Y-Yan

Y वाय् n.--- इंग्रजी वर्णमालेतील पंचविसाव्वे अक्षर. (गणितात लहान लिपीत (‘y’) लिहलेला असताना) दोन अज्ञात संख्यांपैकी दुसऱ्या अज्ञात संख्येचा प्रतीक. उदा. Determine the value of x (पहिली अज्ञात संख्या) from the value of y (दुसरी अज्ञात संख्या). एखादा अज्ञात, समजुतीत असलेला व्यक्ति, संख्या, प्रभाव इ. उदा. Let’s suppose x knows what y is doing.
Yabble / Yabby यॅबल् / यॅबी n.--- ऑस्ट्रेलियात सापडला जाणारा एक लहान गोड्या पाण्यातील मासा.
Yacht यॉट् n.--- मनोरंजनार्थ नौकाविहार / नौकाचालनस्पर्धा इ. करण्याची लहान नौका.वैयक्तिक आनंददायक प्रवास / सहलीसाठी वापरली जाणारी वल्ह्यांखेरीज इतर शक्ति-स्रोत उदा. वाफ, वीज, शीड इत्यादीवर चालणारी लहान होडी v.i.--- अशा नौकेतून स्पर्धा / समुद्र पर्यटन करणे.‘Yacht’ मधून जलविहार करणे.नौकाचालनाच्या स्पर्धा खेळणे.
Yacht club याॅट् क्लब् n.--- विशेष करून yacht स्पर्धेसाठी असलेला संघ.
Yachtsman याॅट्स्मन् n.--- yacht चालवणारा.
Yack यॅक् n. --- (अपमानकारक) एखादे क्षुल्लक संभाषण, त्यात गुंतणारा. v.i.--- क्षुल्लक संभाषणात गुंतणे.
Yaffle यॅफल् (dialect) n.--- सुतार पक्षी.
Yager यॅगर् (variant of Jaeger) n.--- जर्मनी किंवा ऑस्ट्रियामधील बंदूकधारी.
Yah यॅह् (int.)--- विरोध, अवज्ञा, उपहास किंवा मस्करी दर्शविणारा उद्गारवाचक शब्द.
Yahoo याहू n.--- मनुष्यरूपातील पशु ; अमानुष, पशुतुल्य, असभ्य, माणूस. (proper noun) स्विफ्ट्च्या गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स्मधील बावळट / असभ्य माणसाच्या जातीचे नाव.
Yahveh, Yahweh याह्वे (proper noun)--- हेब्रू लोकांचा परमेश्वर. See JEHOVAH
Yak यॅक् n.--- तिब्बतमधील केसाळ, रेकणारा, जंगली किंवा पाळीव बैल.
Yale lock येल् लाॅक् n.--- फिरणारी नळी असलेले एक प्रकारचे कुलूप.
Yam यॅम् n.--- उष्णप्रदेशांतील एका वनस्पतीचे मूळ,सुकंद,कोनफळ, एका वेलीचे पिष्टमय खाद्य मूळ.
Yammer यॅमर् n.--- ( पोटभाषेतील ) शोक, विलाप, शोकगीत; बडबड्या, चुरचुर बोलणारा. v.i.--- शोक करणे, आक्रोश करणे, विलाप करणे.
Yang यॅंग् n.--- चिनी दर्शनशास्त्रात सृष्टीचे कर्ता पुरुष तत्व.
Yank यॅंक् v.t. & n.--- तरफ इ. झटक्याने ओढणे. स्वतःकडे ओढण्यासाठी दिलेला जोराचा हिसका.
Yankee यँकी n.--- नव्या इंग्लंडचा रहिवासी, उत्तरेकडील राज्यांचा रहिवासी, नागरी युद्धातील सांघिक(फेडरल्) सैनिक. (पोटभाषा) अमेरिकेचा रहिवासी, चार किंवा अधिक घोड्यांवर जिंकण्यासाठी लावलेली पैज.
