Hooch हूच् n.--- (सवंग / गावठी / अवैध) दारू.
Hood हूड् n.--- नागाचा फणा, टोपरे.
Hoodlum हूड्लम् n.--- पुंड, मवाली.
Hoodwink हूड्विंक् v.t.--- फसविणे, डोळे बांधणे, गूळखोबरे हाती देणे.
Hoof हूफ् n.--- खूर pl. Hooves / hoofs.
Hook हूक् n.--- आंकडा, आंकडी, गळ. v.i.--- वांकडा होणे.
Hooligan हुलिगन् n.--- रस्त्यांत दांडगाई करणारा.
Hoop हूप् v.i.--- पुकारणे. n.--- पुकारा, धांव, कडे.
Hoop-la हूपला n.--- मांडून ठेवलेल्या विविध वस्तूंवर लांबून चाके / कडी फेकून चाकांनी / काड्यांनी वेढलेल्या वस्तू जिंकण्याचा खेळ. अशा खेळासारखा जुगार.
Hoot हूट् v.i.--- घूं घू करणे, घुमणे, हुर्यो करणे. n.--- घूं घूं ! हुर्यो.
Hop हॉप् v.t.--- एका पायाने चालणे, उडत जाणे.
Hopping हॉपिंग् n.--- उडी, लंगडी.
Hope होप् v.t.--- आशा धरणे, उमेद बाळगणे. n.--- आशा, आस्था, उमेद.
Hopeful होप्फुल् a.--- आशावान, होतकरू.
Hopeless होप्लेस् a.--- निराशा, आशाहीन.
Hopper हॉपर् n.--- लंगडशहा, लंगडणारा.
Hooping cough = Whooping cough.
Horde होर्ड् n.--- टोळी, छावणी, बाजारबुणगे.
Horizon होरायझन् n.--- क्षितिज, (ज्ञान इ. चे) विस्तृत क्षेत्र.
Horizontal हॉरिझॉन्टल् a.--- सपाट, क्षितिजाबरोबर.
Hormic हॉर्मिक् a.--- हेतु-/उद्देश-केंद्रित. (McDougall is the founder of hormic psychology.)
Hormone हॉर्मोन् n.--- संप्रेरक, पेशींपासून निघणार्या पेशींच्या हालचालीवर विशिष्ट परिणाम करणार्या अनेक द्रव्यांपैकी एक.
Hormonic हॉर्मोनिक् a.--- संप्रेरकाचा, संप्रेरकसंबंधीचा.
Horn हॉर्न् n.--- शिंग, कर्णा, श्रुंग, तुतारी.
Hornbill हॉर्न्बिल् n.--- धनेश पक्षी.
Horned हॉर्न्ड् a.--- शृंगी, शृंगाचा, शिंगे असलेला.
Hornet हॉर्नेट् n.--- गांधील माशी. पहा: wasp.
Horny हॉर्नि a.--- शिंगाचा, शृंगमय.
Horologer / Horologist हॉरॉलजिस्ट् / हॉरॉलजर् n.--- ‘Horology’ जाणणारा.
Horology हॉरॉलजी n.--- वेळ मोजण्याचे / घड्याळ बनविण्याचे शास्त्र.
Horoscope हॉरस्कोप् n.--- जन्मपत्रिका, ग्रहकुंडली.
Horoscopy होरॉस्कोपी n.--- जन्मकुंडलीशास्त्र (ज्योतिषाची एक शाखा).
Horrendous हॉरेण्डस् a.--- भयप्रद, भीतिदायक.
Horrible हॉरिबल् a.--- भयंकर, अघोर.
Horrid हॉरिड् a.--- भीषण, भयाण, दारुण, घोर.
Horrific हॉरिफिक् a.--- भयप्रद.
Horrification हॉरिफिकेशन् n.--- भयप्रक्रिया.
Horrify हॉरिफाय् v.t.--- धडकी बसविणे, रोमांच आणणे.
Horripilation हॉर्रिपिलेशन् n.--- रोमांच, लोमांच.
Horror हॉरर् n.--- भय, शिसारी, प्रसंग.
Horse हॉर्स् n.--- घोडा, घडवंची, अश्व, घोडेस्वार.
Horsebreaker हॉर्स्ब्रेकर् n.--- चाबूकस्वार, अश्वशिक्षक.
Horsecloth हॉर्स्क्लॉथ् n.--- घोड्याची झूल, नमदा.
Horseman हॉर्स्मन् n.--- घोडेस्वार, अश्ववार(क), अश्ववाह(क).
Horse-play हॉर्स्प्ले n.--- धांगडधिंगा, धुमाळी.
