Peon पीअन् / पीआॅन् n.--- पट्टेवाला शिपाई, चपराशी. v.t.---
People पीपल् v.t.--- लोकवस्ती करणे, वस्ती करून राहणे. n.--- लोक.
Pep पेप् n.--- उत्साह, उमेद, सफुर्ति. v.t.--- प्रोत्साहित करणे, -ला सफुर्ति देणे. (past tense / past participle : Pepped)
Pepper पेपर् n.--- मिरे. v.t.--- मिरी घालणे, चेंचणे.
Peppermint पेपर्मिंट् n.--- पुदिन्याचा अर्क, पुदिना.
Peptic पेप्टिक् a.--- पाचक, अग्निवर्धक, शरीरातील पाचक रसांशी संबंधित.
Per पर् prep.--- दर, प्रत्येक, ने. Per se --- केवळ स्वतःहून, अन्यनिरपेक्ष.
Peradventure पर्अॅड्व्हेन्चर् ad.--- कदाचित. n.--- शक्यता. शंका, अनिश्चितता.
Perambulate परॅम्ब्युलेट् v.t./v.i.--- फिरणे, मधून फिरणे, (निरीक्षणासाठी / लक्ष ठेवण्यासाठी) फेऱ्या मारणे / फिरणे.
Percept पर्सेप्ट् n.--- प्रत्यक्ष-प्रमाणा-नुभूतीचा मनावरील संस्कार.
Perceptible पर्सेप्टिबल् a.--- इंद्रियाने समजणारा.
Perception पर्सेप्शन् n.--- इंद्रियज्ञान, चैतन्य, बोध, समज, प्रतिपत्ति, अवलोकनशक्ति. (हिंदी : अवबोधन).
Perceptive पर्सेप्टिव्ह् a.--- (चांगली / तीव्र) आकलनशक्ति / समज असलेला. जाणता, सुबुद्ध, सुज्ञ.
Perch पर्च् v.t.--- बसविणे. n.--- पक्षी बसण्याची काडी. v.i.--- बसणे.
Perchance पर्चॅन्स् ad.--- कदाचित ना कळे, ना जाणो.
Percipient पर्सिपिअन्ट् a.--- सचेतन, चेतन, ग्राहक, सुज्ञ, सावध, जागरूक.
Percolate पर्कोलेट् v.t.--- गळणे, गाळणे, पाझरणे.
Percussion पर्कशन् n.--- धक्का, आघात, प्रहार. ठोकून / आपटून (वाद्य) वाजविण्याची क्रिया. बडवून वाजविण्याचे वाद्य / अशा वाद्यांचा (वाद्यवृन्दातील) गट.
Perdition पर्डिशन् n.--- नरकवास, नाश, विनाश.
Peregrinate पेरिग्रिनेट् v.i.--- भटकणे.
Peregrination पेरिग्रिनेशन् n.--- (दीर्घ) यात्रा / भ्रमण / भ्रमंती / संचार. (एखाद्या विषयाचे) पद्धतशीर अवलोकन.
Peremptory पेरेम्प्टरि a.--- निखालस, जालीम, सक्त, कडक. जुलमी, उद्दाम, दांडेलीचा. अरेरावी.
Perennial पेरेनिअल् a.--- बारमाही, नित्य, सदाचा.
Perestroika पेरिस्त्रॉयका n.--- (रशियन शब्द) पुनर्निर्माण, पुनर्रचना / पुनर्जीवन, (संघटनेची / कार्यपद्धतीची) पुनर्घटना / फेररचना. (इ.स. १९८५ मध्ये कम्युनिस्ट हुकूमशाही मोडून काढणाऱ्या रशियन क्रांतीचे (Gorbachev या नेत्याने पुरस्कारिलेले) एक सूत्र.)
Perfect पर्फेक्ट् v.t.--- पूर्ण करणे, प्रवीण करणे, प्रगतावस्थेस, पूर्णावस्थेस नेणे. a.--- पुरा, पूर्ण, अव्यंग, निर्दोष, निष्णात, पारंगत.
Perfection पर्फेक्शन् n.--- पूर्णता, प्रवीणाता, सांगता.
Perfectly पर्फेक्ट्लि ad.--- पूर्णपणे, पुरा, पुरता.
Perfidious पर्फिडिअस् a.--- बेमान, निमकहराम.
Perfidy पर्फिडि n.--- दगा, विश्वासघात, लबाडी.
Perforate पर्फोरेट् v.t.--- भोक पाडणे, बोधणे.
