web वेब् n.--- जाळे, विणलेली वस्तु, करवतीचे पात.
website वेब्साइट् n.--- (संगणकदवारा प्राप्य) संकेतस्थळ / संकेतस्थान. अंतःक्षेत्र (हिंदी)
wed वेड् v.t.--- लग्न करणे.
wedding वेडिंग् n.--- लग्न, विवाह, लग्न समारंभ, विवाह सोहळा.
wedge वेज् n.--- पाचर किंवा त्या आकाराचा तुकडा. v.t.--- पाचर वापरून दुभंगणे/चिरणे.
wedlock वेड्लॉक् n.--- लग्नसंबंध.
wednesday वेनस्डे n.--- बुधवार.
weed वीड् v.t.--- खुरपणे. n.--- रान, वरचा कपडा, निरुपयोगी वस्तु. माजणारे निरुपयोगी गवत. v.--- निरुपयोगी गवत (इ.) काढून टाकणे, (शेत, पीक इ.) अशा गवतापासून मुक्त करणे /भांगलणे, बेणणे; पिकांतील गर्दी कमी करणे. Weeds --- गवत, दुःखसूचक वस्त्रे.
week वीक् n.--- आठवडा, सप्ताह.
weekday वीक्डे n.--- आठवड्यातील कामाचा दिवस; रविवारेतर दिवस. आठवड्याचा शनिवार-/रविवार- व्यतिरिक्त दिवस, सप्ताहांतील कार्यदिन.
weekly वीक्ली ad.--- आठवड्याचा. n.--- साप्ताहिक वर्तमानपत्र.
weep वीप् v.t.--- रडणे, शोक करणे.
weft वेफ्ट् n.--- पूरण, आडवट.
weigh वे v.t.--- तोलणे, वजन करणे / भरणे / असणे. Weigh in --- ‘मध्ये भर टाकणे, वाढविणे, -मध्ये वाढ करणे.
weight वेट् n.--- वजन, भार, वजनदारी, मोठेपणा. v.t.--- वजन घालणे / लावणे.
weighty वेटि a.--- वजनाचा, वजनदार, अर्थपूर्ण, भारदस्त, प्रभावी.
weird वीअर्ड् a.--- अतिमानुष, अद्भुत, चमत्कृतिपूर्ण.
welcome वेल्कम् v.t.--- स्वागत करणे. n.--- आगतस्वागत.
weld वेल्ड् v.t.--- धातु, प्लॅस्टिक इ. च्या वस्तूंना उष्णतेने मऊ करून वा चिकट द्रव्याच्या लेपनाने जोडणे, -ला डाग देऊन जोडणे, -चे साधन करणे. n.--- जोड, जोडाचा सांधा. (पहा: ‘Solder’).
welder वेल्डर् n.--- Weld- करणारा, संधाता.
welfare वेल्फेअर् n.--- कल्याण, सुख, क्षेम, मंगल.
well वेल् n.--- विहीर. a.--- बरा, सुखी, निर्मळ, निरोगी. v.i.--- (पाणी, द्रव इ. चे) वाढून / फुगून / उसळून वर येणे, असे पसरून वाहणे, ‘चढणे’. interj.--- भले शाबास. ad.--- बरे. Well being --- कल्याण. Well worn --- कुलीन. Well bred --- सुशिक्षित. Well known --- पक्का माहीत. Well looking --- देखणा. Well make --- बांधेसूद. Wellment --- सद्धेतूचा, खरा. Wellwisher --- हितचिंतक.
well of the house --- विधिमंडळ आदींच्या सभागृहांतील अध्यक्षासनासमोरचा खोलगट भाग. ‘आसंदी’ (हिंदी).
welsh वेल्श् v.t.--- ठकविणे, फसवणूक करणे, वचनभंग करणे. वचनपूर्तीची टाळाटाळ करणे. n.--- ‘Wales’ (वेल्स) देशाचा रहिवासी.
welt वेल्ट् n.--- कांठ, गोट.
welter वेल्टर् v.i.--- लोळणे, पासलणे. गोंधळ, गर्दी, झुंबड, दाटी, खेचाखेच.
wen वेन् n.--- आवाळूं.
wench वेन्च् n.--- रांडरू, बटीक.
west वेस्ट् n.--- पश्चिम दिशा. a.--- पश्चिमेचा. V.i.---पश्चिमेकडे. Westward --- पश्चिमेकडे.
warf
whack व्हॅक् n.--- सपाटा, (सणसणीत) चपराक; सटका, झटका, (मोठा घसघशीत) हिस्सा / वाटा. प्रयत्न. v.--- ठोसा / चपराक लगावाणे. (लाठी /चाबूक इ. चा) मार / वार करणे, लाठी, छडी इ. घुमविणे.
whacky व्हॅकी a.--- सणसणीत, चमकदार, झणझणीत.
whale व्हेल् n.--- (बाह्यतः माशासारखा) प्रचंड आकाराचा सस्तन जातीचा जलचर. a whale of : = ‘no end of’ (eg. as monsoon comes, the Arabian Sea gets rough; but for children in Mumbai this only means a whale of a time)
wharf व्हार्फ् n.--- समुद्राचा धक्का / घाट.
wharfage व्हार्फेज् n.--- धक्काभाडे, धक्के.
what व्हॉट् pron.--- काय, कोण, कोणता, जो, जी, जे. What else --- दुसरा कोणता? What then --- मग काय. Whatever --- जो जो, जे जे. Whatsoever --- जो जो, जे जे.
what with व्हॉट् विथ् ad.--- -च्या मुळे, -चा विचार करता.