favour फेवर् v.t.--- कृपा करणे.n.--- कृपा, मेहेरबानी, उपकार, मेहेरनजर.
favourableफेवरेबल् a.--- अनुकूल, इष्ट, बहाल.
favourite फेव्हरिट् a.--- लाडका, मर्जीतला, प्रिय.
favouritism फेवरिटिजम् n.--- पक्षपात,तरफदारी.
fawn फॉन् n.--- हरणाचे पोर, पाडस, पिंगट, उदी रंग. V.i.--- लाळ घोटेपणाने लाचारीने खुशामत करणे, लाडीगोडी / लडिवाळपणा करणे, लाडीगोडीने / लडिवाळपणे एखाद्याच्या जवळ / भोवती घोटाळणे.
fay फे n.--- वनदेवता, परी, अप्सरा.
faze फेज् v.i.--- अस्वस्थ करणे, चिंताकुल करणे, आकुल करणे.
चिंताकुल करणे, आकुल करणे.
fealty फीअल्टि n.--- राजनिष्ठा, प्रजाधर्म, स्वामीनिष्ठा. निष्ठावंत राहण्याची खात्री/वचन/विश्वास.
fear फिअर् v,t.--- भिणे, धाक बाळगणे, ०ची आशंका बाळगणे. n.--- भय, धाक, दरारा, कीर्ति, जरब, भीति.
fearful फिअर्फुल् a.---भित्रा, भ्याड, भयंकर, भेकड.
fearless फिअर्लेस् a.--- निर्भय, निशंक, बेपर्वा.
feasibleness फीझिबल्नेस् n.--- साध्यता, घटनीयता.
feasible फीझिबल् a.--- हाताने घडण्याजोगे, साध्य.
feast फीस्ट् v.t.--- मेजवानी देणे, हौस पुरविणे, सण करणे. n.--- मेजवानी, जेवणावळ, सणाचा दिवस.
feat फीट् n.--- महत्कृत्य, पराक्रम, कसब, हात, मात.
feather फेदर् n.--- पीस, पर. v.t.---पिसांनी मढवणे.
feathered फेदर्ड् a.--- पिसांचा, सपक्ष.
feature फीचर् n.--- स्वरूप, डौल, रूप, लक्षण.
febrifuge फेब्रिफ्यूज् n.--- तापाचे औषध.
febrile फब्रिल् a.--- तापाचा, तापसूचक, ज्वरोद्भव.
february फेब्रुअॅरी n.--- इंग्रजी दुसरा महिना.
feck फेक् n.--- जोम, जोर, तत्परता, साक्षेप.
feckless फेक्लेस् a.--- उदासीन, पराङ्मुख, निरपेक्ष
feculence फेक्यूलन्स् n.--- गढूळपणा, गाळ, गदळ.
feculent फेक्यूलेन्ट् a.--- गढूळ, गाळाचा, रेदाळ.
fecund फे(फी)कण्ड् a.--- सुपीक, सुफल, बहूत्पादक.
fecundity फेकन्डिटि n.--- साफल्य, प्रजाजनकत्व, सुपीकता, विपुलता.
fed फेड् p.p.a.--- पोसलेला, पुष्ट, पाळलेला.
federal फेडरल् a.--- कराराचा, संकेताचा, तहाचा, मांडलिक.
federation फेडरेशन् n.--- जूट.
fee फी n.--- दस्तूरी, पट्टी, फी, मजूरी, वेतन, एखादे काम करणाऱ्यास / सेवा देणाऱ्यास लाभ घेणाऱ्याने द्यावयाचे मूल्य / मोबदला, शुल्क, निस्तार, दक्षिणा, पारिश्रमिक, पहाः “Compensation”,” remuneration”.
feeble फीबल् a.--- निर्बल, अशक्त, बारीक, मंद.
feebleness फीबलनेस् n.--- कमजोरी, अशक्तता.
feed फीड् v.t.--- पालनपोषण करणे, पोसणे, चोरणे, खाउ घालणे, उपजीवन करणे, पुरवणे, चारा घालणे. V.i.--- खाणे, पोट भरणे. Feed on v.t.--- ०वर उपजीविका करणे, ०ने पुष्ट होणे, ०च्याा आधाराने फायदा, मिळविणे / वृद्धिंगत होणे.
feel फील् v.t.--- वाटणे, समजणे, स्पर्शज्ञान होणे, करणे, अनुभवणे, चाचपणे, कळवळा येणे, (वस्तूचे वापरणाऱ्यास) वाटणे / भासणे / लागणे.
feelers फीलर्स् n.--- प्राणांच्या तोंडाजवळच्या मिशा.
feeling फीलिंग् n.--- स्पर्शेमन्द्रिय, ज्ञान, बोध, मनोधर्म, कळवळा, दया, करुणा.
feign फेन् v.t.--- ढोंग करणे, नवीन कल्पणे, योजणे.
feint फन्ट् n.--- ढोंग, मिष, चमक, हूल, पेंच, फसवा हल्ला.
feisty फाइस्टी a.--- प्रक्षुब्ध, अस्वस्थ, सचिंत, चिंताग्रस्त, भयग्रस्त, घाबरा, चिडका.
felicitate फेलिसिटेट् v.t.--- ०ला सुखी करणे, [०च्या बद्दलः on / upon (०च्या बद्दल, ०ला उद्देशून)], आनंद दर्शविणे, ०चे अभिनंदन करणे.
felicitous फिलिसिटस् a.--- आनंदपूर्ण, सुयोग्य, संतोषप्रद, विशेष समाधानकारक
felicity फे(फी)लिसिटी n.--- आनंद, सुख, संतोष. आनंद इ. चे प्रकटन
feline फेलाइन् a.--- लबाड, लुच्चा, दगाबाज.
fell फेल् v.t.--- जमीनदोस्त करणे, तोडून टाकणे a.--- क्रूर, घातकी, निर्दय.
fellness फेल्नेस् n.--- क्रूरता, कौर्य, निर्घृणता.
fellow फेलो n.--- मनुष्य, सवंगडी, सोबती, बरोबरीचा, पातीदार, जोडीतला, अध्यापक.
fellowship फेलोशिप् n.--- सोबत, सहवास, भागी, अध्यापकाची जागा, सर्कत, वाटणी, परस्पर सहकार
felly फेलि n.--- रहाटाची वगैरे कड, बांक.
fellon फेलन् n.--- आततायी, महापराधी, दुष्ट, चोर.
felony फेलनि n.--- क्रूरपणा, क्रौर्य, साहस, आततायीपणा.
felt फेल्ट् n.--- बुरणूस, जीन, बुरणुसाची उभी टोपी.