Perforation पर्फोरेशन् n.--- भोक, वेध, रंध्र, छिद्र.
Perform पर्फॉर्म् v.t.--- प्रयोग करणे, बनवणे, सोंग घेणे.
Performance पर्फॉर्मन्स् n.--- कृति, काम, प्रयोग.
Performer पर्फॉर्मर् n.--- सोंग घेणारा, वाजवी, प्रयोग करणारा.
Perfume पर्फ्यूम् v.t.--- सुवास लावणे. n.--- सुवास, सुगंध, परिमल,सौरभ, सुवासिक द्रव्य.
Perfumed पर्फ्यूम्ड् a.--- गंधी, सुगंधी.
Perfumery पर्फ्यूमरि n.--- गंधी सामान, सुगंधी द्रव्य बनविण्याची जागा / व्यवसाय.
Perfunctory पर्फंक्टरि a.--- वरपांगी, अर्धवट, वरवर, उथळ.
Perhaps पर्हॅप्स् ad.--- कदाचित, ना जाणो.
Perimeter परिमिटर् n.--- (विशिष्ट क्षेत्राचा) सीमा (-रेषा) / हद्द(-रेखा), पारिमिति(-रेखा). परिमिति -क्षेत्र. घेर, घेरा.
Period पीरिअड् n.--- काळ, मुदत, मर्यादा, शेवट.
Periodic पीरिअॉडिक् a.--- नेमलेल्या मुदतीचा.
Peripatetic पेरिपटेटिक् n.--- अॅरिस्टॉटल् (Aristotle) च्या पंथाचा अनुयायी. a.--- हिंडत काम / व्यवसाय करणारा, फिरता (व्यावसायिक).
Peripheral पेरिफेरल् a.--- वरवरचा, बाह्यांगाचा, बहिरंगविषयक, बाह्यांगभूत, आनुषंगिक, गैरमहत्वाचा, किरकोळ.
Periphery पेरिफरि n.--- घेरा, चाळणीचा गाडा, वेड. बंद वर्तुळाकृतीचा घेर / परिघ.
Periphrase पेरीफ्रेज् n.--- द्राविडी प्राणायाम.
Periphrasis पेरिफ्रॅसिस् n.--- एका / कमी शब्दाऐवजी अधिक शब्दांत शब्दार्थ / अर्थ सांगण्याचा भाषिक अलंकार. पाल्हाळयुक्त / आढेवेढेयुक्त भाषण / वाचन.
Periphrastic पेरिफ्रॅस्टिक् a.--- ‘periphrasis’ -चा / -च्या स्वरूपाचा / -युक्त.
Periphrastic conjugation पेरिफ्रॅस्टिक् कॉन्ज्युगेशन् n.--- साह्यकारी शब्दांच्या मिश्रणाने / जोडणीने क्रियापदाची (धातूची) रूपे बनविण्याचा प्रकार.
Periphrastic future पेरफ्रॅस्टिक् फ्यूचर् n.--- साह्यकारी शब्दांच्या मिश्रणाने / जोडीने क्रियापदाचे भविष्यकाळाची रूपे बनविण्याचा एक प्रकार - (म्हणजेच) ‘लुट्-लंकार’ अथवा ‘अनद्यतन भविष्यकाळ ’ (‘ता-भविष्य’) या नावाचा संस्कृत व्याकरणातील एक भविष्यकाळ(-प्रकार).
Perish पेरिश् v.i.--- नाश पावणे, जीवास मुकणे.
Perishable पेरिशेबल् a.--- नाशवंत, क्षणभंगुर.
Peristalsis पेरिस्टॅल्सिस् n.--- शरीरांतील नलिकांशी संबद्ध स्नायूंची क्रमशः प्रसरणाकुंचनात्मक लहरीसारखी हालचाल ज्यायोगे नलिकांतील द्रव्य विशेष दिशेने सरकते.
Peristaltic पेरिस्टॅल्टिक् a.--- ‘Peristalsis’ -संबंधीचा / -स्वरूपाचा.
Peritoneal / Peritonaeal परिटोनियल् a.--- ‘Peritoneum’ -संबंधित.
Peritoneum / Peritonaeum परिटोनीयम् n.--- उदराच्या पोकळींतील आंतील स्रवणारा पृष्ठभाग.
Perjure पर्ज्यूअर् v.t.--- खोटी शपथ वाहणे, खोटी साक्ष देणे.
Perjurer पर्ज्यूरर् n.--- खोटी शपथ घेणारा.
Perjury पर्जरी n.--- खोटी साक्ष, खोटी शपथ.
