Viz-Vul

Viz व्हिझ् ad.--- म्हणजे.
Vizard व्हिझर्ड् n.--- मुखवटा.
Vizier वजीर् n.--- वजीर, प्रधान.
Vocable व्होकेबल् n.--- शब्द.
Vocabulary व्होकॅब्युलरी n.-- शब्दसंग्रह, शब्दसंपत्ति; शब्दांचा साठा / पसारा.
Vocal व्होकल् a.--- वाणीचा, वाचेचा, वाग्युक्त, तोंडाचा, सुस्वर. मनुष्यवाणीचा, मनुष्यवाणीसाठी रचलेला, मनुष्यवाणीने गावयाचा / गाइलेला. वाक्शक्तियुक्त, शब्दकारी, स्पष्ट / आग्रहाने बोलणारा.
Vocalist व्होकलिस्ट् n.--- गायक, गाणारा.
Vocally व्होकली ad.--- वाणीने, वाचेने.
Vocation व्होकेशन् n.--- उद्योग, धंदा, काम.
Vociferate व्होसिफरेट् v.t.--- पुकार करणे.
Vociferation व्होसिफरेशन् n.--- पुकार, गोंगाट.
Vociterous व्होसिटेरस् a.--- गोंगाट्या. आरडाओरडा करणारा, आरडाओरड्याने भरलेला.
Vogue व्होग् n.--- प्रचार, प्रघात, चाल, रूढि, मान्यता, प्रसिद्धि.
Voice व्हॉइस् n.--- आवाज, स्वर, वाचा, मताधिकार, प्रयोग. With one voice --- एकमताने. Active voice --- कर्तरी प्रयोग. Passive voice --- कर्मणी प्रयोग.
Voiceover व्हॉइसोव्हर् n.--- रंगमंचावर / पडद्यावर न दिसणाऱ्या व्यक्तीचे शब्द / भाषण. आकाशभाषित.
Void व्हॉइड् a.--- शून्य, वांचून, पोकळ, निरर्थक. n.--- शून्यता, पोकळी.
Volatile व्हॉलटाइल् a.--- उडून जाणारा, चंचल. बाष्पीभवनशील, अस्थिर, उच्छृंकल; (परिस्थिति इ.) स्फोटक, तंग, तणावयुक्त, क्षोभप्रवण.
Volcanin व्होल्केनिन् a.--- ज्वालामुखीचा, ज्वालामुखीच्या उष्णतेने विकृत.
Volcano व्होल्कॅनो n.-- ज्वालामुखी पर्वत.
Volition व्होलिशन् n.-- इच्छा, संकल्प, निश्चय.
Volley व्हॉली n.--- (अस्त्रांचा इ.) सातत्याने / पाठोपाठ प्रक्षेप(ण) / भडीमार / मारा. स्फोट (मालिका). चेंडू इ. ला हवेतल्या हवेत झुलवत / फेकत ठेवण्याची (खेळांतील) प्रक्रिया.
Volt व्होल्ट् n.--- विद्युत-प्रवाहाचा जोर / शक्ति मोजण्याचे माप.
Volt face व्होल्ट फास: विरुद्ध दिशेला मोहरा वळविणे; कोलांटी घेणे, उलटी भूमिका घेणे.
Voltage व्होल्टेज् n.--- विद्युत-प्रवाहाच्या जोराचे / शक्तीचे प्रमाण.
Volubility व्हॉल्युबिलिटि n.--- चपलता, वाक्चापल्य.
Voluble व्हॉल्युबल् a.--- चपळ, वाक्पटु, लुबलुब करणारा.
Volume व्हॉल्यूम् n.--- पुस्तक, विळखा, लोळ, लोंढा. (ध्वनीतील) जोर, ध्वनीची प्रबलता / तारता / जोर. (पहा: ‘pitch’, ‘Intensity’)
Voluntarily व्हॉलन्टरिलि ad.--- आपखुषीनें, आत्मसंतोषाने.
Voluntary व्हॉलन्टरि a.--- स्वेच्छाचारी, आपखुषीचा.
Volunteer व्हॉलन्टीअर् n.--- आपखुषीने काम करणारा.
Voluptuary व्हॉलप्च्युअरी n.--- विषयासक्त व्यक्ति.
