schadenfreude शाडन्फ्रॉइड n.--- दुसऱ्या व्यक्तीच्या दुर्दैवाचा/आपत्तीचा एखाद्याला वाटणारा आनंद.
schedule शेड्यूल्
schema स्कीमा n.--- योजना. (व्यवस्थेचा / योजनेचा) आकृतिबंध. चित्ररूपाने दर्शित मांडणी. (pl. Schemata)
schematic स्कि-/ स्की-/ मॅटिक् a.--- ‘Scheme’/’schema’ -बाबतचा /-च्या स्वरूपाचा.
schematize / Schematise स्कीमटाइझ् v.t.--- -ला योजनाबद्ध करणे, -ला चित्रबद्ध / आकृतिबद्ध करणे.
scheme स्कीम्
schemer स्कीमर्
schism सिझम्
schizophrenia स्कायझोफ्रीनिया / स्कित्सोफ्रीनिया n.--- आसमंताचे भान ना राहण्याची मनोविकृती, विक्षिप्तपणा, वेड. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची किंवा तिजपासून दूर जाण्याचे वेड. वस्तुस्थितीकडे तोंड फिरवून उदासपणे चिंताग्रस्त राहण्याचा मनोविकार; आसपासच्या व्यक्तींबाबत निष्कारण (तर्कदुष्ट) शत्रुत्व / संशय बाळगण्याची मनोविकृति.
schizophrenic स्कित्झफ्रेनिक् n.--- ‘Schizophrenia’ चा रोगी. a.--- ‘Schizophrenia’ संबंधी.
scholar स्कॉलर् n.--- विद्यार्थी, पंडित.
scholarship स्कॉलर्शिप् n.--- विद्यार्थ्यांची नेमणूक, विद्वत्ता, पांडित्य, ज्ञान, विद्या, शिष्यवृत्ति.
scholastic स्कोलॅस्टिक् a.--- शाळेचा, विद्यार्थ्यांचा.
scholasticism स्कोलॅस्टिसिझम् n.--- पारंपरिक पांडित्याचे / विद्वत्तेचे अंधानुसारण.
scholia स्कोलिआ --- pl. Of Scholium.
scholiast स्कोलिअॅस्ट् n.--- भाष्यकार, टीकाकार.
scholiastic स्कोलिअॅस्टिक् a.--- “Scholiast’ चा.
scholium स्कोलियम् n.--- (ग्रंथपृष्ठांच्या) बाजूस लिहिलेले टिपण. (pl. Scholia).
school स्कूल् n.--- शाळा, शिष्यवर्ग, शाखा, संप्रदाय, पंथ, विचारधारा.
school fellow स्कूल् फेलो n.--- शाळूसोबती.
school house स्कूल् हाउस् n.--- शालागृह.
schwa श्वा n.--- (शब्दकोशांत वापरली जाणारी) अत्यंत अस्पष्ट स्वरोच्चारदर्शक (जवळजवळ हलक्या ‘अ’ उच्चाराची, उलट्या ‘e’ (ə) रूपांतील खूण.
sciatic सायॅटिक् a.--- नितंब / त्यांतील मज्जारज्जू यांस अपायकारक. नितंबा(ischium)-चा /-संबंधीचा. n.--- नितंबप्रदेशांतील मज्जारज्जु (Sciatic nerve).
sciatica सायॅटिका n.--- नितंबांतील मज्जारज्जूंतील वेदनेचा आजार.
science सायन्स् n.--- शास्त्र.
scientific साएन्टिफिक् a.--- शास्त्र जाणणारा, शास्त्राप्रमाणे, शास्त्रीय.
scimiter स्किमिटर् n.--- तेगा, कट्यार.
scintilla सिण्टिला n.--- कण, अणु, रेणु.
scintillate सिण्टिलेट् v.i.--- ठिणग्या सोडणे, चमचमणे.
scion सायन् n.--- झाडाचे कलम, अंकुर, प्ररोह, कोम, वारस. शोषून / चोखून घेणारे उपकरण.
scissors सिझर्स् n.--- कातर, कात्री, कैची, कर्तनयंत्र.
sclerosis स्क्लिरोसिस् n.--- इंद्रियांच्या अतिकठिण होण्याचा विकार.
sclerotic स्क्लिअरॉटिक् n.--- नेत्रगोलाचे पुढील, पांढरे बाह्य आवरण.
scoff स्कॉफ् v.t.--- छी थू करणे. n.--- उपहास, टर, थट्टा.
