ton-tor

ton टन् n.--- वजन मोजण्याचे एक माप (परिमाण): ब्रिटिश पद्धतींत २२४० पौंड; अमेरिकन पद्धतींत २२०० पौंड; मेट्रिक पद्धतींत १००० किलोग्रॅम (म्हणजेच २२०४. पौंड). खूप मोठे प्रमाण / मोठी संख्या. थाट, रुबाब, ऐट, ढंग; ढंगदार / थाटमाटाने राहणारा वर्ग.
toname टूनेम् n.--- मुख्य नावास जोडलेले उपनाव / जोडनाव.
tone टोन् n.--- स्वर, आवाज, ध्वनि, मूर्च्छना, वृत्ति, कल, अभिप्राय, सामान्य, पद्धत, उठाव. विशिष्ट नियमबद्ध / सुबद्ध / संगीतबद्ध स्वरसमूह / सुरक्रम (पहा: Noise). भाव, अभिप्राय, कल, धोरण, शैली, ढंग, आवाजातील चढ/उतार. (रंग, प्रकाश इ. मधील मिश्रणादिद्वारा झालेले) रूपांतर. (शरीर / इंद्रिये यांतील) सक्षमता, सुदृढता, निकोपपणा. v.t.--- हेल काढून बोलणे. रंग / आवाज यामध्ये फेरफार करणे. (with) -शी जुळवणे / सुसंवादी करणे. Tone up --- -ची तीव्रता / जोर / ताकद वाढविणे. Tone down --- -ची तीव्रता / जोर / ताकद घटविणे.
toner टोनर् n.--- ‘Tone’ आणणारा / उत्पन्न करणारा.
tongs टाँग्ज् n.--- चिमटा, सांडस.
tongue टंग् n.--- जीभ, भाषा, घंटेची लोळी.
tonic टॉनिक् a.--- रोपक, बलवर्धक. n.--- दीपन.
tonne टन् n.--- ‘Ton’ या परिमाणाचे (विशेषतः मेट्रिक पद्धतीतील) फ्रेंच भाषेंतील स्पेलिंग.
tonsure टॉन्शर् n.--- केशकर्तन, मुंडन, गोटा, हजामत. v.t.--- मुंडणे, भादरणे, गोटा करणे, कातरणे.
too टू ad.--- ही, देखील, अतिशय, फार.
tool टूल् n.--- हत्यार, शस्त्र. v.t.--- हत्याराने करणे.
toot टूट् n.--- (वाद्य) फुंकणे, फुंकून वाजविणे.
tooter टूटर् n.--- फुंकणारा, पुंगीवाला; पुंगी.
tooth and nail टूथ् अँड् नेल् --- सर्व शक्ति पणाला लावून, जोरदारपणे, प्रखरपणे, निकराने, अटीतटीने.
tootle टूटल् v.i.--- शिंग फुंकीत जाणे.
tooth टूथ् n.--- दांत.
toothache टूथेक् n.--- दंतशूल. Toothless --- बोथरा. Toothpowder --- दांतवण. Toothpick --- दांतकोरणे. Toothsome --- चवदार, खमंग.
top टॉप् n.---वरचा भाग, शेंडा, कळस, टोपण, शिखर. शरीराच्या वरच्या भागाचा कपडा. भोवरा (फिरविण्याचे खेळणे) a.--- सर्वोच्च, सर्वोत्तम. v.t.--- (झाडाचे) शेंडे कापणे, -ची छाटणी करणे. (झाकणाने वगैरे) झाकणे, आवृत करणे. -वर चढणे, -वर मात करणे. v.i.--- सर्वप्रथम असणे / येणे. To sleep like a top --- (वेगाने फिरण्याच्या) भोवऱ्यासमान (स्थिर / शांत / गाढ) झोपणे.
topaz टोपॅझ् n.---पुष्पराज, पुष्पराग.
topic टॉपिक् n.--- प्रकरण, विषय
topical टॉपिकल् a.--- विशेष स्थळाचा, प्रकरणाचा, प्राकरणिक, प्रासंगिक.
topicality टॉपिकॅलिटि n.--- प्राकारणिक / प्रासंगिक / मर्यादित / सामयिक / स्थानिक वैशिष्ट्य.
topknot टॉप्नॉट् n.--- तुरा, शेंडी, शिखा.
topography टपॉग्रफी n.--- विशेष स्थळाचे वर्णन. भूपृष्ठाचे / विशिष्ट स्थळाचे दर्शन / एकूण आकार / रूप. (कोणत्याही वस्तु इ. चे बाह्य रूप / आकार / ठेवण / रचना / दर्शन.
topsyturvy टॉप्सिटर्व्हि a. & ad.--- उलटसुलट, खालीवर.
torch टॉर्च् n.--- दिवटी, मशाल, हिलाल.
torment टॉर्मेंट् v.t.--- हाल करणे, गांजणे. n.--- छळ, हाल, यातना.
tornado टॉर्नेडो n.--- (ताशी ४८० कि. मी. वा अधिक वेगाचे) सोसाट्याचे चक्री वादळ.
torpedo टॉ(र्)पीडो n.--- जलयुद्धांत वापरले जाणारे नौकाविनाशक पाण्यातून जाणारे एक अस्त्र, पाणतीर.
torpid टॉर्पिड् a.--- बधिर, सुस्त, मंद, मठ्ठ, जड.
torpidness टॉर्पिड्नेस् n.--- बधिरता, निश्रेष्टता, गुंगी, मठ्ठपणा.
torpor टॉर्पर् n.--- जाड्य, मांद्य, सत्यान, सुस्ती.
torrent टॉरेन्ट् n.--- लोंढा, झोत. तीव्र वेगाने धावणारा स्रोत, प्रचंड ओघ, अस्खलित प्रवाह (द्रव, भाषण, लेखन इ. चा), जोराची पर्जन्यवृष्टि. a.--- (वर वर्णित प्रवाहासारखा) वेगवान्.
torrential टॉरेन्शल् a.--- लोंढ्यासारखा वेगवान्.
torrid टॉरिड् a.--- अतिशय ऊष्ण / तापलेला. (ऊन्हं इ. ने) भाजून निघालेला. अति उष्ण, तापट. उत्कट, भावनाप्रधान, भावनाप्रवण. दुःखकारक, क्लेशकारक, यातना / पीडा देणारे.
torrid-zone टॉरिड्-झोन् n.--- ऊष्ण कटिबंध.
torso टोर्सो n.--- डोके व हातपाय यांव्यतिरिक्त शरीराचा भाग, ‘कोष्ठ’, कबंध.
tort टॉर्ट् n.--- (कायद्याच्या परिभाषेत) अशा प्रकारची हानि, नुकसान, इजा, पीडा, अपाय ज्याबद्दल हानि वगैरेस सोसणारास, फौजीदारी उपाय नाहीं तरी, भरपाई मागता येते.
tortuous टॉर्च्युअस् a.--- वाकडातिकडा, नागमोडी, वळसे / वळणे घेणारा, वळणाचा. गुंतागुंतीचा, क्लिष्ट. तिरक्या / वाकड्या चालीचा /भूमिकेचा.
torture टॉर्चर् v.t.--- हाल करणे, छळणे. n.--- यातना, छळ.
torturous टॉर्ट्युरस् / टॉर्चरस् a.--- पीडादायी, यातनापूर्ण.