sar-sav

sarcasm सार्कॅझम् n.--- लागून बोलणे, टोमणा.
sarcastic सार्क्यास्टिक् a.--- टोमण्याचा, छद्मी.
sarcoma सरकोमा n.--- गर्भाशीं संबंधित गळू. Pl.--- Sarcomata.
sardine सार्डीन् n.--- एक प्रकारचा लहान मासा.
sardonic सार्डॉनिक् a.--- कटु, द्वेषपूर्ण, तिरस्कारयुक्त, अवहेलनात्मक. अशा कुचेष्टेने / टिंगल-टवाळीने युक्त.
SARS ‘Severe Acute Respiratory Syndrome’ चे संक्षिप्त रूप - एक ‘क्लोमपाका’ चा (इ.स. २००३ मध्ये चीन-भागांत नवीनच उद्भवलेला) संसर्गजन्य दुःसाध्य प्रकार.
sartor सार्टर् n.--- शिंपी.
sartorial सार्टोअरिअल् a.--- शिंप्यासंबंधीचा.
sash सॅश् n.--- खिडकीच्या काचेची चौकट, शेला. v.t.--- शेला अंगावर घेणे / घालणे, चौकट बसविणे.
sashay सॅशे v.i.--- ऐटदारपणे / भपक्यांत चालणे / संचलन करणे. (Models were seen sashaying down the ramp.)
sassy सॅसी a.--- =’Saucy’.
satan सेटन् n.--- सर्वोच्च दुरात्मा, सैतान.
satanic सटॅनिक् a.--- अतिदुष्टप्रवृत्तीचा. अतिदुष्ट, सैतानाचा.
satchel सॅचेल् n.--- पिशवी, थैली, जुगदान (विशे. ताठ व खांद्यावर अडकविण्यायोग्य).
satellite सॅटलाइट् n.--- उपग्रह, परान्नावर राहणारा.
satiate सेशिएट् a.--- तृप्त झालेला, भरलेला; v.t.--- भरणे, संतोषविणे, तृप्त करणे.
satiation सेशिएशन् n.--- पूर्ण संतोष, तृप्ति, पूर्णकामता.
satiety सॅशिएटि n.--- पूर्णतृप्ति, वीट, ओकारी.
satin सॅटिन् n.--- एका बाजूने चकचकीत असलेले रेशमी कापड.
satisfactory सॅटिस्फॅक्टरि a.--- तृप्ति करणारा, मनाजोगे, शंकानिवर्तक, भरपाई करणारा.
satisfy सॅटिस्फाय् v.t.--- तृप्त / खात्री करणे, मोबदला देणे, शंका फेडणे.
satrap सॅट्रॅप् n.--- पर्शियन राजाच्या सत्तेखालील विभागाचा (प्रांत, प्रदेश इ. चा) शासक, मांडलिक शास्ता. सुभेदार. पहा : ‘Governor’. जुलुमी / अत्याचारी शासक.
satrapal सॅट्रॅपल् a.--- ‘Satrap’ -संबंधीचा. = Satrapic / Satrapical.
satrapic / Satrapical सॅट्रॅपिक् / सॅट्रॅपिकल् a.--- ‘Satrap’ -संबंधीचा.
satrapy सॅट्रॅपी n.--- ‘Satrap’ च्या अधिकारातील प्रदेश. ‘Satrap’ चे शासन. ‘Satrap’ चे पद / अधिकार.
satsuma सॅत्सूमा n.--- आशियातील सैल साल असलेले संत्र्यासारखे फळ.
saturate सॅचुरेट् v.t.--- पुरा भिजविणे.
saturday सॅटर्डे n.--- शनिवार.
saturn सॅटर्न n.--- शनि, शनैश्वर.
satyr सॅटर् n.--- घोड्याचे / बोकडाचे कान, शेपूट, पाय असणारा ग्रीक देवता. कामासक्त व्यक्ति. = Orangutan.
satyriasis सॅटिरायॅसिस् n.--- पुरुषांचा अतिकामसक्तीचा रोग. स्त्रीसंगाचे वेड.
sauce सॉस् n.--- चटणी, कोशिंबीर. भोजनांतील कच्चा भाजीपाला. v.t.--- खमंग / स्वादिष्ट करणे, चव आणणे.
saucepan सॉस्पॅन् n.--- कढई.
saucy सॉसि a.--- दांडगा, मगरूर, उद्धट, स्वैर, विषयासक्त.
saunter सॉन्टर् v.i.--- रमणे, रिकामे रमतगमत फिरणे. n.--- रमणूक.
savage सॅव्हेज् a.--- रानटी, जंगली, रानवट, निर्दय, उग्र, क्रूर. n.--- राक्षस, रानटी मनुष्य. v.t.--- -वर क्रूर / रानटी हल्ला करणे.
savant सव्हाँ / सॅव्हण्ट् n.--- विद्वान, पंडित, व्यासंगी.
savante सव्हान्त n.--- विदुषी, पंडिता.
save सेव्ह् v.t.--- बचावाने, उद्धार करणे, जपून ठेवणे, शिलकेत टाकणे, जतन करणे.
saving सेव्हिंग् a.--- फायद्याचा, काटकसरी, मितव्ययी. prep.--- वाचून, शिवाय. (pl.) n.--- बचत, शिल्लक.
saviour सेव्हिअर् a.--- तारक, त्राता.
savour सेव्हर् v.t.--- रुचकर स्वाद अनुभविणे, रुचीने सेवन करणे /भोगणे. आवडणे, (चवीला) लागणे, रुचकर वाटणे, चाखणे. Savor of --- -चा वास मारणे. n.--- स्वाद, रुचि, गंध.
savoury = Savory.
savory सेव्हरी a./n.--- स्वादिष्ट, खमंग, चमचमीत, मसालेदार (खाद्यपदार्थ).
savy सॅव्ही n.--- व्यावाहारिक शहाणपण, समज, मुत्सद्दीपणा, पाटव. a.--- चतुर, शहाणा, चातुर्यपूर्ण, कौशल्यपूर्ण.
savvy सॅव्ही