Altar आॅल्टर् n.--- स्थंडिल, यज्ञवेदी, पूजामंच, पूजावेदि, पूजाविधि करण्याची जागा.
Alter अॅल्टर् v.t.--- फिरविणे, v.i. ---बदलणे.
Alteration आॅल्टरेशन् n.--- फेरफार, रूपांतर.
Alterable आॅल्टरेबल् a.--- फिराविण्याजोगा.
Altercate आॅल्टरकेट्v.i.--- तोंडास तोंड देणे.
Altercation आॅल्टरकेशन् n.--- कालागत, हमरीतुमरी.
Alternate आॅल्टर्नेट् आळीपाळीने घेणे/येणे. a.--- एक आड एक, आळीपाळीचा. (ad) ly --- आळीपाळीने. a.--- वैकल्पिक पर्याय स्वरूप. Alternate current (संक्षिप्त रूप : A.C.) ad.--- प्रत्यावर्ती (विद्युत-) धारा (ठराविक समान कालावधीनंतर परिणाम व दिशा बदलत राहणारी ) (पहा: Direct Current)
Alternation आॅल्टर्नेशन् n.--- अदलाबदल, आळीपाळी.
Alternative आॅल्टर्नेटिव्ह् n.--- आवडनिवड, विकल्प, वैकल्पिक पर्यायवाची.
Although आॅल्दो con.--- जरी, यद्यपि.
Altitude आॅल्टिट्यूड् ad.--- उंची, ग्रहांची उंची, उन्नती.
Altogether आॅल्टुगेदर् ad.--- अगदी, बिलकूल, सर्वस्वी.
Altruism अॅल्ट्रुइझम् n.--- परार्थासाधना, परार्थवाद.
Altruist अॅल्ट्रुइस्ट् n.--- परार्थसाधक, अन्यार्थरत, ‘Altruism’ चा पुरस्कर्ता.
Altruistic अॅल्ट्रुइस्टिक् a.--- परार्थसाधनवृत्तीचा, परार्थप्रवणवृत्तीचा, परार्थवादसंबंधीचा.
Alum अॅलम् n.--- तुरटी.
Aluminium अॅल्युमिनिअम् n.--- उत्तर अमेरिकेत: Aluminum (अॅल्युमिनम्) n.--- निळसर झाक असलेला, पांढऱ्या रंगाचा मूलाद्रव्यात्मक, वीज व उष्णता चांगल्याप्रकारे वाहून नेणारा, हलका धातू.
Alumni n.--- ‘Alumnus’ चे अनेकवचन.
Alumnus अलम्नस् n.--- (मूळ लॅटिन् अर्थ: स्वापत्यासमान पालन-पोषण करून वाढविलेले मूल), (विशिष्ट शिक्षण संस्थेतून शिक्षित विद्यार्थी) अ. व. Alumni.
Always आॅल्वेझ् ad.--- नेहमी, सदोदित, सदा.
Alzheimer’s disease अल्ट्साइमर्स् n.--- मेंदूतील रक्तवाहिन्यांसम्बंधीचा , मेंदूची शक्ती कमी करून चळ/खूळ लावणारा रोग, अकालीचा म्हातारचळ (जर्मन मज्जातंतुशास्त्रज्ञ, A. Alzheimer 1864-1915, च्या नावावरून)
A.M. / a.m. ए.एम्. = ante meridian (Latin), मध्यान्हपूर्व.
Amain अॅमेन् ad.--- एकदम, तडाख्याने, मोठ्या जोराने.
Amalgam अमॅल्गम् n.--- पारदमिश्र धातू, मिश्रण.
Amalgamate अमॅल्गमेट् v.t.--- मिसळ करणे, दोन वस्तू एकत्र होणे. v.i. जमून जाणे.
Amalgamation अमॅल्गमेशन् n.--- मिसळ, एकीकरण, संमेलन.
Amanuensis अमॅन्युएन्सिस् n. --- मौखिक कथन लेखाबद्ध करणारा, भाषित-लेखक.
Amaranth अमॅरंथ् n.--- कोरांठी, गुल मखमल, चवळीची पालेभाजी.
Amatuer अॅमॅचूर् n.--- शोकाखातर करणारा, शौकी, हौशी, लुडबुड्या, अतज्ज्ञ.
Amateurish अॅमॅचूरिश् a.--- हौसेखातर केलेल्या कृतीचा द्योतक, काच्चेपणाचे/अपरिपक्वतेचे दोप असलेला, अर्धाकच्चा, अपरिपक्व, लुडबुडीच्या स्वरूपाचा.
Amatory अॅमेटरी a.-- प्रेमाचा, प्रणयसंबंधी.
Amaze अॅमेझ् v.t.--- बावरविणे, आश्चर्यचकित/ थक्क करणे.
Amazement अॅमेझ्मॆन्ट् n.--- त्र्धा, विस्मय, आश्चर्य.
Amazon अॅमझन् n.--- शूर पटाईत बायको. Amazons (अ.व.) एक (काल्पनिक?) लढाऊ/शूर स्त्रियांची जात/वंश. यावरून : Amazon : लढाऊ स्त्री, वीरांगना, सुधृड/थोराड/पुरुषी स्त्री. proper noun. --- दक्षिण अमेरिका खंडाच्या ब्राझिल देशातील उत्तर भागांत वाहणारी एक मोठी नदी.
