Emote इमोट् v.--- मनोविकार अनुभवणे, भावनांशी समरस होणे. मनोविकार/भावना व्यक्त करणे/कळवणे. (eg. The child’s emoting capabilities shall be determined.)
Emotion इमोशन् n.--- मनोविकार, मनस्ताप, क्षोभ, तीव्र भावनांमुळे होणारे संवेदन.
Emotional इमोशनल् a.--- मनोवृत्तीचा, ‘Emotion’ संबंधीचा, अतिसंवेदनशील; भावनाप्रधान.
Emotive इमोटिव्ह् a.--- विचार किंव्हा तर्क यांऐवजी भावनांवर आधारित/भावनांना आवाहन करणारा.
Empale एम्पेल् v.t.--- सुळी देणे, कुंपण घालणे.
Empathise (with) एम्पथाइझ् v.i.--- सहानुभूति बाळगणे/दाखविणे; समजून घेणे (सहानुभूतिपूर्वक).
Empathy (with) एम्पथि n.--- -बद्दलची समज, -बद्दल सहानुभूति, -शी समरस होऊन समजून घेण्याची शक्ति. पहा: Sympathy.
Emperor एम्परर् n.--- बादशहा, सार्वभौम राजा.
Emphasis एम्फॅसिस् n.--- शब्दाच्या उच्चारावर जोर.
Emphasize एम्फॅसाइझ् v.t.--- शब्दावर जोर देणे.
Emphatic एम्फॅटिक् a.--- जोराचा, नेटाचा, आवेशाचा, स्पष्ट.
Empire एम्पायर् n.--- सार्वभौम राज्य/राष्ट्र, अधिराज्य, साम्राज्य.
Empiric(al) इम्पिरिक् (-कल्) n.--- नाकाडोळ्याचा वैद्य, नाडीवैद्य. a.--- अनुभवजाण्या, अनुभवाधिष्ठित, कल्पनेपेक्षा प्रत्यक्षावलोकन व प्रयोगानंतर यांवर आधारित. (पहा: ‘Rational’).
Empiricism इम्पिरिसिझम् n.--- कल्पना व तर्क यांपेक्षा प्रत्यक्ष अनुभूति किंव्हा प्रयोगद्वारा प्रत्यंतर या आधारांवर सिद्धांत मांडण्याची/पारखून घेण्याची पद्धति. (पहा: ‘Rationalism’).
Employ एम्प्लॉय् v.t.--- कामी लावणे, चाकरीस ठेवणे, वापरणे, राबवणे, नेमणे.
Employment एम्प्लॉयमेंट् n.--- काम, उद्योग, चाकरी, नोकरी, रोजगार (हिंदी: नियोजन).
Emporium एम्पोरिअम् n.--- पेठेचा गाव, शहर.
Empoverish एम्पॉव्हरिश् v.t.--- दरिद्री करणे.
Empower एम्पॉवर् v.t.--- मुखत्यारी/अधिकार देणे, समर्थ करणे.
Empowered एम्पॉवर्ड् a.--- अधिकृत.
Empowerment एम्पॉवरमेंट् n.--- अधिकृतीकरण, सशक्तीकरण.
Empress एम्प्रेस् n.--- महाराणी, सम्राज्ञी.
Emptor एम्प्टॉर् / एम्प्टर् n.--- क्रेता, खरीददार, विकत घेणारा.
Empty एम्प्टी a.--- रिकामा, पोकळ, ओस, वांझ, व्यर्थ. v.t.--- रिकामा करणे, रिचवणे.
Empyrean एम्पिरिअन् / एम्पिरीअन् / एम्पाय्रीयन् a.--- स्वर्गीय, सर्वोत्कृष्ट, आकाश-/स्वर्ग-संबंधीचा. n.--- उच्चतम/परम लोक, सर्वोच्च स्थान, सर्वोच्च स्वर्ग, देवलोक, ब्रह्मांडाची/विश्वाची पोकळी. अनंत ब्रह्मांड.
Emu ईम्यू n.--- मूळचा ऑ स्ट्रेलिया देशांतील न उडणारा, शहामृगासारखा, एक वाळवंटी पक्षी.
Emulate एम्युलेट् v.t.--- स्पर्धा करणे, तोलास तोल देणे, बरोबरी करणे.
Emulation एम्युलेशन् n.--- स्पर्धा, ईर्ष्या, चढाओढ.
Emulous एम्युलस् a.--- ईर्ष्येचा, स्पर्धेचा, चढाओढीचा.
Emulsify इमल्सिफाय् v.t.--- -वर ‘emulsion’ -प्रक्रिया करणे.
Emulsion इमल्शन् n.--- बियांचे/धान्यांचे काढलेले सत्व. एका द्रवाच्या अन्यद्रवात झालेल्या सर्वव्यापी मिश्रणाने बनलेला मिश्र द्रव. अशा प्रकारचे सर्वव्यापी मिश्रण/त्याची प्रक्रिया. अशी मिश्रणावस्था.
Enmasse आँ मॅस् ad.--- सामुदायिक रीतीने. सर्वव्यापी स्वरूपांत. एकगठ्ठा.
Enable एनेबल् v.t.--- शक्तिमान करणे.
Enact एनॅक्ट् v.t.--- ठराव/निर्बंध/कायदा करणे. कायद्याच्या रूपांत आणणे, -ची नक्कल/भूमिका करणे.
Enamel एनॅमल् n.--- मिना, दांतावरचा बुरा, लुकण. v.t.--- मिनी लावणे/चढवणे.
Enamour एनॅमर् v.t.--- भुलवणे, मोहित करणे.
Encamp एन्कॅम्प् v.t.--- छावणी पाडणे, तळ देणे.