pav-ped

pavillion पॅव्हिलिअन् / पव्हिल्यन् n.--- तंबू, डेरा, छत, मांडव, (सभा-)मंडप, शामियाना. क्रीडांगणास लागून असलेली, खेळाडू, प्रेक्षक, इत्यादीस आवश्यक सोयींनी युक्त इमारत / मंडपयुक्त जागा.
paw पॉ n.--- पंजा. v.t.--- भुई टापरणे, गोंजारणे.
pawn पॉन् n.--- गहाण, प्यादे, दुसऱ्यासाठी कामी येणारी / वापरली जाणारी व्यक्ति / वस्तु. v.t.--- गहाण ठेवणे.
pawnbroker पॉन्ब्रोकर् n.--- गहाण-ठेवीवर सावकारी करणारा.
pawnshop पॉन्शॉप् n.--- गहाणठेवीचे व्यवहार करणारे दुकान / पेढी.
pax पॅक्स् n.--- शांति (peace) (लॅटिन). Pax Romana / Britannica / Americana --- रोमन सत्तेखालील / साम्राज्यांतर्गत शांतजीवन / शांतिपर्व.
pay पे v.t.--- देणे, पगार देणे. n.--- पगार, मुशाहिरा, तैनात, वेतन, रोजमुरा. Pay off --- फेडणे.
pay-off पे-आॅफ् n.--- फल, फलित, लाभ, प्राप्ति. शेवट, अंत, कळस, अखेर कळीची / मुद्द्याची गोष्ट. v.t.--- (कामगार इ.) -ला देणे देऊन टाकून कामावरून कमी करणे / काढणे. (कर्ज इ.) ची पूर्ण परतफेड करणे. v.i.--- लाभदायी होणे, फायद्याचे असणे.
payable पेएबल् a.--- फेडण्याजोगा, द्यायाजोगा.
payee पेई n.--- ज्याला पैसे द्यावयाचे तो.
payment पेमेंट् n.--- फेड, पैसे देणे, बक्षीस. धन(प्र)दान, धन - निस्तार / - निराकरण / -निष्कृति / - संपूर्ण / - पूर्ति. (हिंदी: अदायगी, भुगतान).
pea पी n.--- वाटाणा.
peace पीस् n.--- मौन, शांतता, तह, सलोखा.
peaceable पीसेबल् a.--- गरीब, साळसूद.
peacebreaker पीस्ब्रेकर् n.--- शांततेचा भंग करणारा.
peaceful पीस्फुल् a.--- शांत, स्वस्थ, निरुपद्रवी, सालस.
peacemaking पीस्मेकिंग् n.--- समेट, मिटवामिटव.
peacock पीकॉक् n.--- मोर.
peahen पीहेन् n.--- लांडोर.
peak पीक् n.--- कोच, पर्वताचे टोक, शृंग, आग्रा, सर्वोच्च
peal पील् v.t.--- दणदणणे, कडाडणे. n.--- दणका, दणदणाट, घणघणाट, समस्वर घंटा.
peanut पीनट् n.--- भुईमूग-(शंग-)दाणा. भुईमूग झाड.
peanuts पीनट्स् n.--- क्षुल्लक / अत्यल्प / मूल्यहीन गोष्ट. दमड्या.
pear पेअ(र्) n.--- निवडुंग. (पेरू सामान) एक फळ, त्याचे झाड.
pearl पर्ल् n.--- मोती. Pearly पर्लि a.--- मोत्यासारखा.
peasant पेझन्ट् n.--- शेतकरी, गावंढळ, नांगऱ्या.
pebble पेबल् n.--- गोटा, गार, गोटी.
peccadillo पेकडिलो n.--- क्षुल्लक अपराध, खोडी, कुचेष्टित, दुश्चेष्टित. (pl. Peccadilloes / Peccadillos).
