Asy-Aug

Asylum अॅसायलम् n.--- आधार, आश्रय, थारा.
At अॅट् prep.--- -स, -शी, -ला, -पाशी, -जवळ, -क्षणीच, -लागलीच.
Atavism अॅटविझम् n.---पूर्वजांच्या गुणांचा अनेक पिढ्याने होणारा ???
Ate एट् v.t.--- खाल्ले.
Atelier अटेल्ये n.--- (कलाकाराची) कार्यशाला, चित्रशाला.
Atheism एथीइझम् n.--- अनीश्वरवाद, नास्तिकवाद.
Atheist एथीइस्ट् n.--- नास्तिक, ईश्वर नाही म्हणणारा.
Atheneum अॅथीनियम् n.--- सरस्वतीमंदिर.
Atherosclerosis अॅथेरोस्क्लेरोसिस् n.--- साठलेल्या ‘cholesterol’ द्रव्याने प्रमुख रक्तवाहिन्यांचे कठिण होणे / लवचिकता गमावणे.
Athirst अॅथर्स्ट् a.--- तहान लागलेला.
Athlete अॅथ्लीट् n.--- पहिलवान, मल्ल, तालिमबाज, कसरतपटु, शारीरिक बाल/कौशल्य जोपासणारे व्यायाम, खेळ इ. कार्यक्रमात भाग घेणारा / त्यांचा अभ्यास करणारा मनुष्य.
Athletic अॅथ्लेटिक् a.--- पहिलवानाचा, जोरदार, कसरतीसंघाचा, ‘Athlete’ -/’Athletics’ -चा (-विषयक)/ -संबंधीचा. (‘Athlete’ सारखा) जोमदार, धष्टपुष्ट, कणखर.
Athletics अ(अॅ)थ्लेटिक्स् n.--- धावणे, चालणे, उद्या मारणे व फेकणे यांमधील कौशल्यांच्या स्पर्धात्मक खेळांचा वर्ग/प्रकार.
Atilt अॅटिल्ट् ad.--- झुकता, पुढे कलता.
Atlas अॅट्लस् n.--- नकाशांचे पुस्तक, मानचित्रावली, मानचित्रे (नकाशे) कोष्टके इ. ची पुस्तिका.
Atmosphere अट्मस्फिअर् n.--- वातावरण.
Atmospheric अॅट्माॅस्फिरिक् a.--- वातावरणाचा.
Atmospherics अॅट्मस्फेरिक्स् n.--- वातावरणातील घडामोडी / उपद्रव.
Atom अॅटम् n.--- परमाणू.
Atomic अॅटाॅमिक् a.--- अतिसूक्ष्म.
Atomism अॅटाॅमिझम् n.--- परमाणुवाद.
Atone अॅटोन् v.t.--- (for) भरून देणे, प्रयश्चित्त घेणे; (पाप, दोष इ.)धुवून काढणे.
Atonement अॅटोन्मेंट् n.--- प्रायश्चित्त.
Atonic अॅटाॅनिक् n.--- धातु क्षीण झालेला.
Atony अॅटाॅनि n.--- धातुक्षीणता.
Atop अॅटाॅप् ad.--- वर, वरती.
Atramental अॅट्रॅमेन्टल् a.--- शाईसारखा काळा.
Atrocious अट्रोशस् a.--- उग्र, क्रूर, राक्षसी, अत्याचारी, अघोरी.
Atrocity अट्राॅसिटी n.--- घोरपणा, उग्रता, अत्याचार, राक्षसी कृत्य, अघोर कृत्य.
Atrophy अॅट्रोफी / अॅट्रफी n.--- (शारीरिक/ अवयवाची) झीज/वठणे/ सुकणे/ वाळणे, झड. v.t.--- झिजविणे, झडविणे. v.i.---झिजणे, वाटणे, ट्रास पावणे.
Attach अॅटॅच् v.t.--- बांधणे, जप्त करणे, स्नेह जोडून घेणे, मन ओढणे, जोडणे, चिकटणे, आरोपणे.
Attache अटॅशे n.--- परराष्ट्र सेवेतील तंत्रज्ञ (अधिकारी)/विशेषज्ञ.
Attached अॅटॅच्ड् a.--- जप्त केलेला, अनुरक्त, आसक्त, आरोपित.
Attachment अॅटॅच्मेंट् n.--- जप्ति, टांच, आसक्ति, ओढा.
Attack अॅटॅक् v.t.--- हल्ला करणे, घाला घालणे. n.---हल्ला, घाला, चढ, मार.
Attain अॅटेन् v.t.--- मिळविणे, सिद्धीस नेणे. v.i.--- पोंचणे, पावणे.
Attainable अॅटेनेबल् a.--- मिलावायाजोगा, साध्य.
Attainder अॅटेन्डर् n.--- सामाजिक हक्क काढून घेणे.
