fife फाइफ् n.--- मुरली, पावा v.i.--- पावा वाजविणे.
fifer फायफर n.--- मुरली-वेणू वाजवणारा.
fifteen फिफ्टीन् a. & n.--- पंधरा.
fifth फिफ्थ् a.--- पांचवा, पांचवा भाग.
fifth Column फिफ्थ कॉलम n.--- बाह्य प्रतिस्पर्ध्यांशी /शत्रूंशी गुप्त संधान ठेवून त्यांचे हित साधूं पाहणारा राष्ट्र / संघटना यांमधील गट.
fifth-columnist फिफ्थ् कॉलम्निस्ट n.--- ‘Fifth-column’ मध्ये सामील व्यक्ति.
fifty फिफ्टी a. & n.--- पन्नास.
fig फिग् n.--- अंजीर, अंजीराचे झाड, पोषाख.
fight फाइट् v.t.--- लढाई करणे n.--- लढाई, युद्ध.
figment फिग्मंट् n.--- कल्पनाविलास, काल्पनिक वस्तु, ‘ विकल्प ‘
figurative फिगरेटिव्ह् a.--- अलंकारिक, लाक्षणिक.
figure फिगर् n.---आकार, मुद्रा, प्रतिमा, चित्र, छाया, नकशी, वेलबुट्टी, अंक, आंकडा, प्रतिरूप, नकाशा. V.t.--- आकार-पुतळा करणे, नकाशा काढणे, वेलबुट्टी काढणे.
figured फिगर्ड् a.--- नकशीदार, मूर्तिमंत.
figure-work फिगर-वर्क् n.--- आकड्यां-/ अंका-मधील ( बेरीज, गुणाकार इ. ) परस्परांवरील प्रक्रिया, आकडे-मोड
filament फिलामेन्ट् n.--- तंतु, केसर, सूत्र.
filamentary फिलामेंरी 0a.--- तंतूसारखा, तंतूचा.
filaria फिलेरिया n.--- रक्तात पसरलेल्या या नावाच्या जंतूंनी सोडलेल्या अनावश्यक प्रथिनाने पाय सुजून तो हत्तीच्या पायासारखा होण्याचा रोग. हत्तीरोग. (फारसी भाषेंत फील = हत्ती) see:’Elephantiasis’
filch फिल्च् v.t.--- चोरणे, हिरावून घेणे.
file फाइल् v.t.--- रचणे, फेरिस्तात घालणे, खटला चालविणे, फिर्याद करणे, रांगेने चालविणे, कानशीनेे घासणे. n.--- रांग, पट, फेरिस्त, फैल, कानस, धारिका, संचिका. [ हिंदी : मिसिल, पंजी, पत्रावली ]
filet = Fillet
filial फिलिअल् a.--- पुत्राचा किंवा कन्येचा, पुत्रधर्माचा, अपत्याला (मुलाला किंवा मुलीला) शोभेल असा.
filigree फिलिग्री a.--- दिखाऊ, नुसत्या शोभेचा. n.--- कलाबतूचे काम, सोन्याच्या किंवा चांदीच्या बारीक तारांनी केलेले नाजूक नक्षीकाम.
filing फायलिंग् n.--- कीस, भुगा, फेरिस्त लावणे.
filipino a./n.---’philippine(s)’ या देशाचा (नागरिक / रहिवासी)
fill फिल् v.t.--- भरणे, भरणा करणे, तृप्त करणे, टेर करणे, व्यापणे, बुजवणे.n.--- भरती,तृप्ति. v.i.--- भरणे (भरले जाणे)
fillet फिलेट् n.--- पट्टी, आखंबळ, केस बांधण्याचा दोर, बंधपट्टिका.
fillip फिलिप् v.t.--- टिचकी मारणे, प्रेरणा / प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे, चेतविणे n.--- टिचकी, टचकी, प्रेरणा, प्रोत्साहन, चेतना.
filly फिलि n.--- मादी शिंगरू, शिंगी, घोडी, धांगडधिंगा घालणारी मुलगी,(पहा : colt, foal)
film फिल्म् n.--- डोळ्यावरचे पटल, कोशेटा, कोळ्याचें सूत, तवंग, थेंब, चित्र अंकित / मुद्रित असलेली पट्टी / फीत, चित्र - पट्टिका / -पट्टी /- फीत
filter फिल्टर् n.--- गाळणे, गळती. v.t.--- गाळणे.
filth फिल्थ् n.--- घाण, मळ, खळमळ, गलिच्छ / अश्लील गोष्ट / प्रकार
filthiness फिल्थिनेस् n.--- घाणेरडेपणा, ओंगळपणा.
filthy फिल्थी a.--- घाण, किळसवाणा, गलिच्छ, अभद्र, अश्लील.
filtrate फिल्ट्रेट् v.t.--- गाळणे.
filtration फिल्ट्रेशन् n.--- गाळणी, गाळणे, पाझरणे.
fin फिन् n.--- माशाचा पंख. खोदणे.
final फायनल् a.--- शेवटचा, अंत्य, शेवटील, अंतिम.
finale फिनाले n.--- संगीत / नाट्य, साहित्य, युद्ध इ. चा अंतिम भाग, परमोच्च बिंदु, शेवट, अखेर, अंतिम क्षण
finance फायनॅन्स् n.--- जमा, वसूल, उत्पन्न. v.t.--- एखाद्या कामाकरतां पैशाची साठवण करणे.
financial फायनान्शियल् a.--- वसुलाचा
find फाइन्ड् v.t.--- आढळणे, शोधून काढणे, प्रत्यय येणे, उमगणे, पुरवणे, दोष लावणे, असणे, ज्यूरीस अभिप्राय कळविणे.
fin-de-siecleफँ-द-सिएकल् (फ्रेंच) a.--- शतकान्तसमयींचा, शतकान्त - / युगान्त - / -विशिष्ट, परिणत, ह्रासप्रवण, अन्तसमयीचा.
finding फाइंडिंग् n.--- निकाल, फैसला, शोध.
fine फाइन् a.--- चांगला, बारीक, नाजुक, हिकमती, कावेबाज. n.--- दंड, गुन्हेगारी. v.t.--- दंड करणे, शुद्ध करणे.
fineness फाइन्नेस n.--- तलमपणा, नाजुकपणा
finery फइनरी n.--- टूम, शक्कल, दरबारी पोषाख, थाट, शृंगार, उंची पोषाख.
finesse फिनेस् n.--- नाजुकपणा, हळुवार सौंदर्य, सफाई, चातुर्य, हुषारी.
finetune फाइन्ट्यून v.t.--- बारीक-सारीक दोषहि काढून टाकून सुधारणे / जास्तीत जास्त सक्षम करणे, चिकित्सापूर्वक / बारकाईने (चोखंदळपणे ) सुधारणे.
finger फिंगर् n.--- बोट, अंगुली v.t.--- वहिवाटणे, हात घालणे मध्ये पडणे, चोरणे.
finial फिनिअल् n.--- सर्वोच्च टोक, शिखर, सुळका, कळस.
finical फिनिकल् a.--- टापटीप ठेवणारा, टापटिप्या, अति चोखंदळ, अतिचिकित्सक.
finicking = Finical
finicky = Finical
finikin = Finical
finish फिनिश् v.t.--- ०ला संपविणे, शेवटास नेणे, समाप्त होणे, संपणे, ०चा फडशा पाडणे, ०ला फस्त करणे. n.--- पूर्णता, शेवटचा सफाईचा हात.
finite फाइनाइट् a.--- समर्याद.