Van व्हॅन् n.--- फौजेची आघाडी / तोंड. Van guard --- बिनी, आघाडीची फौज; लढाऊ नेतृत्व.
Vandal व्हँडल् n.--- सार्वजनिक मालमत्तेची नासधूस / मोडतोड / विध्वंस करणारा (व्यक्ति).
Vandalism व्हँडलिझम् n.--- सार्वजनिक मालमत्तेची नासधूस / मोडतोड / विध्वंस.
Vanilla व्हनिल n.--- (बियांच्या) शेंगा धारण करणारी एक वनस्पति. या वनस्पतीच्या बियांच्या अर्कापासून, मादाभास्कर, (त्याजवळील) कोमोरो द्वीपसमूह, टोंगा (ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस प्रशांत महासागरांत), मेक्सिको, भारत इ. देशांत) बनणारे एक सुगंधी मसाला-द्रव्य.
Vanish व्हॅनिश् v.i.--- अंतर्धान पावणे, नाहीसा होणे.
Vanity व्हॅनिटि n.--- गर्व, आढ्यता, दिमाख, शेखी.
Vanquish व्हँक्विश् v.t.--- जिंकणे, खंडन करणे.
Vantage व्हाण्टिज् n.--- फायदा, सवलत, विशेष फायद्याची स्थिति, अधिक उच्च / लाभदायक / सुखप्रद / सोयीची / सुरक्षित स्थिति.
Vapid व्हॅपिड् a.--- पाणचट, पचपचीत, निकस. बेचव, रटाळ.
Vapour व्हेपर् n.--- वाफ, वृथाकलपना. v.i.--- वाफ होणे.
Variable व्हेरिएबल् a.--- चंचल, अस्थिर. n.--- बदलणारी वस्तु.
Variance व्हेरियन्स् n.--- बदल, परिवर्तन; परिवर्तनशीलता; भेद, भिन्नता, विसंवाद, विसंगति; मतभेद, वाद. At variance (with) --- (-शी) मतभेदाच्या / मतभिन्नतेच्या स्वरूपाचा. -हून वेगळा / आगळा / भिन्न.
Variation व्हेरिएशन् n.--- फेर, अंतर, तफावत, भेद.
Varicose व्हॅरिकोस् a.--- फुगलेला, सुजलेला, रुंदावलेला, विकसित, खुललेला.
Varicosed व्हॅरिकोस्ड् a.--- = Varicose
Varicosity व्हॅरिकॉसिटी n.--- फुगारा, रुंदावणी, फुगून / रुंदावून वेडावाकडा होण्याची प्रक्रिया.
Variegate व्हेरिअगेट् v.t.--- -ला चित्रविचित्र / रंगीबेरंगी / ठिपकेदार करणे.
Variegated व्हेरिअगेटिड् a.--- चित्रविचित्र. रंगीबेरंगी. ठिपकेदार.
Variety व्हराइटी n.--- प्रकार, चित्रविचित्रपणा.
Various व्हेरिअस् a.--- अनेक प्रकारचा, तऱ्हेतऱ्हेचा.
Varix व्हेरिक्स् n.--- रक्तवाहिन्यांचे अस्वाभाविक अतिप्रसरण / तल्लक्षण रोग. (pl. Varices).
Varnish व्हार्निश् v.t.--- रोगण लावणे. n.--- रोगण, सफाई.
Vary व्हेरि v.t.--- फिरविणे, पालटणे, फरक करणे.
Vascular व्हॅस्क्युलर् a.--- शरीरगत द्रवधारी / द्रववाही नलिकांसंबंधीचा. ‘Vessel’ -चा / -संबंधित / -निर्मित / -युक्त.
Vasectomy व्हसेक्टमी n.--- पुरुषनसबंदी.
Vassal व्हॅसल् n.--- (मालक / जाहागिरदार चा) कूळ, सेवक / मांडलिक; चाकर, गुलाम, सामंत, भूदास.
Vast व्हास्ट् a.--- फार मोठा, बळकट, अवजड, अफाट.
Vat : (मद्य, रंग, पाणी इ. साठी) पीप. भांडे, काहील. v.--- अशा भांड्यात ठेवणे / साठविणे. VAT --= Value-added-tax --- विक्रीच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या विक्रेयवस्तूच्या किमतीतील वाढीनुसार संबंधित विक्रेत्यांवर कर आकारण्याची पद्धति.
Vaudeville व्होडव्हिल् n.--- (गद्यपद्यमय) तमाशा.
Vault व्हॉल्ट् v.t.--- उडी मारणे, घुमटाकार करणे. n.--- भुयार, तळघर, डेरा.
Vaunt व्हॉण्ट् v.i.--- बढाई सांगणे. n.--- बढाई, शेखी, वल्गना.
Veer व्हीअर् v.t.--- तोंड फिरविणे, दिशा बदलणे, वळणे.
Vegetarian व्हेजिटेअरिअन् n.--- शाकाहारी, शाकाहार. ‘Vegetarianism’ - पाळणारा माणूस. (पहा: ‘non-vegetarian’). a.--- शाकाहार /शाकाहारी या संबंधीचा. केवळ वनस्पतिजन्य पदार्थांचा (बनलेला), शाकाहारस्वरूपाचा, निरामिष
Vegetarianism व्हेजिटेअरिअनिझम् n.--- केवळ वनस्पतिजन्य खाद्यपदार्थच ((पाले)भाज्या, फळे, धान्य, शेंगातील दाणे इ.) आहारांत ठेवण्याचे तत्व / नियम / व्रत, शाकाहार (व्रत).
Vegetable व्हेज्टबल् / व्हेजिटबल् n.--- भाजी, औषधी. a.--- औषधीचे.
Vegetation व्हेजिटेशन् n.--- वनस्पतीची वाढ.
Vegetate व्हेजिटेट् v.i.--- मोड येणे, कोंब येणे.