cheap चीप् a.--- स्वस्त, हलक्या किमतीचा/दर्जाचा.
chaepen चीपन् v.t.--- स्वस्त करणे. v.i.--- स्वस्त होणे.
cheapness चीप्नेस् n.--- सवंगता, स्वस्ताई.
cheat चीट् n.--- फसवण, ठक, फसव्या, लबाड, धूर्त, शठ, ठग, कपटी (माणूस/व्यक्ति) v.t.--- -ला फसविणे/ठकवणे/लुबाडणे.
chechen n.--- ‘Chechya’ प्रांताचा रहिवासी / नागरिक.
chechnya पूर्व युरोपातील रशिया-अंतर्गत (मुस्लिमबहुल) प्रांत.
check चेक् n.--- अटकाव, दाब, हुडी, (रंगीत) चौकडा/चौकटीचा नक्षा, अशा चौकड्यातील एक चौकोन. अशा चौकड्यांनी विणलेले कापड. Check in - (सामानघर, विश्रामगृह, इ. मधून सामान इ.) सोडणे/आणून ठेवणे/ ठेऊन घेणे. Check out - (सामानघर, विश्रामगृह, इ. मधून सामान इ.) घेऊन जाणे. गुणवत्तेबाबत तपासणे / पाहणी करणे, पारखणे. v.t.--- दांबात ठेवणे, थांबणे.
checker = Chequer चेकर् v.t.--- चित्रविचित्र करणे.
checkmate चेक्मेट् n.--- बुदबळातील मात.
cheeky चिकी a.--- उर्मट, उद्धट, घमेंडखोर.
cheese चीझ् n.--- चक्का, दही, खवा.
cheese-cake चीझ्केक्
cheeta(h) चीता n.--- , बिबळ्या वाघ (leopard) ची एक सडपातळ, चपळ जात. (चित्रक :संस्कृत).
chef शेफ् n.--- मुख्य आचारी, सूदमुख्य.
chemical केमिकल् a.--- रसायन -शास्त्राचा/-शास्त्रासंबंधी.
chemist केमिस्ट् n.--- रसायनशास्त्रवेत्ता.
chemistry केमिस्ट्री n.--- रसायनशास्त्र.
cheque चेक् n.--- हुंडी.
chequer (= Checker) चेकर् v.t--- विविध / (विशेषतः) दोन विरोधी रंगांच्या ठिपक्यांनी चित्रित करणे / राजविणे / अंकित करणे.
cherish चेरिश् v.t.--- उपासिणे, भजणे.
cheroot चीरूट् n.--- विडी, चुट्टा.
cherry चेरि n.--- एक जातीचे फळ, ‘Rose’ जातीची एखादी वनस्पती. अशा वनस्पतीचे लाकूड/फळ; हलका लाल रंग.
cherub चेरब् n.--- पंखधारी-बालक-रूपी एक देवयोनि, देवदूत, सुंदर मूल. सुंदर मुग्ध बालक, निरागस, मुग्ध. (pl. Cherubim)
cherubic चेरबिक् a.--- ‘Cherub’ सारखा, ‘Cherub’ च्या संबंधीचा/स्वरूपाचा.
chess चेस् n.--- बुदबळाचा खेळ, बुद्धिबळक्रीडा.
chess-board चेस्बोर्ड् n.--- बुदबळाचा पट / पाट.
chessman चेस्मन् n.--- बुदबळ, मोहरे.
chest चेस्ट् n.--- छाती, वक्षस्थळ, पेटी, संदूक.
chest-foundered चेस्ट्फाउन्डर्ड् a.--- उरी भरलेला.
chestnut चेस्ट्नट् n.--- एका जातीचे फळ.
chew च्यू v.t.--- चावणे, चघळणे, रवंथ करणे.
chic चिक् n.--- a.---- रुबाब(दार), ऐट(दार).
chicane शिकेन् n.--- डांवपेंच, छक्केपंजे, पाचपेंच.
chicanery शिकेनरी n.--- गारूड / लुच्चेगिरी.
chicken चिकन् n.--- कोंबडीचे पिल्लू.
chicken-hearted चिकन्हार्टेड् a.--- भित्रा.
chicken out चिकनाउट् v.i.--- पळ काढणे, (भिऊन) माघार घेणे.
chickpea चिक्पी n.--- चणा.
chickenpox चिकन्पॉक्स् n.--- कांजिण्या.
chicory चिकरी n.--- एक वनस्पति (तिचा कंद / मूळ) ( ज्या कंदमुळास भाजून / दळून कॉफीत मिसळतात किंव्हा कॉफी सारखे वापरतात).
chide चाइड् v.t.--- धमकावणे, तोंडाची शिक्षा देणे, -ची कानउघाडणी / निर्भत्सना करणे. (past tense : chid, chided; past participle : chid, chidden, chided)
chief चीफ् n.--- सरदार, अधिपति, मुख्य, प्रधान.
chiefly चीफ्लि ad.--- मुख्यत्वेकरून, प्राधान्येकरून.