Ambages अॅम्बेजिझ् n.---चर्पटपंजरी, द्राविडी प्राणायाम.
Ambassador अॅम्बॅसेडर् n.--- राजावाकील, दूत.
Amber अॅम्बर् n.--- एक सुगंधी पदार्थ, तृणमणी, पाइन वृक्षाच्या चिकापासून बनलेला पिवळसर स्फटिक - एक रत्न म्हणून गणलेला. सोने व चांदी यांचा मिश्र धातू.
Ambience अॅम्बिअन्स् n.--- वातावरण.
Ambient अॅम्बिअन्ट् n.--- वेष्टनारा, परिवेष्टणकर्ता.
Ambidexter अॅम्बिडेक्स्टर् n.--- सव्यसाची.
Ambiguity अॅम्बिग्युईटि n.--- संदिग्धता.
Ambiguous अॅम्बिग्युअस् a.--- दुटप्पी, संदिग्ध.
Ambit अॅम्बिट्n.--- घेर, आवार, व्याप.
Ambition अॅम्बिशन् n.--- महत्वाकांक्षा, हाव.
Ambitious अॅम्बिशस् a.--- महत्वाकांक्षी.
Ambivalence अॅम्बिवॅलन्स् n.--- द्विधा वृती, अनिश्चय; द्वैधी भाव, दोन विरोधी / विसंगत गुणांचे / वृत्तींचे सहास्तित्व.
Ambivalent अॅम्बिवॅलन्ट् n.--- परस्पर विरोधी गुण/भाव/वृत्ती धारण करणारा.
Ambivert अॅम्बिवर्ट् n.--- अंतर्मुख व बहिर्मुख अशा दोन्ही वृत्ती असणारी व्यक्ति (introvert व extrovert).
Amble अॅम्बल्n.--- तुर्की चाल. v.i. तुर्की चालीने निवांत/सावकाश/संथ चालणे.
Amblyopia अॅम्ब्लिओपिआ n.---दुर्ब/कमजोर/क्षीण दृष्टी.
Amblyopic अॅम्ब्लिओपिक् a.--- दुर्बल दृष्टीचा/संबंधींचा.
Ambrosia अॅम्ब्रोसिआ n.--- अमृत, सुधा.
Ambrosial अॅम्ब्रोसिअल् a.--- स्वर्गीय, दैवी.
Ambulance अॅम्ब्यूलन्स् n.--- फिरंता दवाखाना, जखमी लोकांना नेण्याची गाडी.
Ambush अॅम्बुश् n.--- लपून रहाण्याची जागा, दाबा धरण्याची जागा, दाबा धरून राहिलेली फौज, दाबा, दडी, दाबा धरून बसणे, हल्ला.
Ameliorate अॅमिलिओरेट् v.t.--- नीट करणे, सुधारणे.
Amenable अॅमिनेबल् a. --- जाब देणारा, अधिन, वश्य.
Amend अॅमेन्ड् v.t. --- दुरुस्त करणे,दोष काढणे, सुधारणे. v.i. ठीक होणे, ताळ्यावर येणे.
Amended अॅमेन्डेड् a.--- दुरुस्त केलेला.
Amendment अॅमेन्डमेंट् n.--- सुधारणा, दुरुस्ती, शोध.
Amends अॅमेन्ड्स् n.--- वचपा, मोबदला.
Amenity अमिनिटी n.--- रम्यता, स्थलप्रियता.
Amenorrhoea अमेनोरीअ n.--- ऋतूस्त्रावाभाव, रुतुस्त्रावावरोध.
Amerce अॅमर्स् v.t.--- द्रव्यदंड करणे.
Americana अमेरिकाना / अमेरकाना p.n.--- ब्राझील देशांतील एक शहर. a.--- अमेरिकेची वैशिष्ट्ये असलेला. n. --- अमेरिकेची माहिती, कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण अमेरिकी वस्तू.
Amethyst अॅमेथिस्ट् n.--- एक जातीचा पाषाण.
Amiable एमिएबल् a.--- सुशील, गोड स्वभावाचा, भला.
Amicable अॅमिकबल् a.--- स्नेहाचा, गोड, सख्याचा.
Amicus Curae अॅमिकस् क्यूरिए n.--- (=Friend of court), पक्षकार, पक्श्वकील नसूनही न्यायालयास एखाद्या प्रकरणी सल्ला व सूचना देणारी (कायदेपंडित) व्यक्ति.
Amid अॅमिड् prep.--- Amidst अॅमिड्स्ट् prep.--- मध्ये, मधी.
Amiss अॅमिस् ad.--- विपरीत, भलते. a.--- गैरवाजवी, अयोग्य.
Amity अॅमिटि n.--- मैत्री, सख्य, मित्रभाव.
Ammonia अॅमोनिआ n.--- एक क्षार, अमोनिआ, नवसागर.
Ammunition अॅम्यूनिशन् n.--- लधाऎचॆ सामग्री, दारूगोळा.