Emb-Emo

Embellish एम्बेलिश् v.t.--- सुशोभित करणे, बनवून सांगणे.
Embellishment एम्बेलिशमेंट् n.--- अलंकार, बतावणी, पाल्हाळ, मंडन, भूषण.
Embers एम्बर्स् n.--- अंगार, जळता कोळसा, निखारा.
Embezzle एम्बेझल् v.t.--- खाणे, गिळंकृत करणे, दुसऱ्याचा पैसा उपटणे.
Embezzlement एम्बेझलमेंट् n.--- पैसा गिळंकृत करणे.
Emblazon एम्ब्लेझन् v.t.--- शृंगारणे, चिन्हांनी मंडित करणे, चित्रांनी मंडित करणे, अक्षरे, नक्षी इ.) चित्रित करणे/ रेखाटणे.
Emblem एम्ब्लेम् n.--- खूण, लक्षण, प्रतिमा, चिन्ह, प्रतीक, संप्रतीक, परिचय-चिन्ह, परिचय-प्रतीक, ओळख-चिन्ह.
Emblematic एम्ब्लेमॅटिक् a.--- संकेताचा, सूचक.
Embody एम्बॉडि v.t.--- एके ठिकाणी आणणे, एके ठिकाणी करणे, स्पष्ट रूप देणे, संगृहीत/समाविष्ट करणे.
Embolden एम्बोल्डन् v.t.--- धीर देणे, धीट करणे.
Embosom एम्बूझम् v.t.--- प्रेमाने आलिंगणे, हृदयात ठेवणे.
Emboss एम्बॉस् v.t.--- गेंद/गोंडे लावणे, जडविणे, पृष्ठभागावर उठाव देऊन लावणे/बसविणे.
Embrace एम्ब्रेस् v.t.--- आलिंगन देणे, मिठी मारणे, कवटाळणे. N.--- आलिंगन, मिठी.
Embrocate एम्ब्रोकेट् v.i.--- औषधाने चोळणे, मर्दन करणे.
Embroider एम्ब्रॉइडर् v.t.--- वेलबुट्टी/कशिदा काढणे.
Embroil एम्ब्रॉइल् v.t.--- पेंचात पाडणे, बिघाड पाडणे, गुंतवणे, आग लावणे.
Embryo एम्ब्रिओ n.--- नुकता धरलेला/कोवळा गर्भ, मूलांकुर, अंकूर.
Embryonic एम्ब्रिआॅनिक् a.--- ‘Embryo’ चा/-विषयक.
Emend इमेंड् v.t.--- नीट/दुरुस्त करणे, पाठ शुद्ध करणे.
Emendation इमेंडेशन् n.--- शोधन, दुरुस्ति, शोध, पाठशुद्धि.
Emerald एमरल्ड् n.--- पाचू, पन्ना. (पहा: beryl)
Emerge इमर्ज् v.i.--- उदय पावणे, डोके वर काढणे.
Emergence इमर्जन्स् n.--- वर येणे, उदय, अभ्युदय.
Emergency इमर्जन्सि n.--- प्रसंग, निवड, जरूरी.
Emergent इमर्जन्ट् a.--- निकडीचा, जरुरीचा.
Emeritus इमेरिटस् a.--- (दैनंदिन व्यवसायांतून सन्मानपूर्वक) निवृत्त.
Emetic इमेटिक् a.--- ओकारी आणणारा, वमनकारक, किळसवाणा. n.--- वमनोत्तेजक औषध (संस्कृत: वमनम्)
Emigrant एमिग्रंट् n.--- देशांतर केलेला, देशांतर करणारा, स्वदेशत्यागी, परदेशवासी, परदेशाश्रयी.
Emigrate एमिग्रेट् v.i.--- देशांतर करणे, उठून जाणे.
Emigration एमिग्रेशन् n.--- देशत्याग.
Emigre एमिग्रे n.--- = Emigrant
Eminence एमिनन्स् n.--- उंची, मोठेपणा, महत्व, नांवलौकिक, प्रतिष्ठा, लौकिक.
Eminent एमिनन्ट् a.--- थोर, प्रसिद्धीचा, नांवलौकिकाचा.
Eminently एमिनन्ट्लि ad.--- विशेषेकरून, अतिशय.
Emissary एमिसरि n.--- दूत, हेर, गुप्तदूत.
Emission एमिशन् n.--- निघणे, उत्पन्न होणे, बाहेर टाकणे, पडणे, स्वप्नावस्था.
Emit इमिट् v.t.--- पाडणे, सोडणे, बाहेर टाकणे.
Emmet एमेट् n.--- मुंगी.
Emolliate इमोलिएट् v.t.--- पुंसात्व घालविणे, मृदु करणे.
Emollient इमो-/इमॉ-लिअन्ट् a.--- मऊ करणारे, स्निग्ध, स्नेहन, शान्तिप्रद (तेल, अंजन, औषध).
Emolument इमॉल्युमेंट् n.--- लाभ, प्राप्ती, मिळकत.