
Anodyne अॅनोडाइन् n.--- दुःखशामक, उपशामक वेदनाहपरी.
Anoint अॅनाॅइन्ट् v.t.--- माखणे, तेल-उटणे लावणे, अभिषेक करणे, अभ्यंग करणे, अभिषेकादि विधीने पीठावर/सिंहासनावर बसविणे.
Anointment अॅनाॅइन्ट्मेन्ट् n.--- उटणे, अभ्यंग.
Anomalous अॅनाॅमलस् a.---सम्प्रदायाविरुद्ध.
Anomaly अॅनाॅमली n.सम्प्रदायाविरुद्ध गोष्ट, व्यभिचार. वैलक्षण्य.
Anomic अॅनॉमिक n.--- अराजकाचा, अनागोंदी, स्वैराचाराचा.
Anomy अनाॅमी n.--- अराजक, नीतिहीनता, अधर्म, अंदाधुंदी, स्वैरता, स्वैराचार.
Anon अॅनाॅन् ad.---
Anonymous अॅनाॅनिमस् a.---
Anorexia अॅनोरेक्सिया n.--- अग्निमांद्य.
Anorexic अॅनरेक्सिक् a.--- अग्निमांद्य झालेला, मन्दाग्नि, अग्निमांद्यसंबंधी.
Anorexy अॅनोरेक्सि n.--- अग्निमांद्य, क्षुधाभाव.
Another अनदर् a.--- वेगळा, निराळा, दुसरा.
Anoxia अॅनाॅक्सिआ / अनाॅक्सिआ n.--- प्राणवायू(oxygen) चा अपुरा पुरवठा.
Answer अॅन्सर् v.t.--- उत्तर/जाब देणे, खंडण करणे, निर्वाह करणे, प्रमाणाने/बरोबरीने असणे, प्रतिकार करणे, जबाब देणे, ओ म्हणणे, दोष उडविणे, प्रतिशब्द करणे, काम पडणे, उलट गोष्ट सांगणे.
Answerable अॅन्सरेबल् a.--- उत्तर देण्याजोगा, जुळण्याजोगा, जबाबदार.