Yankee Doodle यँकी डूड्ल् n.--- अमेरिकन् क्रांतीमधील अनधिकृत राष्ट्रीय गाणे / चाल.
Yaourt n.--- see Yoghurt
Yap यॅप् v.i.--- कर्कशतेने किंवा खिन्नतेने भुंकणे,जोराने/मूर्खपणें/तक्रारपूर्वक बोलणे. n.--- तसा आवाज.
Yapock यॅपॉक् n.--- दक्षिण अमेरिकेतील पाण्यात राहणारा व पिलाला पोटाच्या पिशवीत ठेवणारा लहान प्राणी.
Yarborough यार्बरो n.--- व्हिंस्ट किंवा ब्रिज या पत्त्यांच्या खेळातील ९ च्या वरचे पान नसलेला हात.
Yard यार्ड् n.--- वार, यार्ड, वाडगे, आवार, परूस. प्रांगण, विशेष कार्यासाठी वापरला जाणारा भूक्षेत्र, गज, वार, यार्ड, वाडगे, आवार, परूस, तीन फुटाच्या लांबीचे माप, शिडाला आधार देणारा दंडगोलाकार भक्कम दांडा.
by the yard--- खूप लांब पर्यंत; yard of ale--- एका खोल सडपातळ पेल्यातील कडक बिअर; yard of clay --- लांब मातीची नळी; man the yards --- मानवन्दनेसाठी यार्डच्या कडेकडेने लोकांना उभे करणे.
Yardage यार्डेज् n.--- एकूण यार्डांची संख्या, गुरांचे गोठे वापरण्यासाठी दिली जाणारी किंमत.
Yardstick n.--- (कपडे वगैरे) मोजण्याचा गज, तुलनेचे मानक / मानदंड.
Yarmulka यामुकह् n.--- यहुदी लोकं वापरत असलेली घट्ट टोपी.
Yarn यार्न् n.--- लोकरी सूत, पेड, धागा, गोष्ट, गप्पा, किस्सा, प्रवचन, बहुरंगी संभाषण. (दीर्घ) अद्भुत. v.i.---(बोलीभाषेत) चऱ्हाट लावणे, गप्पा मारणे.
Yawl यॉल् n.--- होडी, डिंगी. v.i.--- केंकाटणे.
Yawn यॉन् v.i.--- जांभई देणे, तोंड वासणे. n.--- जांभई.
Ye यी pron.--- तुम्ही.
Yea ये ad.--- होय, एवढे नव्हे पण. n.--- होकार.
Yean यीन् v.t. & v.i.--- विणे.
Year यीअर् n.--- वर्ष, साल, संवत्सर.
Yearn यर्न् v.i.--- अभिलाषा धरणे, आस धरणे.
Yeast यीस्ट् n.--- (बुरशीच्या स्वरूपाचे) एक विशेष आंबवण (आंबविणारे (leaven) द्रव्य), किण्व.
Yank यँक् v.t.--- खेचणे, हिसकणे.
Yankee यँकी n.--- युनाइटेड स्टेट्स येथील रहिवासी, अमेरिकन. a.--- अमेरिकन इसमासंबंधी, अमेरिकनवैशिष्ट्ययुक्त.
Yangon यँगॉन् n.--- म्यानमार (Myanmar) देशाच्या राजधानीचे शहर. जुने नाव: रंगून (Rangoon).
Yank यॅंक् v.t.--- तरफ इ. झटक्याने ओढणे. n.--- स्वतःकडे ओढण्यासाठी दिलेला जोराचा हिसका.
Yankee यँकी n.--- नव्या इंग्लंडचा रहिवासी, उत्तरेकडील राज्यांचा रहिवासी, नागरी युद्धातील सांघिक(फेडरल्) सैनिक. (पोटभाषा) अमेरिकेचा रहिवासी, चार किंवा अधिक घोड्यांवर जिंकण्यासाठी लावलेली पैज.
Yankee Doodle यँकी डूड्ल् n.--- अमेरिकन् क्रांतीमधील अनधिकृत राष्ट्रीय गाणे / चाल.