wheat व्हीट् n.--- गहू.
wheaten व्हीटन् a.--- गव्हाचा केलेला.
wheedle व्हीडल् v.t.--- फूस लावणे, आर्जव करणे.
wheel व्हील् v.t.--- फिरणे, चक्कर मारणे. n.--- चाक, चक्र, रहाट. Wheel barrow --- एक चाकी गाडी.
wheeze व्हीज् v.i.--- घरघरणे, श्वासोच्छ्वासांत अडथळा, अशक्तता इ. मुळे घरघर धारण करणे.
whelm व्हेल्म् v.t.--- दाबून टाकणे, गर्क करणे.
whelp व्हेल्प् v.i.--- विणे. n.--- पिल्लू.
when व्हेन् ad.--- जेंव्हा, केंव्हा, नंतर, तेंव्हा.
whenever व्हेनेवर् ad.--- जेंव्हा जेंव्हा.
whence व्हेन्स् ad.--- कोणीकडून, जिकडून.
where व्हेअर् ad.--- कोठे. जेथे. Whereabout --- कोठेसा, ज्याविषयी. Whereas --- ज्यापेक्षा, वस्तुतः. Where at --- ज्यावर. Where by --- जेणेकरून. Wherefore --- ज्यासाठी, अतएव, ज्यामुळे, कां, कशासाठी. Wherein --- ज्यांत, कशांत. Where-ever --- जेथे जेथे. Whereof --- ज्याचा, कशाचा. Where-upon --- ज्यावर, त्याकरून, त्यानंतर. Wherewith --- ज्याने, कशाने.
wherry व्हेरी n.--- तर, होडी.
whet व्हेट् / वेट् v.t.--- सहाणेवर धरणे, पराजणे, धार लावणे; तीव्र करणे.
whether व्हेदर् conj.--- जर, की, काय.
whey व्हे n.--- दह्यातले पाणी.
which विच् pron.--- जो, कोणता. Whichever --- जो कोणता.
whiff विफ् n.--- निःश्वास. वाऱ्याची झुळूक. झुरका . वास. झलक.
while व्हाइल् conj.---- जोपर्यंत. n.--- वेळ. For a while --- काहीकाळ.
whilst व्हाइल्स्ट् conj. & ad.--- जोपर्यंत, इतक्यांत.
whim व्हिम् n.--- लहर, तब्बेत.
whimsical व्हिम्सिकल् a.--- लहरी.
whimper, Whine विम्पर्, वाइन् v.t.--- पिरपिर लावणे, कुरकुर करणे. n.--- पिरपिर, कुरकूर. v.i.--- पिरपिरणे. v.i. /n.--- कण्हणे, कुंथणे, विव्हळणे.
whinge व्हिन्ज् v.i.--- सतत तक्रार / किरकिर करणे, सतत रडगाणे गाणे. n.--- सतत केलेली तक्रार / पिरपिर.
whip विप् v.t.--- कोरडा /चाबूक मारणे. n.--- घुसळून कालविलेले फेसाळविलेले भोजनांतीचे (मधुर) खाद्य. विधिमंडळांतील राजकीय पक्षाचा असा सदस्य ज्यास त्या पक्षाने स्वपक्षांतील सदस्यांत शिस्त राखण्याचे (उपस्थिति, मतदान इ. बाबत) काम सोपविलेले असते. प्रतोद. (हिंदी: सचेतक). विधिमंडळांतील राजकीय पक्षाने स्वपक्षीय सदस्यांना विशिष्ट वेळी उपस्थिति व मतदानासाठी दिलेला लेखी आदेश.
whirl व्हर्ल् v.t.--- गरगर फिरविणे, गरगरवणे. गरगर फिरणे, गरगरणे. गरगर फिरवत / फिरवत सोडणे / फेकणे. गरगरत जाणे. चक्रावणे, चक्कर / चकरा खाणे. n.--- चक्राकार गति.
whirligig व्हSर्लिगिग् n.--- चक्राकार फिरणारे खेळणे (भोवरा, भिंगरी इ.), गोलाकार फिरविणारे (मनोरंजक) चक्र.
whirlpool व्हर्ल्पूल् n.--- भोंवरा (पाणी इ. चा),चक्री वादळ.
whirlwind व्ह(र्)ल्विण्ड् n.--- वावटळ. चक्रवात, वातावर्त, वातभ्रम, वात्या. (हिंदी: बवंडर)
whir(r) व्हSर् n.--- घरघर / घर्घर(-ध्वनि). v.i.--- घर्घरध्वनि करणे / करीत जाणे / करीत फिरणे, गरगरणे.
whisk व्हिस्क् v.t.--- झटका मारणे, झपाट्याने वाहून नेणे / घेऊन जाणे.
whisker व्हिस्कर् n.--- कल्ला.
whisper व्हिस्पर् v.t.--- कुजबुजणे, कानात सांगणे. n.--- कुजबुज, फुसफूस.
whistle व्हिसल् v.t.--- शीळ घालणे. n.--- शीळ, शिट्टी.
whistle-blower व्हिसल्-ब्लोअर् n.--- महत्वाची वेळ / घटना / प्रमाद / अन्याय इ. संबंधी सावधानतेची खणखणीत / उच्चरवाने सूचना देणारी व्यक्ति.
whistle-blowing व्हिसल्-ब्लोइंग् n.--- वरीलप्रमाणे सूचना देण्याचे काम.
whit व्हिट् n.--- लेश, कण, रति, अणु. A whit --- अणुमात्र, तिळमात्र.
white व्हाइट् a.--- पांढरा, सफेत. n.--- पांढरा रंग. White dusky --- भुरका. White ant --- वाळवी. White lead --- सफेता. Whitewash --- सफेती.
white-collar व्हाइट्-कॉलर् a.--- अंगमेहनतरहित व्यवसायातील, श्रमजीविवर्गेतर. पांढरपेशा.
whiten व्हाइटन् v.t.--- पांढरा / सफेत करणे.
whither व्हिदर् ad.--- कोणीकडे? कोठे?
whittle व्हिटल् v.t.--- सुरीने सोलणे (तासून, काटछाट करून). n.--- सुरी.
whiz / Whizz विझ् n.--- (विशिष्ट विषयांतील / क्षेत्रांतील) अतिशय कुशल / चतुर जाणकार / कारागीर. (The Nobel-winning math-whiz John Nash looks the very antithesis of the gladiatorial Russel Crowe who played him in the movie.)
whizkid विझ्किड् n.--- अत्यंत चालाख / चतुर पोर(टा) / व्यक्ति.