orient ओरिएण्ट् v.--- (होकायंत्र इ. तील विशिष्ट (दिशा-) बिंदूवर) बसविणे / स्थापिणे / स्थिर करणे. Orient to --- विशिष्ट परिस्थिति / वातावरण इ. च्या वैशिष्टयांशी oरिचित होणे / करणे / जुळवून घेणे / जुळवून घ्यावयास लावणे / शिकविणे.
orientate ओरिएण्टेट् v.--- = Orient.
orientation ओरिएण्टेशन् n.--- ‘Orient(ate)(v.) करण्याची प्रक्रिया / झाल्याची स्थिति.
oriental ओरिएन्टल् n.--- पूर्वदिशेकडील राहणारा. a.--- पूर्वेकडील, पौर्वात्य, पौरस्त्य प्राच्य.
orifice आॅरिफिस् n.--- तोंड, द्वार, मुख, छिद्र.
origami ऑरिगॅमि n.--- कागदापासून (विशेषतः घड्याघालून) शोभेच्या वस्तु / आकार / चित्रे बनविण्याची जपानी कला.
origin आॅरिजिन् n.--- मूळ, उत्पत्तिस्थान, आरंभ.
original ओरिजिनल् a.--- मूळचा, स्वकल्पित. n.--- मूळ, आरंभ, उगम, अस्सल कृति.
originate ओरिजिनेट् v.t.--- उत्पन्न/प्रारंभ करणे.
originator ओरिजिनेटर् n.--- उत्पादक, काढणारा.
orison ओरिझन् n.--- प्रार्थना.
ornamentation आॅर्नमेन्टेशन् n.--- शोभा, अलंकृत करणे, थाटमाट.
ornament आॅर्नमेन्ट् n.--- अलंकार, दागिना. v.t.--- शोभविणे.
ornamental आॅर्नमेन्टल् a.--- अलंकारिक, शोभेचा.
ornithology आॅर्निथॉलजि n.--- पक्षिशास्त्र, जीवशास्त्रातील पक्षिविषयक भाग.
orphan आॅर्फन् n.--- पोरके मूल. a.--- पोरका. v.t.--- पोरका करणे.
orphanage आॅर्फनिज् n.--- अनाथ मुलांचा सांभाळ करणारी संस्था. अनाथबालकाश्रम.
orpiment आॅर्पिमेंट् n.--- हरताळ.
orrery आॅररि n.--- ग्रहांची गति दाखविणारे यंत्र.
orthodox आॅर्थडॉक्स् a.--- धर्मनिष्ठ, श्रद्धाळू, भोळा. प्रतिष्ठित / प्रभावी / अधिकृत / पारंपरिक मताचे अनुसरण करणारा, सनातनी गतानुगतिक.
orthodoxy आॅर्थडॉक्सि n.--- धर्मनिष्ठा, श्रद्धा. ‘Orthodox’ पणा, सनातनीपणा, पारंपरिकता, गतानुगतिकता.
orthoepy आॅर्थोएपि / आॅर्थोअपि n.--- शब्दांचा, शुद्ध उच्चार.
orthography आॅर्थॉग्रफि n.--- शुद्ध लिहिणे, अक्षरांनी शब्द लिहिण्याचे शास्त्र / रीत.
orthopaedic आॅर्थपीडिक् n.--- ‘Orthopaedics’- विषयक.
orthopaedics / Orthopedic आॅर्थपीडिक्स् n.--- शारीरिक व्यणगावर उपचार करण्याचे शास्त्र.
orthopaedist आॅर्थपीडिस्ट् n.--- ‘Orthopaedics’ चा तज्ज्ञ.
orthopaedy आॅर्थपीडी n.--- =Orthopaedics.
oscillate आॅसिलेट् v.i.--- हेलकावे खाणे, आंदोलणे.
oscillation आॅसिलेशन् n.--- हेलकावा, झोका, झोपा.
oscillatory आॅसिलेटरी a.--- मागेपुढे होणारा.
osculation आॅस्कुलेशन् a.--- चुंबनस्पर्श.
ossicle आॅसिकल् n.--- हाडूक.
ossification आॅसिफिकेशन् n.--- अस्थिरूप होणे.
ossify आॅसिफाय् v.t.--- हाड बनविणे. v.i.--- हाड होणे. कठिण / कठोर / दृढ / कडक होणे.
ossivorous आॅसिव्होरस् a.--- हाड खाणारा, हाडखाऊ.
ossuary आॅस्युअरि n.--- अस्थिपात्र. अस्थिकुहर. अस्थिशाला.
ostensible आॅस्टेन्सिबल् a.--- वरकरणी, दिखाऊ.
ostentation आॅस्टेन्टेशन् n.--- डामडौल, भपका, दंभ.
ostentatious आॅस्टेन्टेशस् a.--- डामडौली, ढोंगी. दिखाऊ, नुसते बाहेरून दिसायला प्रभावशाली असलेले, लक्ष वेधून घेण्यासाठी बनविलेले.
ostler आॅस्ल(र्) n.--- वसतिगृहाचा / अतिथिगृहाचा अश्वचालक.
ostrich आॅस्ट्रिच् n.--- शहामृग.