Fab-Fai

fable फेबल् n.--- खोटी-कल्पित गोष्ट, दंतकथा. V.t. & v.i. ढोंगकरणे, रचणे.
fabler फेब्लर् n.--- कादंबरी लिहीणारा.
fabric फॅब्रिक् n.--- घडण, रचना, इमारत, वीण.
fabricate फॅब्रिकेट् v. t.---रचणे, बांधणे, खोटे-वनावून रचणे, करणे.
fabrication फॅब्रिकेशन् n.--- कुभांड, थोतांड, कडी.
fabrile फॅब्रिल् a.--- दगड, धातू, लाकूड वगैरे कामाविषयी.
fabulous फॅब्युलस् a.--- कादंबरीतला, कल्पित
facade फ(फॅ) साद n.--- दर्शनी भाग, तोंडवळा, चेहरा, बाह्य / वरवरचे
face फेस् v.t.--- तोंडासतोंड देणे, समोर राहणे, असणे. v.i. तोंड फिरविणे. n.--- तोंड, चेहरा, रूप, सुरत, मुद्रा, मोहरा. To face ( one / something) down ला गप्प बसविणे, मिटविणे.
face-off
face to face ad.--- तोंडातोंडी.
facet फॅसेट् n.--- पैलू. v.t.---पैलू पाडणे.
facetious फॅसीशस् a.--- विनोदी, थट्टेखोर, रसिक.
facial फेशल् a.--- चेहर्याचा, मुखविषयक n.--- चेहर्याचा साजशृंगार / उपचार
facile फॅसिल् a.---मनमिळाऊ, चपळ, कुशल, सोपा, सरळसोट, धोपट, विनासायास, सहजसाध्य, धोपटमर्गी.
facilitate फॅसिलिटेट् v.t.---सोपा-सुलभ-सुगम करणे.
facility फॅसिलिटि n.--- सोपेपणा, सुलभपणा, सोय.
facing फेसिंग् a.--- समोर, अभिमुख n.--- वस्त्राची किनार.
facsimile फॅक्सिमिली n.---हुबेहूब काढलेली प्रत
fact फॅक्ट् n. घडलेली खरी गोष्ट, सत्य, तथ्य.
faction फॅक्शन् n.--- तट, फळी, द्वैत, बंडाळी. दुफळी, फाटाफूट, फूट, एका मोठ्या संघटनेतील स्वार्थसाधू लोकांचा बनलेला छोटा वेगळा गट.
factitive फॅक्टिटिव्ह् v. कोणास तरी काहीतरी करणे म्हणणे मानणे अशा अर्थाचे (क्रियापद)
factor फॅक्टर् n.--- अडत्या, गुमास्ता, गुणपदक.
factorage फॅक्टरेज् n.---अडत, दस्तुरी, वखार.
factory फॅक्टरी n.--- कारखाना, अडत्यांचा अड्डा.
factotum फॅक्टोटम् n.--- हरकामी.
faculty फॅकल्टि n.--- शक्ति, सामर्थ्य, बल, विश्वविद्यालयातील विद्याशाखा, व या शाखेची व्यवस्था वगैरे पहाणारी मंडळी संकाय (हिंदी)
facundity फॅकण्डिटी n.--- वक्तृत्व
fad फॅड n.---तब्बेतीची तार, नाद, (एखाद्या नव्या कल्पनेचे) खूळ/ वेड/ स्तोम.
faddist फॅडिस्ट् n.--- नादिष्ट, फॅड माजविणाारा
fade फेड् v.t.---कोमेजणे, विटणे, उडणे.
faded फेडेड् a.--- कोमेजलेला, विटलेला, मंद.
faecal फीकल् a.--- ‘Faeces’ संबंधीचा
faeces फीसीझ् n.---गू, विष्ठा, मळ, गाळ.
fag फॅग् v.t.--- दमविणे, भागविणे, काबाडकष्ट करणे. ---a. काबाडकष्ट करणारा, n.--- रखडपट्टी, आटाआट.
fagend फॅगेंड् n.--- गाळ, गदळ, कपड्याच्या वस्त्राच्या दशा, गाळसाळ.
fagging फॅगिंंग् n.--- आटापीट, काबाडकष्ट, अट्टाहास.
fagot फॅगॉट ्n.---मोळी, लाकूडभारा v.t.--- भारा बांधणे.
fahrenheit फॅरेन्हाइट् n.---
fail फेल् v.t.& V.i.--- चुकणे, कमी पडणे, गरज लागणे, मोडणे, फसणे, अपेश येणे, खाली बसणे, फुटणे, नष्ट होणे,फशी पाडणे, दिवाळखोर होणे, अयशस्वी होणे.
failing फेलिंग् n.--- उणीव, व्यंग, न्यूनता, कमीपणा.
failure फेल्युअर् n.--- तूट, तोटा, बूड, दिवाळे.
fain फेन् a.--- आनंदी, तृप्त ad.--- खुषीने, आनंदाने.े
faineant फेनेआन् a.--- रेम्याडोक्या, ऐदी.
faint फन्ट् a.--- अशक्त, मूर्छित, म्लान, पुसट, फिकट, अस्पष्ट, अंधुक, खिन्न, पातळ, बारीक, कळे न कळेसा, शिणलेला, भित्रा, भ्याड. V.i.--- धीर सुटणे, अंधारी येणे, ग्लान होणे, कासावीस होणे, मूर्छित होणे n.
fainting फेन्टिंग् n.---मूर्छा, झीट, बेशुद्धि, चक्कर. fair copy फेअर कॉपी n.--- स्वच्छ - सुवाच्य प्रत.
fairing फेरिंग् n.--- बक्षीस.
fairminded फेअर्माइंडेड् n.--- न्यायी, प्रामाणिक.
faith फेथ् n.--- विश्वास, भाव, श्रद्धा, दृढनिश्चय.
fairness फेअरनेस् n.--- गोरेपणा, उघडेपणा, प्रामाणिकपणा.
fairy n.--- अद्भुत - शक्ति - धारी (मानवी रूपांतील) प्राणी, परी.
fait accompli फेट् अकॉम्प्ली n. --- ( accomplished fact) ( pl.faits accomplis) घडून गेलेली (घटित) न बदलता येणारी (अपरिवर्तनीय) घटना, होऊन गेलेली अनिवार्य गोष्ट.
faithful फेथ्फुल् a.--- विशवास, भाविक, इनाम ठेवणारा, सत्यवचनी.
faithless a.--- अविश्वासुक, खोटा, बेइमानी.