Perk पS(र्)क् v.i.--- बारीक नजरेने पाहणे. n.--- (‘Perquisite’ चे बोलीभाषेतील संक्षिप्त रूप) (नोकरी इ. मध्ये) ठरवलेल्या मुख्य वेतना- / मोबदल्या- शिवाय मिळणारा अवांतर लाभ / सोय.
Perk up पS(र्)क् अप् v.t. / v.i.--- सुदृढ-उल्हसित करणे / होणे.
Perky पS(र्)की a.--- पुढे-पुढे करणारा; चुणचुणीत, चपळ.
Permanent पर्मनंट् a.--- नेहमीच, कायमचा, नित्य.
Permeate पर्मिएट् v.t.--- भेदून / पाझरून जाणे.
Permission पर्मिशन् n.--- परवानगी, मोकळीक, रजा.
Permit पर्मिट् v.t.--- परवानगी देणे. n.--- परवाना.
Permutation पर्म्युटेशन् n.--- अदलाबदल.
Permute पर्म्यूट् v.t.--- अदलाबदल करणे.
Pernicious पर्निशस् a.--- अपकारक, घातकी, विनाशी, प्राणघातक, जीवघेणा.
Peroneal पेरो- /-र- / नीअल् a.--- ‘fibula’- (पहा) -च्या संबंधीचा / जवळचा. (One of the exercises for treating the pain in knee is the exercise of peroneal stretch.)
Perpendicular पर्पेन्डिक्युलर् a.--- नीट, सरळ.
Perpetrate पर्पिट्रेट् v.t.--- (अपराध इ.) करणे.
Perpetual पर्पेच्युअल् a.--- नेहमीचा, नित्याचा, सतत, चिरस्थाई.
Perpetually पर्पेच्युअलि ad.--- नित्य, निरंतर.
Perpetuate पर्पेच्युएट् v.t.--- निरंतर चालणारे करणे.
Perpetuity पर्पेच्युइटि n.--- शाश्वति, स्थिरता.
Perplex पर्प्लेक्स् v.t.--- गोंधळ करणे, गुंतवणे.
Perplexity पर्प्लेक्सिटि n.--- घोटाळा, घोळ, गोंधळ.
Perquisite पS(र्)र्क्विझिट् n.--- खास हक्काची गोष्ट. = Perk (पहा).
Persecute पर्सिक्यूट् v.t.--- पाठीस लागणे, गाठणे, जाचणे, छळ करणे.
Persecution पर्सिक्यूशन् n.--- छळणूक, पिच्छा, छळ, जाच.
Persecutor पर्सिक्यूटर् n.--- छळणारा, पिच्छा पुरविणारा.
Perseverance पर्सिव्हिअरन्स् n.--- दीर्घोद्योग, नेट.
Persevere पर्सिव्हिअर् v.i.--- दीर्घोद्योग करणे, धीर धरून राहणे, आग्रह धरणे, दम काढणे. चिकाटीने / नेटाने / निष्ठेने काम करणे.
Persian पर्शिअन् n.--- फारशी / इराणी.
Persist पर्सिस्ट् v.i.--- (in) (बद्दल) आग्रह धरणे / अडून बसने. आग्रहाने / पुनःपुनः मांडणे; टिकून राहणे.
Persistency पर्सिस्टन्सि n.--- दीर्घप्रयत्न.
Persistent पर्सिस्टन्ट् a.--- दीर्घ प्रयत्न करणारा.
Persiflage पर्सिफ्लाज् n.--- थट्टा, मस्करी, हास्यविनोद, चेष्टा.
Person पर्सन् n.--- मनुष्य, अंग, वेष, आकृति, रूप, सोंग, (व्या.) पुरुष. In person --- साक्षात, स्वतः.
Persona पर्सोना n.--- मूळ लॅटिन अर्थ - (नटाचा) मुखवटा. व्यक्तिमत्व. Persona grata पर्सोना ग्रेटा n.--- (एका पक्षाने वकील, (राज)दूत, प्रातिनिधि इ. म्हणून प्रेषित व प्रेष्य पक्षास) मान्य व्यक्ति. Persona non-grata --- वकील इ.म्हणून अमान्य (झालेली) व्यक्ति.
Personable पर्सनेबल् a.--- सुरेख, देखणा.
Personage पर्सनेज् n.--- थोर गुणसंपन्न मनुष्य, आकार, (नाट्य इ. तील) पात्र.
Personal पर्सनल् a.--- मनुष्य जातीचा, खाजगी, खास.
