Rec-Red

Recalcitrance रिकॅल्सिट्रन्स् n.--- मुर्दाडपणा, हटवादीपणा; शिस्तभंग, गैरशिस्त.
Recalcitrant रिकॅल्सिट्रन्ट् a./n.--- हटवादी विरोधक, मुर्दाड, शिस्तभंग करणारा (मनुष्य).
Recall रिकॉल् v.t.--- माघारे बोलावणे, रद्द करणे, परत बोलावणे.
Recant रिकॅण्ट् v.t.--- माघार घेणे, बदलणे, फिरवणे. (मत, विधान) मागे घेणे, चूक कबूल करणे.
Recantation रिकॅण्टेशन् n.--- पूर्वीच्या उलट विधान.
Recapitulate रिकॅपिच्युलेट् v.t.--- सारांश सांगणे.
Recast रीकास्ट् v.t.--- नवीन रूप देणे.
Recede रिसीड् v.t.--- हटणे, पाठीमागे सरणे, पगडी फिरविणे.
Receipt रिसीट् n.--- पावती, पोंच. (Pl.) प्राप्ति.
Receivable रिसीव्हेबल् a.--- घेण्याजोगा, ग्रहणीय.
Receive रिसीव्ह् v.t.--- घेणे, स्वीकार करणे, आदर करणे, स्वीकारणे, अंगीकारणे, ज्ञान होणे.
Recency रिसेन्सि n.--- नवीनता, ताजेपणा, नाविन्य.
Recension रिसेन्शन् n.--- (ग्रंथाचा) पाठ; संशोधित पाठ / आवृत्ति.
Recent रीसेन्ट् a.--- अलीकडचे, नवीन, ताजा, नवा.
Receptacle रिसेप्टेकल् a.--- पात्र, निधान, निधि, आशय, आधार.
Reception रिसेप्शन् n.--- स्वीकार, आगतस्वागत.
Receptor रिसेप्टर् n.--- = ‘Sense - organ’
Recess रीसेस् n.--- कोनाडा, फडताळ, खुंटी, खळ, सुट्टी, मधली सुट्टी.
Recession रिसेशन् n.--- माघार, मागे हटण्याची क्रिया. व्यापार, उत्पादन इ. मधील) मंदी.
Recipe रेसिपी n.--- औषधांची यादी / पत्रिका. औषध / खाद्यपदार्थ बनविण्याची प्रक्रिया.
Recipient रिसीपिअंट् a.--- प्राप्त करणारा, घेणारा.
Reciprocal रेसिप्रोकल् a.--- परस्परांचा, अन्योन्य.
Reciprocate रेसिप्रोकेट् v.t.--- अदलाबदल करणे.
Recital रिसाइटल् n.--- पठाण, कथन, सुनावणी, वर्णन.
Recitation रेसिटेशन् n.--- स्मृतिबद्ध शब्दांचे / लिखित शब्दांचे पठन.
Recite रिसाइट् v.t.--- पठण करणे, कथन करणे.
Reckless रेक्लेस् a.--- बेपर्वा, अविवेकी, अविचारी, बेफाम, बेभान, निष्काळजी.
Reckon रेकन् v.t.--- मोजणे, गणणे, लेखणे. Reckon on --- -वर विसंबणे. Reckon with --- -ची दाखल घेणे. -कडे लक्ष देणे.
Reckoning रेकनिंग् n.--- मोजदाद, गणती, खात्याची रुजवात, हिशेब, गणना, संख्या.
Reclaim रिक्लेम् v.t.--- सुधारणे, उद्धरिणे, हक्काने परत मागणे, सुधारून उपयोगात आणणे, माणसाळविणे, वाटेवर आणणे. n.--- सुधारणा.
Reclamation रेक्लमेशन् n.--- दुरवस्थेतून सोडवणूक. (पुनर्-)उद्धार, जीर्णोद्धार. विमोचन. सुधारणा.
Recline रिक्लाइन् v.i.--- आडवा पडणे, निजणे, टेकणे.