Horse-radish हॉर्स्-रॅडिश् n.--- शेवगा (झाड).
Horsepower हॉर्स्पॉवर् n.--- अश्वसामर्थ्य, ३३००० पौंड एका मिनिटात एक फूट नेणारी यंत्रशक्ति.
Horserace हॉर्स्रेस् n.---
Horseshoe हॉर्स्शू n.--- नाल.
Hortation हॉर्टेशन् n.--- बुद्धिवाद, उपदेश, प्रवचन.
Horticulture हॉर्टिकल्चर n.--- बागाईत, बागकाम.
Hose होज् n.--- पायमोजे, मांडचोळणा.
Hosier होझिअर् n.--- ‘Hosiery’ चा विक्रेता / व्यापारी / व्यावसायिक.
Hosiery होझिअरि n.--- पायमोजे वगैरेचा धंदा. मोजे, (हनुमान-)चड्डी, घट्ट विजार, गांजिफ्रॉक, बनियन, बंदी आदि अंगास लागून /चिकटून घालायचे (घट्ट) कपडे.
Hospice हॉस्पिसस् n.--- धर्मशाळा. यात्रीनिवास. अनाथालय, रुग्णसेवाश्रम.
Hospitable हॉस्पिटेबल् a.--- पाहुणचाराचा.
Hospital हॉस्पिटल् n.--- रुग्णालय, रुग्णशाला.
Hospitality हॉस्पिटॅलिटी n.--- पाहुणचार, आतिथ्य.
Hosanna होझॅना n.--- ‘धावा हो’ ची प्रार्थना. स्तुतिगान, स्तोत्र, आरती.
Host होस्ट् n.--- सैन्य, झुंड, समुदाय, प्रस्थ, यजमान, घरधनी.
Hostage होस्टेज् n.--- शत्रूस दिलेला ओलीस मनुष्य.
Hostel हॉस्टल् n.--- (विद्यार्थी, परिचारिका, इ. चे) (त्या त्या संस्थेने चालविलेले) वसतिगृह.
Hosteler हॉस्टल(र्) = Hostler आॅस्लर् = Ostler n.--- ‘Hostel’ चालविणारा /-चालक. ‘Hostel’ मध्ये राहणारा /-निवासी.
Hostelri हॉस्टल्री n.--- अतिथिगृह, यात्रीनिवास, विश्रामालय.
Hostess होस्टेस् n.--- यजमानीण, घरधनीण.
Hostile होस्टाइल् a.--- प्रतिकूल, वैरी, द्वैषी.
Hostility होस्टिलिटि n.--- वैर, शत्रुभाव.
Hot हॉट् a.--- उष्ण, गरम, तीक्ष्ण, तुंबळ, दारुण, उतावळा, तिखट, खरखरीत, सणसणीत, तापट.
Hotbed हॉट्बेड् n.--- भट्टी, अढी.
Hotblooded हॉट्ब्लडेड् a.--- रागीट, तामसी.
Hotch potch हॉच्पॉच् n.--- विविध पदार्थांचे मिश्रण, काला, भेळ, खिचडी.
Hotel होटेल् n.--- भोजनालय, पोस्तखाना, खाणावळ, अतिथिगृह, विश्रामगृह.
Hound हाउन्ड् n.--- शिकारी कुत्रा. v.t.--- शिकार करणे, मारण्यासाठी / पकडण्यासाठी पाठलाग करणे / हात धुवून मागे लागणे.
Hour अवर् n.--- तास, कलाक, घटका, घडी.
Hourglass आवर्ग्लास् n.--- वाळूचे घड्याळ, तासयंत्र.
Hourhand आवर्हँड् n.--- तासाचा कांटा.
Houri हौरी n.--- परी, सुंदर युवती.
Hourly अवर्लि a.--- हरघडीचा, घडोघडीचा.
House हॉउज् n.--- घर, गृह, मंदिर, घराणे, कुटुंब. v.t.--- -ला घर पुरविणे, -ला जागा देणे. -चे आश्रयस्थान होणे, -ला धारण करणे / सामावणे.
House breaker हॉउस्-ब्रेकर् n.---
Household हॉउस्होल्ड् n.--- घरदार, कुटुंब. a.--- घरगुती.
Housemaid हॉउस्मेड् n.--- मोलकरीण.
Housetax हॉउस्टॅक्स् n.--- घरपट्टी.
Housetop हॉउस्टॉप् n.--- माळवद, धाबे, कौलार.
Housewife हॉउस्वाइफ् n.--- घरधनीण, गृहचारिणी.