O ओ int.--- अरे! अहो! हो,हे.
Oaf ओफ् n.--- मूर्ख, दगड, ढ, गैदी.
Oafish ओफिश् a.--- मूर्ख, जड, ढ.
Oakum ओकम् n.--- जुन्या दोरीचा काथ्या.
Oar ओर् n.--- वल्हे, नौकादंड. v.t.--- वाल्हे मारणे.
Oasis ओएसिस् n.--- वाळवंटातील ओलाव्याची जागा.
Oat ओट् n.--- एक प्रकारचे धान्य.
Oath ओथ् n.--- शपथ. With an oath - शपथपूर्वक.
Oathbreaking ओथ्ब्रेकिंग् n.--- प्रतिज्ञा-/शपथ- -भंग.
Obduracy आॅब्ड्यूरसि n.--- पापाणीग्रह, मनाचे काठिण्य, हटवादीपणा, दुराग्रह, अडेलतट्टूपणा.
Obdurate आॅब्ड्यूरेट् a.--- पापग्रही, हट्टी, कठोर, दुराग्रही, हृदयशून्य.
Obedience ओबीडिअन्स् n.--- आज्ञाधारकपणा.
Obedient ओबीडिअन्ट् a.--- आज्ञाधारक, हुकमी.
Obeisance ओबेसन्स् n.--- नमस्कार, नमन, प्रणाम, रामराम, मुजरा, सलाम, जयगोपाळ, जोहार, अभिनंदन, आदर, निष्ठा.
Obelisk आॅबलिस्क् n.--- चार बाजूंचा वर चिंचोळा होत जाणारा स्तंभ.
Obese ओबीस् a.--- स्थूल, फोपसा, लठ्ठ, तुंदिल.
Obesity ओबीसिटी n.--- स्थौल्य, तुंदिलता, शारीरिक लठ्ठपणा.
Obey ओबे v.t.--- आज्ञा पाळणे, हुकुमांत राहणे.
Obfuscate आॅब्फस्केट् v.t.--- आवृत्त करणे; (समाजात) अडथळा आणणे; गोंधळात टाकणे, बुचकळ्यात पाडणे.
Obiter आॅबिटर् (= by the way) ad.--- जातां जातां, सांगणाच्या ओघात. a.--- जाता जाता सांगितलेला, स्वैरोक्तीच्या स्वरूपाचा, आनुषंगिक (व म्हणून बंधनकारक नसलेला). Obiter dictum (plural : dicta) --- न्यायाधीशाने / न्यायालयाने प्रतिपादनाच्या ओघांत सांगितलेला पण चाललेल्या कामाशी अप्रस्तुत वा अनावश्यक असा नियम वा कायदा वा कायद्याचा अर्थ वा निकर्ष, ‘वाह्यात विधान’, स्वैरोक्ति. अप्रकृत पण आनुषंगिक (सिद्धांत)वचन.
Obituary आॅबिट्युअरि n.--- मृत्युलेख, मृतयूची नोंद, मृत्यूची नोंदवही. a.--- मृत्यु(नोंद)-विषयक.
Object आॅब्जेक्ट् n.--- विषय, पात्र, आशय, पदार्थ, हेतू, कर्म. v.t.--- दोष काढणे, आक्षेप घेणे. v.i.--- अडचण सांगणे, तक्रार आणणे, आडवा येणे, हरकत घेणे.
Objectification आॅब्जेक्टिफिकेशन् v.t.--- वस्तुनिष्ठा, वस्तुनिष्ठता, वस्तूकरण, विषयीकरण.
Objection आॅब्जेक्शन् n.--- आक्षेप, हरकत, बाध.
Objective आॅब्जेक्टिव्ह् a.--- वस्तुविषयक, बाह्य, वस्तु (स्थिति-)-निष्ठ.
Objectless आॅब्जेक्ट्लेस् a.--- निर्हेतुक, व्यर्थ.
Oblate आॅब्लेट् a.--- दोन्ही बाजूंस चपटे.
Oblation आॅब्लेशन् n.--- बळी, देवबळी, देवोपहार, बलि-दान.
Obligate आॅब्लिगेट् v.t.--- बांधणे, गुंतवणे, अडकवून / बांधून घेणे, गुंतवून घेणे. (eg. Let the law obligate every candidate to declare on oath that he has no undeclared wealth overseas.)
Obligation आॅब्लिगेशन् n.--- आवश्यकता, उपकार, नियम, प्रतिज्ञा, आभार, जामीनगत. कर्तव्य, बांधिलकी, दायित्व.
Obligatory आॅब्लिगेटरी a.--- बंधक, आवश्यक.
Obligatoriness आॅब्लिगेटरिनेस् n.--- कर्तव्यता.
Oblige ओब्लाइज् v.t.--- भाग पाडणे, बांधणे, उपकाराने बांधणे, उपकार करणे, भाग आणणे.
Obliging ओब्लाइजिंग् a.--- उपकारशील, उपकार करणारा.
Oblique आॅब्लिक् a.--- तिरका, वाकडा, कलता.
Obliquely आॅब्लिक्लि ad.--- तिरका, तिरकस, ओझरता.
Obliquity आॅब्लिक्विटि n.--- वांक, तिरकेपणा, चळ, वक्रता, असदाचरण, नीतिभ्रष्टता.
Obliterate आॅब्लिटरेट् v.t.--- पुसून टाकणे, बोळा फिरविणे, नाहीसा करणे, विसरविणे.
Obliteration आॅब्लिटरेशन् n.--- लोप, संहार, नाश.
Oblivion आॅब्लिव्हिअन् n.--- विस्मृति, गुन्ह्याची माफी, दोषविस्मरण.
Oblivious आॅब्लिव्हिअस् a.--- विसराळू, विसरणारा, शुद्ध नसलेला, गैरसावध.
Oblong आॅब्लाँग् a.--- लांबोडा, दीर्घ, चतुरस्त्र.
Obloquy आॅब्लोक्वि n.--- निंदोक्ति, कुत्सा, निंदा.