Recluse रिक्ल्यूस् a.--- एकलकोंडा, एकांतवासी. n.--- एकांतवासी, योगी, तापसी.
Reclusion रिक्ल्यूझन् n.--- एकांत, एकांतवास.
Reclusive रेक्लूझिव्ह् / रिक्लूझिव्ह् a.--- एकाकी राहणीचा.
Recognizance रिकॉग्निझन्स् n.--- करारनामा, चिन्ह.
Recognize रेकग्नाइझ् v.t.--- ओळखणे, मान्य करणे.
Recoil रिकॉइल् v.i.--- माग हटणे. n.--- उलट, उलटी.
Recollect रिकलेक्ट् v.t.--- फिरून गोळा करणे, आठवणे, स्मरणे.
Recollection रिकलेक्शन् n.--- आठवण, स्मृति.
Recommend रेकमेंड् v.t.--- शिफारस करणे, सल्ला देणे, प्रशंसा करणे, स्वाधीन करणे.
Recommendation रेकमेंडेशन् n.--- शिफारस, तारीफ.
Recompense रिकॉम्पेन्स् v.t.--- फेड / भरपाई करणे.
Reconcile रीकन्साइल् v.t.--- ऐक्य / एकवाक्यता करणे, समेट / मिलाफ करणे, मिटवणे.
Reconciliation रिकन्सिलिएशन् n.--- मिलाफ, ताळा, एकवाक्यता, एकीकरण, ताळा, मेळ, जम.
Recondite रे(रि)को(कॉ)ण्डाइट् a.--- सर्वसामान्य ज्ञान / आकलनशक्ति / बुद्धि यांच्या पलीकडील, अतिक्लिष्ट, गहन, अस्पष्ट, अंधुक.
Reconnaissance रिकॉनेसन्स् n.--- शत्रूच्या व्यूहरचनेची टेहळणी, युद्धक्षेत्राची (गुप्त) पाहणी; निरीक्षण.
Reconnoitre रिकॉनॉइटर् v.t. / v.i.--- (शत्रूच्या स्थितीची, युद्धक्षेत्राची इ.) टेहळणी करणे.
Record रेकॉर्ड् v.t.--- लिहून ठेवणे. n.--- लेख, दफ्तर, नोंदणी, पट, स्मारक, स्मृति, साक्ष, इतिहास.
Recorder रेकॉर्डर् n.--- लिहून ठेवणारा, दफ्तरदार.
Recount रिकाउण्ट् v.t.--- तपशिलवार / सविस्तर सांगणे.
Recourse रिकोर्स् n.--- आश्रय, आधार, अवलंबन.
Recover रिकव्हर् v.t. and v.i.--- निरोगी करणे / होणे, वाटेवर आणणे / येणे, पुनः मिळविणे, प्राप्त होणे.
Recovery रिकव्हरी n.--- रोगापासून मुक्तता, पुनः-प्राप्ती, पुनर्लाभ, वसूल, सावरणे.
Recreation रिक्रिएशन् n.--- विश्रांती, श्रमापहार, करमणूक, मौज.
Recriminate रिक्रिमिनेट् v.i.--- उलट दोष लावणे, परस्परांवर कडवटपणे दोषारोप करणे.
Recruit रिक्रूट् v.t.--- सावरणे, नवे शिपाई जमवणे, उजरणे, स्थितीवर येणे. n.--- नवा शिपाई.
Rectangle रेक्टँगल् n.--- समकोणाकृति (अमोरसमोरच्या बाजू सामान व सर्व कोण काटकोण असलेली)
Rectangular रेक्टँग्युलर् a.--- समकोण, समचतुरस्त्र.
Rectify रेक्टिफाय् v.t.--- सुधारणे, नीट / दुरुस्त करणे.
Rectilineal रेक्टिलीनिअल् a.--- सरळ रेघाचा, सरळ दिशेत / रेषेत जाणारा. = Rectilinear.
Rectilinear = Rectilineal.
Rectitude रेक्टिट्यूड् n.--- सरळपणा, सचोटी.