peck पेक् v.t.--- चोचीने मारणे, टिपणे, टोचणे. -ला चोचीने / टोकदार साधनाने (पुनःपुनः) मारणे / टिपणे. -ला (अशा मारण्याने) छेद / पोचा करणे. v.t./v.i.--- हलकेच चुंबिणे. अनिच्छेने / थोडेथोडे / वचावचा खाणे / चाखणे. n.--- चोचीने इ. मारलेली टोची / टोचा. पट्कन घेतलेले चुंबन. (eg. We all get steamed up about Shabana Azmi giving a tiny peck to Nelson Mandela and vice versa.)
pectoral पेक्टरल् n./a.--- छातीचा, छातीसंबंधीचा (भाग), छातीवर धारण करण्याचा, दम्याचे औषध.
peculate पेक्युलेट् v.--- (संपत्तीचा-विशेषतः सरकारी मालकीच्या-) अपहार करणे.
peculation पेक्युलेशन् n.--- (सरकारी नोकराद्वारा सरकारी संपत्तीचा) अपहार.
peculator पेक्युलेटर् n.--- (सरकारी) पैसे खाणारा (सरकारी नोकर).
peculiar पेक्यूलिअर् a.--- असामान्य, विलक्षण.
peculiarity पेक्यूलिअॅरिटि n.--- विशेष, गुण-लक्षण.
peculiarly पेक्यूलिअर्लि ad.--- विशेषतः.
pecuniary पेक्यूनिअरि a.--- पैशाचा, द्रव्याचा.
pedagogic पेडॅगॉजिक् a.--- शिक्षकाचा, पांडित्याचा.
pedagogics पेडगॉगिक्स् n.--- उपदेशाचे शास्त्र / कला.
pedagogue पेडगॉग् n.--- उपदेशक, प्रवचनकार, व्याखानबाज, (उपदेश-)पांडित्य मिरवणारा.
pedagoguism / Pedagogism पेडगॉगि(जि)झम् n.--- ‘Pedagogy’ / ‘Pedagogue ची पद्धति / रीत / तत्वज्ञान.
pedagogy पेडगॉ (गो) गी (जी) n.--- शिक्षणाचे कार्य/शास्त्र/कला. उपदेशाचा / प्रवचनाचा व्यवसाय / काम. शिक्षण, विनायाधान.
pedal पेडल् n.--- पावडा, पावठी. v.--- पावडया च्या साहाय्याने चालविणे; पावडे चालविणे / मारणे (पायांनी, हाताने इ.). (प्रकरण इ.) हाताळणे / चालविणे.
pedant पेडन्ट् a.--- विद्येचा गर्व वाहणारा, कर्मठ.
pedantic पडॅण्टिक् a.--- विद्येचा गर्व असणारा, चिडखोर, दिमाख दाखविणारा.
pedantry पेडण्ट्री n.--- पांडित्याचे अनुचित प्रदर्शन; फुकाचे (व्यर्थ) पांडित्य.
peddle पेडल् v.t.--- फिरत किरकोळ विक्री / व्यापार / प्रचार करणे.
peddler पेड्लर् n.--- = pedler = pedlar
pedestal पेडेस्टल् n.--- खांबाचा बुंधा, उथळी, पाया.
pedestrian पेडेस्ट्रिअन् n.--- पायी चालणारा, पादचारी. a.--- पायी चाळण्या(संबंधी)चा, सर्वसाधारण, सर्वसामान्य, नित्याचा.
pedicle पेडिकल् n.--- देठ.
pedicure पेडिक्युअर् n.--- पाय / पायाची नखे निरोगी / सुंदर ठेवण्याची पद्धति / उपचार. (पहा: ‘Manicure’).
pedigree पेडिग्री n.--- वंशावळ, वंशपरंपरा. a.--- शुद्ध वंशाचा, कुलीन.
pedlar पेड्लर् n.--- किरकोळ विक्री / धंदा / प्रसार / प्रचार करणारा फेरीवाला.
pedlary पेड्लरी n.--- ‘Pedlar’ चा धंदा / व्यवसाय. क्षुल्लक, तुच्छ गोष्ट / वस्तु.
pedler पेड्लर् n.--- फेरीवाला, हिंडून माल विकणारा.
pedlery पेड्लरी n.--- फेरीवाल्याचा माल / धंदा.
pedophile = Paedophile.
pedophilia = Paedophilia.