Pry-Puf

Pry प्राय् v.t.--- तरफेने उचलणे / हालविणे, उचलून / हालवून उघडणे. n.--- तरफ / तरफेसारखे वापरण्याजोगे हत्यार. V.i.--- बारीक बघणे, टेहळणे, डोकावणे, चोंबडेपणाने चौकशी करणे.
Psalm साम् n.--- स्तोत्र, गाणे. v.t.--- स्तोत्र म्हणणे.
Psalmist सामिस्ट् n.--- स्तोत्रकार, स्तोत्रकवि.
Psalmody सॅल्मोडि n.--- स्तोत्रगान.
Psephology प्सि/सिफॉलॉजी n.--- निवडणुकीच्या निकालाचा / लोकमताचा अंदाज बांधण्याचे शास्त्र.
Pseudo- स्यूडो / प्स्यूडो --- नकली / बनावट, खोटा अशा अर्थी नामें व विशेषणें यांना लागणारे उपपद (स्वरापूर्वी Pseud-).
Pseudologist स्यू(प्स्यू)डॉलॉजिस्ट् n.--- असत्य भाषण करण्यांत प्रवीण, खोटारडा, थापाडा, थापेबाज.
Pseudology स्यू(प्स्यू)डॉलॉजी n.--- खोटे बोलण्याची कला / रीत / शास्त्र, (पद्धतशीर) असत्यभाषण.
Pseudonym स्यू(प्स्यू)डोनिम् / स्यू(प्स्यू)डनिम् n.--- नकली- / खोटे- / टोपण- नाव, छद्मनाम, उपनाम, कृतकनाम.
Pseudonymity स्यू(प्स्यू)डॉनिमिटि n.--- छद्मनामता.
Pseudonymous स्यू(प्स्यू)डॉनिमस् a.--- खोट्या नावाने / नावाखाली लिहिलेला छद्मनामी.
Psychedelic साय्किडेलिक् a.--- भ्रम / अद्भुत अनुभव उत्पन्न करणाऱ्या द्रव्या- / औषधि- संबंधीचा.
Psychiatric साय्किअॅट्रिक् a.--- ‘Psychiatry’ -संबंधीचा.
Psychiatrics साय्किअॅट्रिक्स् n.--- ‘Psychiatry’ चे शास्त्र व त्याचा व्यावाहारिक उपयोग / विनियोग करण्याचे तंत्र.
Psychiatrist साय्काय्ट्रिस्ट् n.--- ‘Psychiatry’ चा अभ्यासक / तज्ज्ञ, मनोविकृतिचिकित्सक.
Psychiatry साय्काय्ट्री n.--- मनोविकारावरील उपचारांचे शास्त्र, मानसोपचारशास्त्र. मनोविकृतिचिकित्सा.
Psychic साय्किक् a.--- भ्रमिष्ट, आविष्ट, मनोविकृतिप्रवण. = Psychical.
Psychical साय्किकल् a.--- मानसिक, मनोविकृतिजन्य.
Psychological साय्कलॉजिकल् a.--- “Psychology’ संबंधीचा. (शिथिलपणे) = Psychical.
Psychology साय्कॉलॉजी n.--- आध्यात्मविद्या.
Psychopath साय्कपॅथ् n.--- हिंसाप्रवण मनोविकृतीने ग्रस्त मनुष्य, पिसाळलेला वेडा.
Psychosis साय्कोसिस् n.--- तीव्र स्वरूपाची मानसिक विकृति, वेड, खूळ. (pl. Psychoses).
Psychosomatic सायकोसमॅटिक् a.--- मानसिक वा शारीरिक घटकांच्या मिश्र व परस्पर परिणामांसंबंधीचा. परस्परविकारक मानसिक व शारीरिक अवस्थांनी घटित.
Pub पब् n.--- मद्य-विक्री- / मद्य-पान- -गृह, दारूगुत्ता. पिठा. मधुशाला.