Voluptuous व्हॉलप्च्युअस् a.--- विलासी, गुलहौशी, कामोद्दीपक. विषयसुखद. इंद्रियसुखजन्य. विषयासक्त.
Volvulus व्हॉल्व्ह्यूलस् n.--- आंतडें दुमडून / त्याची गाठ पडून आतड्या-/तील प्रवाहास आलेला अडथळा.
Voodoo व्हूडू n.--- अंधश्रद्धा / अंधविश्वास यावर आधारित क्रिया / विधि (चेटूक, बळी इ.). ‘व्हूडू’ आचरणारी जमात.
Vomit व्हॉमिट् v.i.--- ओकणे. n.--- ओकारी.
Vomiting व्हॉमिटिंग् n.--- ओकणारा.
Voracious व्होरॅशस् a.--- अधाशी, खाबू.
Votary व्होटरी n.--- विशिष्ट धर्म, पंथ, देवता, विचारप्रणाली इ. चा निष्ठावान् भक्त, एकनिष्ठ / कट्टर पुरस्कर्ता.
Vortex व्होर्टेक्स् n.--- भोवरा, चक्कर, आवर्त. चक्रीवादळ, चक्रवात.
Vote व्होट् v.t.--- मत-संमति देणे. n.--- मत, संमति.
Vouch व्हाउच् v.t.--- खातरी देणे, साक्षी देणे.
Voucher व्हाउचर् n.--- दाखला, दस्तऐवज.
Vouchsafe व्हाउच् सेफ् v.t.--- प्रदान करणे, बहाल करणे. (वर, कृपाप्रसाद म्हणून) देणे. प्रसन्न होणे / होऊन (....करण्यास) प्रवृत्त होणे. कृपा करून देणे.
Vow व्हाउ v.i.--- नवस करणे. प्रतिज्ञा घेणे, शपथ वाहणे, व्रत / वसा घेणे. n.--- नवस, आणभाक. व्रत, वसा, प्रतिज्ञा.
Vowel व्हाउवेल् n.--- स्वर.
Voyage व्हॉएज् n.--- सफर, जलपर्यटन.
Voyager व्हॉएजर् n.--- सफर करणारा.
Voyeur व्हायर् n.--- दृष्टिसंभोगी कामोद्दीपक गोष्टींच्या दर्शनांत आनंद घेण्यात / दर्शनाने तृप्त होणारा (इसम). आंबटशोकी, गलिच्छ-/अश्लील (व्यक्ति), दृष्टिसुखप्रिय (माणूस).
Voyeuristic व्हायरिस्टिक् a.--- ‘voyeur’-संबंधीचा / -स्वरूपाचा. दृष्टिसुखासक्त, केवळ दृष्टिसुखात समाधान मानणारा.
Vulgar व्हल्गर् a.--- अडाणी जातीचा, असभ्य, पाजी, हलकट. सर्वसाधारण, हीन.
Vulgarism व्हल्गॅरिझम् n.--- अडाणी बोलणे, अपशब्द.
Vulgarity व्हल्गॅरिटि n.--- अडाणीपणा, असभ्यता. हीन अभिरुचि, हलकटपणा.
Vulgate व्हल्गेट् a./n.--- प्रचलित वापरांतील / सर्वसाधारण प्रचारांतील (बायबल इ. प्राचीन ग्रंथांची) प्रत / संहिता.
Vulnarable व्हल्नरबल् a.--- भेद्य, भेदनीय. घर्षणीय. प्रतिकारास दुर्बळ / अक्षम पडणारा.
Vulnarability व्हल्नरबिलिटी n.--- प्रतिकारांतील / टिकून राहण्यांतील / तोंड देण्यातील अक्षमता / दुर्बलता. बाधित / आक्रमित / उत्पीडित होण्याचा स्वभाव / प्रवृत्ति / कल / शीळ. भेद्यता, घर्षणीयता.
Vulpine व्हल्पाइन् a.--- कोल्ह्याचा, कोल्ह्याच्या जातीचा, कोल्ह्यासारखा.
Vulture व्हल्चर् n.--- गिधाड.
Vulturous व्हल्चरस् a.--- लुटारू, गिधाडासारखा, खादाड.
Vulva व्हल्व n.--- स्त्रीयोनीचें बाह्यांग. योनिपुष्प. (पहा: Vagina).