scoffer स्कॉफर् n.--- छी थू करणारा.
scold स्कोल्ड् v.t.--- खरडपट्टी काढणे. n.--- कृत्या, कैकेयी.
sconce स्कॉन्स् n.--- किल्ला, झोपडी, खोपट, मेणबत्ती किंवा विजेचा दिवा ठेवण्यासाठी तीर/बेळके.
scoop स्कूप् v.t.--- कोरणे. ‘Scoop’ (वर वर्णित डाव) ने काढणे. (बातमी इ.) (आपली) खास / विशेष म्हणून (ठळकपणे) प्रसिध्दणे. n.--- खवणी, कोरणी, उलथणे. विशेषवार्ता. (रेती इ.) उचलण्याचे) खोरे / फावडे. (लोणी, दही, हिमदुग्ध, फळांचा गर इ.) काढण्याचा / वाढण्याचा डाव. कोरून / खोवून काढण्याची क्रिया. चकित करणारा खास वार्ताविशेष.
scoot स्कूट् v.i.--- झटकन निघून जाणे, सटकणे.
scooter स्कूटर् n.--- दोन पाठोपाठ लावलेल्या चाकावर एक पाय ठेवण्याची पट्टी व पुढील चाक वाळविण्याची दांडी बसविलेले मुलांचे खेळाचे वाहन. अशा प्रकारचे, तेल / वीज यावर चालणारे द्रुतगति हलके वाहन.
scope स्कोप् n.--- अवकाश, उद्देश, हेतु, ध्येय, कर्मक्षेत्र.
scorch स्कॉर्च् v.t.--- भाजणे, होरपळून निघणे.
score स्कोअ(र्) n.--- छेद, खाच, कातरा, खोबण, ओरखडा, रेखा, खूण. कारण, हेतू, खाते. खेळ, स्पर्धा इ. मध्ये स्पर्धक आदींनी मिळविलेले गूण / अश्या गुणांची नोंद. विसाचा गट. v.t.--- -ला कापणे / छेदणे, -मध्ये छेद / खाच करणे, -वर खाचांच्या खुणा करणे, (मोजणी इ. साठी) वरून रेघ ओढणे / रेघ ओढून खोडणे (बहुदा ‘out’ सह); ‘score’ करून जमा करणे, मिळविणे, लेखबद्ध करणे.
scorn स्कॉर्न् v.t.--- चा तीव्र तिरस्कार / तिटकारा करणे. n.--- तिटकारा, तीव्र तिरस्कार.
scornful स्कॉर्न्फुल् a.--- अवहेलनात्मक, तिटकाऱ्याचा.
scorpion स्कॉर्पिअन् n.--- विंचू.
scot स्कॉट् n.--- वर्गणी. Scot free --- वर्गणीशिवाय, धड, मोकळा.
scotch स्कॉच् v.t.--- कापून काढणे, छेदणे; जखमी करून अक्षम करणे; चिरडून /चेंचून टाकणे.
scoundrel स्काउन्ड्रेल् n.--- हरामखोर, लुच्चा, शठ.
scour स्काउर् v.t.--- धुंडाळाने, -ची झडती घेणे. घासणे, उजाळा देणे, धुऊन मळ काढणे. n.--- पुकळी.
scourge स्कर्ज् v.t.--- कोरडे मारणे. n.--- कोरडा, शिक्षा. (दैवी) कोपाचे) माध्यम.
scout स्काउट् v.i.--- हेरगिरी करणे; टेहळणी करणे. (सिद्धांत / तत्व / दावा) (क्रोधपूर्वक) झिडकारणे / फेटाळणे, Scout out / up --- -ला शोधून काढणे. v.t.--- -वर लक्ष ठेवणे. n.--- टेहळणी, नजर. (मुख्यतः on / upon / in the scout, to the scout असे प्रयोग). रॉबर्ट बेडन - पॉवेल (Robert Baden - Powell) (1857-1941 A.D.) याने इ. स. १९०९ मध्ये स्थापिलेल्या जागतिक स्तराच्या बालतरुणांच्या सदाचार-/ लोकोपकार- प्रवण नागरिक पुढारांच्या संघटनेचा (Boy Scout Movement) सदस्य. बालवीर, बालचर (हिंदी). n.--- हेर, गुप्त, दूत.
scowl स्काउल् v.t.--- डोळे वटारणे, झोम्बाझोम्बी करणे. n.--- आठ्या, क्रोधामुद्रा, अंधारी.