Nab-Nea

Nab नॅब् v.t.--- पकडणे, झडपणे, हिसकून पळवणे (चोरणे).
Nacre नेकर् n.--- मोत्यांचा शिंपला.
Nadir नेडर् / नेडियर् n.--- अधोबिन्दु, अधोभाग, अधर, सर्वात खालची अवस्था, कमाल नीच स्थिति. पृथ्वीच्या उभ्या द्रष्ट्याच्या बरोबर पायाखाली (डोक्याच्या बरोबर विरुद्ध दिशेस) येणारा खगोलार्धमध्यबिंदु, दर्शकसापेक्ष नीचतम बिंदु, अधःस्वस्तिक.
Nag नॅग् n.--- घोडे, तट्टू.
Nagging नॅगिंग् a.--- दोष काढणारा, सारखा त्रास देणारा.
Nail नेल् v.t.--- खिळा मारणे, खिळणे, खिळ्याने चिकटवणे. n.--- खिळा, नख.
Naive नेव्ह् a.--- साधा, भोळा, सरळ, निष्कपट, भाबडा, मूढ, अजाण.
Naivete / Naivety नाइव्हटी n.--- साधेभोळेपणा, निरागसता, भाबडेपणा, मूढता.
Naked नेकेड् a.--- नागवा, उघडा, नंगा, निःशस्त्र, स्पष्ट, ओका, सुना, शून्य, मुंडा.
Nakedly नेकेड्लि ad.--- नागव्याने, उघड्या अंगाने.
Nakedness नेकेड्नेस् n.--- नागवेपणा, उघडेपणा.
NAM ---‘Non-Alignment Movement’ ची आद्याक्षरसंज्ञा.
Name नेम् v.t.--- नाव ठेवणे/देणे, नाव घेणे, हाक मारणे. n.--- नाव, कीर्ति, अब्रू. Surname - n.--- आडनाव.
Namely नेम्लि ad.--- म्हणजे.
Namesake नेम्सेक् n.--- नावाकरी, समनामधारी.
Nankeen नॅन्कीन् n.--- (चीनदेशातील नान्किन्(ग्) नामक शहरावरून) फिकट पिवळ्या रंगाचा कापूस / त्याचे कापड.
Nannie / Nanny नॅनी n.--- दाई, मूळ / मुले सांभाळणारी दासी.
Nano नॅनो - ‘एक अब्जांश भाग’ (सूक्ष्माणु) अशा अर्थाचे उपपद.
Nanosecond नॅनोसेकण्ड् n.--- सेकंदाचा एक-अब्जांश भाग.
Nanotechnology नॅनोटेक्नॉलजी n.--- सूक्ष्माणु/परमाणु-पासून यंत्रे बनविण्याचे शास्त्र. सूक्ष्माणुजनितयंत्रविद्या, सूक्ष्माणुशक्तितंत्र.
Nap नॅप् n.--- डुलकी, झोपेचा चुटका, वामकुक्षी.
Nape नेप् n.--- मानेचा कांटा, मणका, मेंढा, गळ्याच्या मागील भाग.
Naphtha नॅफ्था n.--- रोगण्याचे तेल.
Napkin नॅप्किन् n.--- तोंड पुसण्याचा रुमाल, रुमाल.
Napless नॅप्लेस् a.--- बिनफुलाचा, झिरझिरीत.
Napiness नॅपिनेस् n.--- मऊपणा, गुलगुलीतपणा.
Nappy नॅपि n.--- बाळाची दुपटेवजा चड्डी. a.--- निद्रावश, मऊ, केसाळ.
Narcissism नार्सिसिझम् n.--- विकृत (लैंगिक) आत्मप्रेम, स्वतःच्या शरीराबद्दलची विकृत आसक्ति.
Narcissist नार्सिसिस्ट् a.--- ‘Narcissism’ ने प्रभावित / पछाडलेला.
Narcissistic नार्सिसिस्टिक् a.--- ‘Narcissism’ - संबंधीचा /- स्वरूपाचा.
Narcotic नार्कॉटिक् n.--- गुंगीचे औषध, मदकारी औषध. a.--- गुंगी आणणारे, मादक, निद्रोत्पादक. ‘Narcotic’ -चा/-समान.
Narial नेरिअल् a.--- नाकपुडीचा, नासिकासंबंधी.
Narrate नॅरेट् v.t.--- सांगणे, कथन करणे.
Narration नॅरेशन् n.--- कथा, गोष्ट, वृत्तांत, वर्णन.
Narrative नॅरेटिव्ह् a.--- कथेचा, गोष्टीचा, बोलका.
Narrator नॅरेटर् n.--- कथन करणारा, निरूपणकर्ता.
Narrow नॅरो a.--- अरुंद, संकुचित, अडचणीचा, मर्यादित, बेताचा, कृपण, सूक्ष्म दृष्टीचा. v.t.--- अरुंद / बारीक करणे, संकोच करणे.
Narrowly नॅरोलि ad.--- बारीक दृष्टीने, संकटाने, थोडक्यांत.
Narrowness नॅरोनेस् n.--- अरूंदपणा, संकोच, बारीकपणा, चिक्कूपणा, अडचण, तारांबळ.