Rector रेक्टर् n.--- विद्यालय / विद्यापीठ / संस्था यांचा प्रमुख. पॅरिशचा मुख्य भटजी.
Rectory रेक्टरी n.--- ‘Rector’ चे घर / कार्यालय.
Rectum रेक्टम् n.--- मळाचा कोठा, मलाशय.
Recumbence रिकम्बन्स् n.--- विश्रांती, पासलपट्टी, आळसटपणा.
Recumbent रिकम्बन्ट् a.--- आडवा, पासला.
Recur रिकर् v.i.--- पुनः येणे, आठवण होणे, सुचणे.
Recurrence रिकरन्स् n.--- आठवण, पुनरागमन, पुनर्घटना, स्फुरण.
Recurrent रिकरन्ट् a.--- पुनः पुनः घडणारा / येणारा.
Recurvous रिकर्व्हस् a.--- पाठीमागे वाकलेला.
Recusation रेक्यूझेशन् n.--- आक्षेपात्मक अर्ज (विशेषतः न्यायाधीशाच्या पक्षपातीपणावर आधारलेला).
Recuse रिक्यूझ् v.t.--- पूर्वग्रह / पक्षपात दाखवल्याबद्दल न्यायाधीशाच्या विशिष्ट प्रकरणी निर्णय देण्याच्या अधिकारास आक्षेप घेणे.
v.t. / v.i.--- एखाद्या प्रकरणी, विशिष्ट पक्षाच्या भूमिकेबद्दल पक्षपाती वा पूर्वग्रह -दूषित असल्याच्या कारणावरून, निवाडा करण्याच्या कार्यापासून अलिप्त राहणे / अलिप्त ठेवणे.
Red रेड् a.--- तांबडा, लाल.
Redden रेडन् v.t. and v.i.--- तांबडा करणे / होणे.
Reddish रेडिश् a.--- तांबूस.
Redeem रिडीम् v.t.--- तारणे, खंड देऊन सोडविणे, परत विकत घेणे. (पाप, कर्ज, वगैरेंच्या बोजातून, व्यक्तीस / वस्तूस) मुक्त करणे, बंधमुक्त करणे, (वचनाची, प्रतिज्ञेची) पूर्तता करणे.
Redemption रिडेम्प्शन् n.--- उद्धार, तारण खंड देऊन सोडवणूक.
Redhead रेड्हेड् n.--- लाल केसांची व्यक्ति.
Red-herring रेड्-हेरिंग् n.--- दिशाभूल करण्यास उपस्थित केलेली वस्तु.
Redhot रेेड्हॉट् a.--- तापून लाल झालेले.
Redlead रेड्लेड् n.--- शेंदूर.
Redness रेड्नेस् n.--- तांबडेपणा, लाली.
Redouble रीडबल् v.t.--- दुप्पट करणे, दुणावणे.
Redoubt रिडाउट् n.--- (युद्धाची) लपण्याची जागा; आसरा.
Redound (to) रिडाउन्ड् v.i.--- -मध्ये परिणामी होणे, शेवट होणे, उलटणे. n.--- परिणाम, शेवट.
Redress रिड्रेस् v.t.--- दाद घेणे, भरपाई करून देणे, बंदोबस्त करणे. n.--- दाद, भरपाई, मुक्तता, बंदोबस्त.
Reduce रिड्यूस् v.t.--- हलका करणे, रोड करणे, पराभव करणे, भिकेस लावणे, रूप देणे, धातू शोधणे, हलक्या दर्जावर आणणे, जिंकणे, मिळविणे.
Reduction रिडक्शन् n.--- कमी करणे, क्षीणता.
Redundance रिडन्डन्स् n.--- आधिक्य, अतिरेक.
Redundant रिडन्डन्ट् a.--- अधिक, जास्त, फाजिल, फालतू, आगाऊ.
Reduplicate रीडुप्लिकेट् v.t.--- दुप्पट करणे, द्वित्व करणे.
Reduplication रीडुप्लिकेशन् n.--- दुप्पट, द्वित्त.