Personalise / Personalize पर्सनलाइझ् v.i.--- -शी खासगी / वैयक्तिक संबंध जोडणे. -ला पूर्ण वैयक्तिक / खासगी करणे, (जडवस्तु इ.) -ला व्यक्तिरूप देणे, -ची तोतयेगिरी करणे.
Personality पर्सनॅलिटि n.--- व्यक्ति, व्यक्तीस उद्देशून बोल, माणूसपणा, माणूसकी, स्वत्व.
Personally पर्सनलि ad.--- खुद्द, जातीने, साक्षात्.
Personate पर्सनेट् v.i.--- तोतया बनणे, वेष घेणे.
Personification पर्सॉनिफिकेशन् n.--- चेतनधर्मरोप, मनुष्यगुणारोप, भलत्याचे नाव घेणे.
Personify पर्सॉनिफाय् v.t.--- चेतन / धर्मारोप करणे.
Personnel पर्सनेल् n.--- (विशिष्ट कार्य / संघटना इ. यांतील) मनुष्यबळ. अशा मनुष्यबळाची व्यवस्था पाहणारा विभाग.
Perspective पर्स्पेक्टिव्ह् n.--- देखावा, दुर्बिण. द्विमितियुक्त पृष्ठभागावर त्रिमितीय वस्तूचे / स्थितीचे प्रत्यक्षसदृश चित्रण करण्याची कला / कौशल. दृश्याच्या सर्व अंगाची परिमाणे, त्यांचे अन्य वस्तूंपासूनचे अंतर आदींचे (विशिष्ट दर्शकास, विशिष्ट दृष्टिकोनांतून / माध्यमातून इत्यादि) घडणारे दर्शन. = Vista. a.--- अशा दर्शनासंबंधीचा, असे दर्शन घडविणारा.
Perspicacity पर्स्पिकॅसिटी n.--- तीक्ष्ण दृष्टि, सूक्ष्म दृष्टि, तीव्र ग्रहणशक्ति, समझदारी, चाणाक्षपणा.
Perspicuity पर्स्पिक्युइटि n.--- स्पष्टता, सुबोधता.
Perspicuous पर्स्पिक्युअस् a.--- स्वच्छ, सुबोध.
Perspiration पर्स्पिरेशन् n.--- घाम.
Perspire पर्स्पायर् v.i.--- घाम येणें / निघणे / सुटणे.
Persuade पर्स्वेड् v.i.--- मन वळवणे, समजूत पाडणे / काढणे.
Persuasion पर्स्वेशन् n.--- समजूत, मत, मार्ग.
Persuasive पर्स्वेसिव्ह् n.--- वशीकरण, उत्तेजन.
Pert पर्ट् a.--- चपळ, धीट, फाजील, बेजबाबी.
Pertain पर्टेन् v.i.--- मालकीचे असणे, संबंध असणे.
Pertinacious पर्टिनेेशस् a.--- दुराग्रही, हट्टी, हेकट, दृढनिश्चयी, ठाम.
Pertinacity पर्टिनॅसिटी n.--- दृढनिश्चय, ठामपणा, दुराग्रह, हट्ट.
Pertinence पर्टिनन्स् n.--- समयोचितपणा.
Pertinent पर्टिनन्ट् a.--- समयोचित, प्रासंगिक, सुसंगत.
Pertness पर्ट्नेस् n.--- चलाखी, बेमुर्वत, धिटाई.
Perturb पर्टर्ब् v.t.--- सताविणे, घोटाळा करणे.
Perturbation पर्टर्बेशन् n.--- संताप, तळमळ.
Pertussis पर्टसिस् n.--- डांग्या खोकला.
Perusal पेरुझल् n.--- लक्षपूर्वक वाचन, पारायण, साद्यन्त वाचन.
Peruse पेर्यूझ् v.t.--- लक्षपूर्वक वाचणे, वाचून काढणे, पारायण करणे.
Pervade पर्व्हेड् v.t.--- वेढणे, ग्रासणे, पार जाणे.
Perverse पर्व्हर्स् a.--- वाकडा, खोडकर, हेकेखोर, विपरीतम, वस्तुस्थितीशी पूर्ण विसंगत, विरुद्ध, प्रमाणहीन.
Perversion पर्व्हर्शन् n.--- विपर्यास, विपरितार्थ.
Pervert पर्व्हर्ट् v.t.--- भ्रष्ट करणे, कुमार्गावर नेणे.
Pervious पर्व्हिअस् a.--- भेद्य, भेदनीय.