Cro-Cru

Crooner क्रूनर्
Crook क्रुक् v.t.--- वाकवणे. n.--- आंकडा, आंकडी.
Crooked क्रुकेड् a.--- कुटिल, वक्र, वाकडा, तेढा.
Crookedness क्रुकेड्नेस् n.--- वाकडेपणा, वांक.
Croon क्रून v.--- (सुगम /हलकेफुलके/लोकप्रिय गीतांचे) गायन करणे.
Crooner क्रूनर् n.--- गायक, गायिका (विशेषतः सुगम/साधे/लोकप्रिय गायन करणारा/री).
Crop क्रॉप् v.t.--- खुडणे, -चे पीक/उत्पन्न काढणे/घेणे. (उदा: Animals such as cattle and fish are indispensable to us; they have to be farmed, bred and cropped sensibly.) n.--- पीक, शेंडा, पिशवी. केस कापून नितनेटकी करण्याची क्रिया. अशा तऱ्हेने केलेली केशरचना.
Cropper क्रॉपर् n.--- उत्पन्नातील हिश्याच्या बदल्यात शेतांत काम करणारा शेतकरी. वाटेकरी-शेतकरी. निःपात, विध्वंस, मोड, दुर्दशा. मोठे पतन/अपयश/घोटाळा/बट्ट्याबोळ. ‘To come a cropper : (योजना इ.) फासणे, कोलमडणे, फिसाकाताने, पूर्ण अपयशी/विफल होणे.
Crosier / Crozier क्रोझिअर् n.--- ‘बिशप’ चा दंड/आंकडी.
Cross क्रॉस् n.--- क्रॉस्, वधस्तंभ,विघ्न, संकट. a.--- आडवा, विरुद्ध, तिरसट, साट्यालोट्याचा. v.t.--- आडवा ठेवणे, पार जाणे, फांटा मारणे, खोडणे, परस्परापार जाणे/होणे.
Cross-legged क्रॉस्लेगेड् a.--- आसनमांडी घातलेला.
Cross-question क्रॉस्क्वेश्चन् v.t.--- छेडणे, कसणे.
Cross-road क्रॉस्रोड् n.--- आडवाट, आडवा रस्ता.
Cross-section क्रॉस्सेक्शन् n.--- एखाद्या वस्तूचा आंतील भाग/अंतरंग दाखविणारा, त्या वस्तूच्या इष्ट कोणांत छेदलेल्या कापाचा / फ़ोदॆचा आणतील पृष्ठ भाग.
Crossway क्रॉस्वे n.--- चव्हाटा, तिवाटा.
Crotch क्रॉच् v.i.--- n.---झाडाच्या (खोडापासून फुटणाऱ्या)दोन फांद्यांमधील खोबनॆचा प्रदेश/तत्सदृश दोन फाट्यातील प्रदेश. (मानवाच्या) दोन मांड्यांमधील कोण-प्रदेश/गुह्यांग-प्रदेश.
Crotchety क्रॉच(चि)टी a.--- चिडखोर, तापट, दुराग्रही.
Crouch क्रॉउच् v.i.--- दाबा धरून बसणे, अवयव आखडून बसणे, आर्जव करणे, हांजीहांजी करणे, पाय पोटाशी घेऊन बसने/पडणे.
Crow क्रो n.--- कावळा, काक, काऊ, कोंबड्याचे ओरडणे, पहार, संबळ, तोमर; जनावराचे आतडे. v.i.--- आरवणे, कोकणे.
Crowd क्राउड् n.--- दाटी, गर्दी. v.t.--- दाटी करणे, गच्च करणे, खेटणे, भरून काढणे.
Crown क्राउन् n.--- मुकुट, माथा, सरकार, राज्यसत्ता, एक इंग्रजी नाणे, शिखर. v.t.--- मुकुट घालणे, राज्याभिषेक करणे, सार्थक करणे, कळस करणे. काव काव करणे. (पहा: raven). ‘To eat crow’ v.--- अपमानास्पद पराभव पत्करणे/पत्करावा लागणे.
Crozier क्रोझिअर् n.--- =Crosier.
Crucial क्रूशल् a.--- कडक, खडतर, जिवावरचा, निर्णायक, अत्यावश्यक, महत्वपूर्ण.
Crucible क्रूसिबल् n.--- सोनाराची मूस, आवर्तनी.
Crucifix क्रूसिफिक्स् n.--- ख्रिस्तास क्रूसावर (cross वर) चढविले असल्याचे चित्र/प्रतिमा. v.---
Crucify क्रूसिफाय् v.t.--- क्रूसावर/सुळावर चढविणे.
Crude क्रूड् a.--- कच्चा, अपक्व, कोंवळा, अजीर्ण.
Crudity क्रूडिटि n.--- कच्चेपणा, आमांश, अप्रौढता.
Cruel क्रूएल् a.--- निर्दय, क्रूर, उग्र, निष्ठुर.
Cruelty क्रूएल्टि n.--- निर्दयता, क्रूरपणा, क्रूरता.
Cruise क्रूझ् v.i.--- समुद्रात फिरणे, समुद्रात नौका इ. मधून फेरफटका मारणे; रस्त्यावर (रमतगमत) फिरणे; सहजासहजी प्रगति करत जाणे. (विमान आदींचे-) चांगल्या किफायतशीर वेगाने जात राहणे. n.--- समुद्रपर्यटन.