Nary नॅरी = No; Neither; Not a
NASA = ‘National Aeronautics and Science Administration’ या यू. एस. ए. मधील संस्थेचे संक्षिप्त नाव.
Nasal नेझल् a.--- नाकाचा, अनुनासिक, गेंगाणा.
Nasality नेझॅलिटि n.--- अनुनासिकत्व, सानुस्वारिक.
Nasalize नेझलाइझ् v.t.--- नाकात उच्चार करणे.
Nastiness नॅस्टिनेस् n.--- घाणेरडेपणा, बीभत्सपणा.
Nasty नास्टी /नॅस्टि a.--- द्वेषपूर्ण, दुष्टाव्याचा; घातक, धोक्याचा.
Natal नेटल् a.--- जन्मसंबंधी, जन्माचा, जन्मापासूनचा.
Nation नेशन् n.--- राज्य, लोक, मोठी संख्या, राष्ट्र.
National नॅशनल् a.--- राष्ट्राचा, राष्ट्रीय, स्वदेशाभिमानी, सार्वजनिक, लोकांचा. n.--- नागरिक.
Nationalism नॅशनॅलिझम् n.--- राष्ट्रभक्ति, राष्ट्रीय गुण.
Nationality नॅशनॅलिटी n.--- जातिविशिष्ट गन, राष्ट्रीय गुण, देशी, स्वाभाविक, स्वदेशाभिमान, राष्ट्रीयत्व.
Native नेटिव्ह् a.--- मूळचा, देशचा, मुलकी, जन्मप्रात, अंगाचा.
Nativity नेटिव्हिटि n.--- जन्म, उपज, उत्पत्ति, जन्मकुंडली.
Natty नॅटी a.--- व्यवस्थित, ठीकठाक, नीटनेटका.
Natural नॅचरल् a.--- मूळचा, अंगचा, स्वाभाविक, वाजवी, सोईस्कर, सृष्टिनिर्मित, दासीचा, यथायोग्य. Natural number : प्राकृत संख्या; व्यावहारिक पूर्णांक.
Naturalist नॅचरलिस्ट् n.--- स्थावरजंगमविज्ञानी.
Naturalize नॅचरलाइझ् v.t.--- हवापाण्याचा सराव पाडणे, देशाचे हक्क देणे. आपलासा करणे.
Naturally नॅचरलि ad.--- स्वाभाविकपणे, उपजत, सरळपणे, यथाक्रम, सुखाने.
Nature नेचर् n.--- स्वभाव, धर्म, प्रकृति, प्रकार, रीत, स्वरूप, बुद्धि, जग, माया, निसर्ग.
Naught नॉट् n.--- मुळीं नसणेपणा, शून्य.
Naughty नॉटि a.--- खोडकर, दुष्ट, व्रात्त्य, वाईट.
Nausea नॉशिआ n.--- मळमळ, शिसारी, वीट.
Nauseate नॉशिएट् v.i.--- मळमळणे, किळस येणे.
Nauseous नॉशस् a.--- किळस आणणारा, कंटाळवाणा, विटविणारा, ओकारी आणणारा, शिसारीचा, किळसवाणा, घाणेरडा.
Nautch नॉच् n.--- (भारतीय) नृत्यप्रयोग. नृत्यांगना, नर्तिका.
Nautical नॉटिकल् a.--- नौकानयनासंबंधी.
NAV : ‘Net Asset Value’ याचे संक्षिप्त रूप.
Naval नेव्हल् a.--- गलबतांचा, आरमारी, नाविक.
Nave नेव्ह् n.--- तुंबा, मांदळा, देवळाचा गर्भ.
Navel नेव्हल् n.--- बेंबी, नाभि, बोंबी, नामिकमळ.
Navel-string नेव्हल्स्ट्रिंग् n.--- नाळ.
Navigable नॅव्हिगेबल् a.--- गलबत जाण्याजोगा.
Navigate नॅव्हिगेट् v.i.--- गलबतातून जाणे / येणे.
Navigation नॅव्हिगेशन् n.--- गलबतातून पर्यटण, गलबत चालविण्याची विद्या, सफर, नौकापर्यटण.
Navigator नॅव्हिगेटर् n.--- गलबतांतून जाणारा.
Navvy नॅव्ही n.--- खोदकामावरील मजूर.
Navy नेव्ही n.--- आरमार, आरमारावरील लोक.
Nay ने ad.--- नाही, असेच नाही. n.--- नकार.
Neap नीप् n.--- भांग,माडभांग. a.--- भांगाचा.
Neaptids नीप्टाइड्स् n.--- भांगाचे पाणी.
Near नियर् a.--- जवळचा, जवळच्या नात्याचा, आवडता, जिवलग. ad.--- जवळ, नजीक, समीप. Near-by : जवळपास, जवळचा.
Nearly नियर्लि ad.--- प्रायः, बहुतकरून, जवळपास.
Nearness नियर्नेस् n.--- जवळपणा, सान्निध्य.
Neat नीट् a.--- नीटनेटका, सुबक, शुद्ध, नीटस, गोजिरा.
Neatherd नीट्हर्ड् n.--- गुराखी.
Neatness नीट्नेस् n.--- नीटनेटकेपणा, ठाकठिकी.