Puberty प्यूबर्टि n.--- तारुण्य, उमेद, यौवन, मद.
Pubescent प्यूबेसण्ट् a.--- वयांत आलेला.
Pubic प्यूबिक् a.--- ‘Pubis’ -चा / -विषयक /-वरील. (माणसाच्या) जननेंद्रियावरील (पृष्ठ-)भागाचा.
Pubis प्यूबिस् n.--- पुढील / समोरील जघनास्थि.
Public पब्लिक् a.--- सार्वजनिक, राष्ट्रीय, उघड, जाहीर, प्रसिद्ध. n.--- लोक.
Publican पब्लिकन् n.--- जकातदार, कलाल, खानावळ्या.
Publication पब्लिकेशन् n.--- प्रकाशन, प्रकटीकरण.
Publicity पब्लिसिटि n.--- प्रसिद्धि, परिस्फोट, लौकिक.
Publish पब्लिश् v.t.--- छापून जाहीर / प्रसिद्ध करणे.
Publisher पब्लिशर् n.--- प्रकाशक, प्रसिद्ध करणारा.
Puce प्यूस् n./a.--- तपकिरी-जांभळा (रंग).
Pucker पकर् v.t.--- मुरडणे, सुरकुतणे. n.--- मुराद, सुरकुत, चूण, चिंता, गोंधळ. Pucker up --- तोंडाचा (वगैरे) चंबू करणे.
Puckish पकिश् a.--- खट्याळ, खोडसाळ.
Pudding पुडिंग् n.--- एक खाण्याचा पदार्थ, खाद्य. तांदूळ, साबुदाणा इ. च्या पिठाच्या भाजणीचे / उकडीचे / तळणीचे, मऊ / माध्यम घट्ट, वडी / लाडू / करंजीसारखे पक्वान्न. म्हण: The proof of the pudding is in the eating = एखाद्या गोष्टीचा साक्षात / प्रत्यक्ष अनुभव हाच तिच्या योग्यतेचा खरा निकष. (संस्कृत मध्ये : ‘भक्षणैकसुसंवेद्या रुचिरन्नस्य तत्वतः’)
Puddle पडल् n.--- डबके, डबरा. v.t.--- गढूळ करणे.
Pudendum प्युडेन्डम् n.--- बाह्य जननेंद्रियप्रदेश, जघन (विशेषतः स्त्रीचा). (अनेकवचन : Pudenda - अधिक प्रचलित.)
Pudendum muliebre प्युडेन्डम् म्यूलिएब्रि n.--- स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय, स्त्रीयोनी.
Puerile प्यूअराइल् a.--- पोरकट, छचोर, विचकट.
Puerility प्यूरिलिटि / प्यूअरिलटि n.--- पोरकटपणा, मूर्खपणा.
Puerperal प्युअर्परल् a.--- प्रसूतिसंबंधित, प्रसूति -सह /-पाठोपाठ उद्भवणारा.
Puff पफ् v.t.--- फुगवणे, फुंकून उडवणे, स्तोम वाढवणे. धापा टाकणे, धापा टाकीत जाणे. n.--- बढाई, फुशारकी, फुंकर, फुंकारा. झुरका, निःश्वास, झोत, धूर इ. ची छटा / रेखा / वलय, चूर्ण (पावडर) इ. अंगास लावण्याचा तंतुपुंज / शिरीष. v.i.--- छोट्या झटक्यांनी पुनः पुनः फुंकणे. (बिडी, चिलीम आदि) चे झुरके घेणे व मधून-मधून धूर बाहेर सोडणे. फुगणे. v.t.--- फुगविणे. Puff up--- गर्विष्ठ / अहंकारी बनविणे.
Puffed up a.--- फुगलेला, दर्पाध्मात. (संस्कृत: आध्मात).
Puffy पफी a.--- फुगारा आलेला, सुजलेला; लठ्ठ, जाड्या, गर्विष्ठ, मदाहत.