childish चाइल्डिश् a.--- पोरकट, पोरस्वभावाचा.
childless चाइल्डलेस् a.--- असंतान, निपुत्रिक.
childlike चाइल्ड्लाइक् a.--- मुलासारखा, मुलास योग्य.
chili = Chilli
chill चिल् a.--- थंड, सर्द, थंडावलेला. v.t.----ला थंड करणे, नाउमेद करणे. n.--- थंडी, गारठा.
chilli चिली n.--- मिरची.
chilliness चिलिनेस् n.--- थंडी, हुडहुडी, हींव.
chilly चिली a.--- थंडावलेला, शीतल.
chime चाइम् n.--- ताळ, मेळ, एकनाद. v.i.--- ताल मिळणे. ‘chime with’ = ताळ/सूर जुळवून घेणे/देणे.
chimera (Chimaera) कि(काय)मीअरा n.--- असत्पदार्थ, असद्वस्तु, काल्पनिक वस्तु, सिंहाचे डोके, सापाचे शेपूट व बोकडाचा अन्य देह अशा रूपाचा पौराणिक राक्षस.
chimerical किमिरिकल् a.--- असम्भवनीय.
chimney चिम्नी n.--- धुराडे, धारे. ‘Chimney - corner’ = अग्निस्थानाजवळील गरम जागा / बैठक / आसन.
chimpanzee चिम्पॅन्झी / चिम्पॅन्झी n.--- मनुष्यांशी सर्वाधिक साम्य असलेली एक आफ्रिकी वानरजात.
chin चिन् n.--- हनुवटी.
chinarose चायनारोझ् n.--- शेवंती.
chincough चिन्कॉफ् n.--- डांग्या खोकला.
chine चाइन् n.--- कणा, कण्याचा भाग.
chink चिन्क् n.--- चीर, फट. v.t.--- छणछण वाजविणे.
chintz चिन्ट्झ् n.--- चीट, छीट, चिटाचे रंगी कापड.
chip चिप् v.--- प्रवास करणे, स्थलांतर करणे. ad.--- ‘When the chips are down’ = ऐन वेळी, मोक्याच्या वेळी, वेळ आली म्हणजे, घोडामैदान आले की. n.--- ढलपा, सालटा, कपरा. v.t.--- ढलपा काढणे, तासणे.
chip in चिपिन् v.--- हातभार लावणे; सहभागी होणे, पुस्ती जोडणे, मधेच बोलणे, शेरा मारणे.
chiro- (ग्रीक भाषेतून) ‘हात’ ह्या अर्थाचे उपपद.
chirology कायरॉलजी n.--- करपल्लवी भाषा.
chiromancer कायरोमॅन्सर् n.--- हात पाहणारा, सामुद्रिक.
chiromancy कायरोमॅन्सि n.--- हस्तसामुद्रिक.
chiropody शिरॉपडी / किरॉपडी n.--- पादचिकित्सा, चरणारोग्य शास्त्र. (पहा: ‘Podiatry’).
chiropractic कायरोप्रॅक्टिक् n.--- सांधे आणि विशेष करून पाठीचा कणा यांना सुव्यवस्थित करून (सरकलेल्या मणक्यांना हाताने योग्य जागी आणून) रोगोपचार करण्याची पद्धति. या पद्धतीने उपचार करणारा व्यावसायिक. a.--- ‘Chiropractic’ पद्धतीचा.
chiropractor कायरोप्रॅक्टर् n.--- ‘chiropractic’ चा उपचारकर्ता.
chirp चर्प् v.i.--- चिवचिवणे, किलकिलणे.
chiru चिरू n.--- तिबेटांतील एक हरिणांची जात (अंगावरील अत्यंत तलम व उबदार लोकरीसाठी प्रसिद्ध) (shahatoosh = ही लोकर). (भारतीय नियमांनुसार अवध्य पशु.)
chisel चिझल् n.--- किंकारे, विंधणे, टांकी, छन्नी, छेनी(हिंदी), छिलणी. v.t.--- किंकऱ्याने तोडणे,कोरणे, टांकी मारणे, फसविणे, कबाडीने कबाडणे.
chiseller चिझल(र्) n.--- लबाड / लुच्चा / लुबाडणारा धूर्त (माणूस).
chit चिट् n.--- चिठ्ठी, पोर, कोंब, मूल.
chitchat चिट्चॅट् n.--- बाता, गप्पा, बडबड.
chivalric = Chivalrous शिव्हल्रिक् a.---धीरोदात्त, अभिजात, दक्षिण, उदार.
chivalrous शिव्हल्रस् a.--- धीरोदात्त, अभिजात, दक्षिण, उदार.
chivalry शिव्हल्री n.--- शौर्य, दिलदारी, स्त्रॆजातिसंबंधी आदरबुद्धी.
chivvy चिव्ही v.t.--- -चा पाठलाग करणे, -च्या हात धूऊन पाठी लागणे, पिडणे, छळणे.