Each ईच् a.--- प्रत्येक, हरएक, एकेक.
Each other ईच् अदर् a.--- एकमेक.
Eager ईगर् a.--- उत्सुक, उतावळा, कळकळीचा.
Eagerly ईगर्लि ad.--- उत्सुकतेने, उत्कंठतेने.
Eagerness ईगरनेस् n.--- उत्सुकता. उतावळी, हांव.
Eagle ईगल् n.--- गरुड.
Eagle-eyed ईगल्-आइड् a.--- सूक्ष्मदृष्टी, तीक्ष्णदृष्टी.
Ear इअर् n.--- कान, लक्ष, धान्याचे कणीस. v.t.--- ऐकणे, नांगरणे. v.i.--- निसवणे, कणीस येणे.
Ear-drop इअर्-ड्रॉप् n.---कानांतील डूल.
Ear-drum इअर्-ड्रम् n.--- कानाचा पडदा.
Ear-less इअर्लेस् a.--- बहिरा.
Ear-ring इअर्-रिंग् n.--- कुंडल, कर्णभूषण.
Ear-shot इअर्-शॉट् n.--- हाकेचा टप्पा/अंतर.
Earwax इअर्-वॅक्स् n.--- कानांताला मळ.
Earwitness इअर्-वुइटनेस् n.--- श्रवणसाक्ष.
Earl अर्ल् n.--- इंग्लंडातील बडे लोकांची पदवी.
Early अर्लि a.--- वेळेच्या पूर्वीचा, वेळेवरचा, पूर्वीचा, पुराणा. Ad.--- लौकर, वेळेवर.
Earn अर्न् v.t.--- मिळवणे, कमावणे, संपादणे.
Earnest अर्नेस्ट् n.--- उत्कंठा, हौस, खरेपणा, कळकळ, विसार, सचकार, हडप. a.--- उत्कंठित, आस्थेवाईक, कळकळीचा.
Earnestly अर्नेस्टलि ad.--- कळकळीने, उत्कंठेने.
Earning अर्निंग् n.--- मिळकत, कमाई.
Earth अर्थ् n.--- पृथ्वी, भूमि, माती, जमीन, जग. v.t.--- गाडणे, पुरणे.
Earthen अर्दन् a.--- मातीची, मृण्मय, मृत्तिकेचा.
Earthly अर्थ्लि a.--- ऐहिक, भूलोकाचा, मातीचा.
Earthquake अर्थक्वेक् n.--- भूकंप, धरणीकंप.
Earthenware अर्दन्वेअर् n.--- मातीची भांडी.
Earth-work अर्थ्-वर्क् n.--- मातीचा कोट.
Earth-worm अर्थ्-वर्म् n.--- गांडूळ, कंजूष, कंगाल.
Earthy अर्दि a.--- मातीचा, मातड, मत्तिकामय.
Ease ईझ् n.--- स्वस्थता, सुख, विसावा, चैन, मुक्ति, अनायास, सहजपण, सुस्ती, समाधान. ‘Ease of’ v.i.--- (पीडा, ओझे, इ.) पासून सोडविणे, मुक्त करणे. v.t.--- (ओझे/दडपण/निर्बन्ध…)हलका/सैल/ढिला करणे. At (one’s) ease : आरामशीर स्थितींत(ला).
Easenature ईझनेचर् v.t.--- शोचास जाणे.
Easel ईझल् n.--- चिताऱ्याचा घोडा. चित्र इ. काढण्याचा कागद, कापड, इ. चा आधारफळा, चौकट, चित्रफलकाधार.
Easily ईझिलि ad.--- हळूच, सहज, अचानक.
Easement ईझ्मेंट् n.--- वहिवाट, चालू वहिवाट.
East ईस्ट् n.--- पूर्व दिशा, पूर्वेकडील देश, प्राची.
Easter ईस्टर् n.--- ख्रिस्ती लोकांचा एक सण. २१ मार्चनंतरच्या पौर्णिमेनंतरच्या रविवारी येणारा ख्रिश्चन धर्मातील क्राइस्टच्या पुनर्जीवनाचा/पुनरुत्थानाचा (resurrection) उत्सवाचा/मेजवानीचा दिवस.
Easterly ईस्टर्लि a.--- पूर्वाभिमुख, पूर्वदिशेचा.
Eastward ईस्टवर्ड् ad.--- पूर्वेकडे, पूर्वदिशेकडे.
Easy ईझि a.--- स्वस्थ, सुखी, भोळा, मृदु, नरम, सोयीचा, सोपा, सुलभ, खुशाल.