Attainment अॅटेन्मेंट् n.--- सिद्धि, संपादित ज्ञान.
Attaint अॅटेंट् v.t.---दूषण देणे, कलंकित करणे.
Attemper अॅटेम्पर् v.t.--- बेताचा/माफक करणे.
Attempt अॅटेम्पट् v.t.--- उद्योग/प्रयत्न करणे. n.--- उद्योग.
Attend अॅटेंड् v.t.--- बरोबर असणे, सेवा/चाकरी करणे, जवळ असणे.
Attendance अॅटेंडन्स् n.--- हजिरी, जाणे येणे, चाकरी, लक्ष.
Attendant अॅटेन्डन्ट् n.--- बरोबर असणारा, हुजऱ्या.
Attention अॅटेन्शन् n.--- लक्ष, अवधान, ध्यान.
Attentive अॅटेन्टिव्ह् a.--- लक्ष देणारा, तत्पर, एकाग्र.
Attenuate अॅटेन्युएट् v.t.--- पातळ/कृश करणे, बारीक करणे. a.---कृश, पातळ केलेला.
Attest अॅटेस्ट् v.t.--- साक्ष देणे, घालणे, दाखला देणे.
Attestation अॅटेस्टेशन् n.--- साक्ष देणे, साक्ष, दाखला.
Attested अॅटेस्टेड् a.--- साक्षांकित. (हिंदी: साक्षीकृत, अनुप्रमाणित).
Attire अटायर् v.t.--- पोशाख घालणे. n.--- पोशाख
Attitude अॅटिट्यूड् n.--- अंगाची स्थिति, आसन, मनोवृत्ति.
Attorney अॅटर्नि n.--- वकील, प्रतिनिधि, मुखत्यार.
Attract अॅट्रॅक्ट् v.t.--- भुलविणे, आकर्षण करणे.
Attraction अॅट्रॅक्शन् n.--- मोहणे, आकर्षण.
Attractive अॅट्रॅक्टिव्ह् a.--- मोहक, आकर्षक.
Attributable अॅट्रिब्यूटेबल् a.--- कडे लावण्याजोगे, आरोपणीय.
Attribute अॅट्रिब्यूट v.t.--- लावणे, आरोपणे,ठेवणे.
Attribution अॅट्रिब्यूशन् n.--- गुण, धर्म, कडे लावणे.
Attributive अॅट्रिब्यूटिव्ह n. and a.--- विशेषण, गुण.
Attrition अॅट्रिशन् n.--- घर्षण, झिजणे, घस.
Attritive अट्राइटिव्ह् a.--- झिजविणारा, क्षयकारक.
Attune अॅट्यून् v.t.--- सूर लावणे, मिळविणे.
Aubergine ओबर्जीन् n.--- वांगे.
Auburn आॅबर्न् a.--- पिंगट, पिंगा, सोनसळा.
Auction आॅक्शन् n.--- लीलांव.
Auctioneer आॅक्शनीर् n.--- लीलांव लावणारा.
Audacious आॅडेशस् a.--- उद्धट, निर्लज्ज, धीट.
Audacity आॅडाॅसिटी n.--- उद्धटपणा, धीटपणा.
Audible आॅडिबल् a.--- ऐकण्याचा, ऐकू येईसा.
Audibly आॅडिब्लि ad.--- ऐकू येईसा, कानी पडेसा.
Audience आॅडिअन्स् n.--- श्रोते मंडळी, प्रेक्षकवर्ग, राजाची मुलाखत.
Audit आॅडिट् v.t.--- हिशोब तपासून वार करणे. n.--- हिशेबाची तपासणी.
Auditor आॅडिटर् n.--- हिशेब तपासणारा, श्रोता.
Auditory आॅडिटरि n.--- श्रोते मंडळी, पाठशाळा, सभागृह. a.--- श्रवणाचा, श्रवण संबंधी.
Augean आॅजियन् a.--- (Augeas राजाच्या गोठ्याप्रमाणे) अत्यंत घाण, अतिगलिच्छ. Augean stables : अतिशय घाण/किळसवाणी अवस्था, गलिच्छ स्थान.
Auger आॅगर् n.--- सामता, सळई, वेधन.
Aught आॅट् n.--- काहीं तरी, एखादी वस्तू.
Augment आॅग्मेन्ट् v.t.--- वाढवणे. n.--- आगम, वृद्धि.
Augur आॅगर् v.t.--- शकुनावरून तर्क करणे, भविष्य वर्तव पूर्वी सुचविणे, -चे वाचन देणे. n.---
Augury आॅगरि n.--- शकुनवंती, शकुनविद्या.
August आॅगस्ट् n.--- ख्रिश्चन वर्षाचा आठवा महिना, प्रतापी, प्रतापवान, तेजस्वी भव्य.
Augustness आॅगस्टनेस् n.--- प्रताप प्रभाव.