Pan- सर्व / समस्त / अखिल या अर्थींचा उपसर्ग. उदा. Pan-Indian image.--- अखिल भारतीय प्रतिमा.
Pan पन् n.--- कढई, तवा, तोफेचा काना, गुडघ्याची वाटी v.t.--- (सोने इ. धातु शोधून काढण्यासाठी) (गाळ, रेती इ. घमेल्यात ठेवून) धुणे. (घमेले इ. ठेवून) धुलाई करणे. -वर कडक टीका करणे.
Panacea पॅनसीअ n.--- सर्वौषधि मात्रा, त्रैलोक्यचिंतामणी. सर्व-रोग-(दुःख) -हारी औषध / उपाय.
Panache पनाश् n.--- पिसांचा तुरा, (टोपीचा) तुरा, गोंडा; अलंकारांचा रुबाब, ऐट, डौल.
Pancake पॅन्केक् n.--- धिरडे, ढेम्बरे.
Pancratic पॅन्क्रॅटिक् a.--- तालिमबाज, बळकट.
Pancreas पँक्रिअॅस् n.--- जठराजवळ असणारा व जठराशी जोडलेले एक पिंड ज्यांतील बहुगुणी स्त्रावाने विविध अन्नपचनाची कार्ये (विशेषतः साखरेच्या पृथक्करणासारख्या प्रक्रिया) घडतात.
Panda पॅन्डा n.--- छोट्या अस्वलासारखा एक मांसाहारी रात्रिंचर प्राणी.
Pandal पॅण्डल् n.--- मंडप, मांडव, छपरी. (मूळ : तामिळ. हिंदी : पंडाल).
Pandemic पॅण्डेमिक् a.--- (रोग इ.) सर्वव्यापी, मोठ्या क्षेत्रांत पसरलेला. विश्व-/देश-/-व्यापी. n.--- दूरवर / देशभर / जगभर पसरलेला आजार.
Pandemonium पॅन्डिमोनियम् n.--- पुंडाईचे ठिकाण, पुंडमंडळ, पिशाच्च्धाम.
Pander पॅन्डर् n.--- कुटण्या, कुंटण. v.t.--- -चे चोचले करणे/पुरवणे, लाड करणे.
Pandiculation पॅन्डिक्युलेशन् n.--- आळापिळा.
Pane पेन् n.--- तावदान, खण, पूड, भिंग.
Panegyric पॅनिजिरिक् n.--- प्रशंसा, स्तुतिवाद, स्तोत्र.
Panegyrist पॅनिजिरिस्ट् स्तुति / प्रशंसा करणारा.
Panel पॅनेल् n.--- लांकडी तावदान, कपाटांतील खण. पान, पत्रा, पटखंड, फळा, फळी, पट्टी. v.i.--- पत्रा लावणे.
Pang पॅन्ग् n.--- कळ, तिडिक. Pangs --- व्यथा, यातना.
Panic पॅनिक् v.t / v.i.--- घाबरून जाणे, घाबरगुंडी उडणे. n.--- धडकी, धसका, दचका, धक्का, घबराट.
Panic-grass पॅनिक्-ग्रास् n.--- ‘Panicum’ जातीचे गवत. दूर्वा.
Pannel पॅनेल् n.--- खोगीर, ससाण्याचा कोठा.
Pannier पॅनिअर् n.--- पेटारा.
Panoply पॅनोप्लि n.--- सर्व अंग राखणारे चिलखत, सर्वांग कवच.
Panorama पॅनराम n.-- द्रष्ट्याच्या सभोवती दिसणारे विस्तृत चित्र / देखावा, द्रष्ट्याच्या समोर प्रकटत जाणारी चित्रमाला, आसमंतांतील एकूण देखावा.
Pant पॅन्ट् v.t.--- धडकी भरणे, धापा टाकणे. n.--- धाप, दम.
Pantaloon पॅन्टलून् n.--- पायजमा, इजार.
Pantheism पॅन्थीइझम् n.--- अद्वैतमत, जगदीश्वरमत.
Pantheist पॅन्थीइस्ट् n.--- अद्वैतवादी, जगदीश्वरवादी.
Pantheon पॅन्थिअन् n.--- सर्वदेवालय, सर्वदेवमंदिर, विशिष्ट समाजाचा देवतासमूह.
Panther पॅन्थर् n.--- बिबळ्या / बिब्ब्या वाघ. (विशेषतः या जातीचा काळाभोर रंगाचा). = Leopard. (पहा: Jaguar)
Pantology पॅन्टॉलजी n.--- सर्वविद्यासंग्रह.
Pantomime पॅण्टोमाइम् n.--- मूकनाट्य.
Pantomimic पॅण्टोमिमिक् a.--- मूकनाट्यात्मक.
Pantry पॅन्ट्री n.--- भोजनाचे पात्रे, चमचे आदि सामान ठेवण्याचा कक्ष / कपाट. भोजनालय, भोजनकक्ष.
Pap पॅप् n.--- थानाची बौडी, स्तन, कुच, गर.
Papa पापा n.--- बाबा, बा.
Papacy पेपसी n.--- पोपचा कार्यकाल / कारकीर्द.
Papal पेपल् a.--- पोप(संबंधी)चा, रोमन कॅथॉलिक चर्च(संबंधी)चा.
Papaw पापॉ n.--- पोपई, पोपया.
Paper पेपर् n.--- कागद, दस्तऐजव, निबंध, लेख, खत, वर्तमानपत्र. a.--- कागदाचा, कागदी, क्षुद्र, जुजबी. v.t.--- लेखबद्ध करणे, कागदावर उतरविणे. Paper up --- कागदात बांधणे, (कागदाने इ.) झाकणे.
Pappy पॅपि a.--- बिलबिलीत, मऊ, नरम.
Papula पॅप्युला n.--- पुरळ, पुटकुळी.