ranch रांच् / रांश् n.--- (शेतावरील रानातील) घरकुल / झोपडी / छपरी. कृषि / पशुपालन करण्याचे क्षेत्र / शेत.
rancidity रॅन्सिडिटि n.--- खंवटपणा.
rancid रॅन्सिड् n.--- खंवट, वासेरा, कुबट.
rancour रॅन्कर् n.--- चुरस, द्रोह, हाडवैर, तीव्र, द्वेष, चीड.
random रॅन्डम् a.--- गैरशिस्त, भलता, असंधानाचा, बेशिस्त. स्वैर; सरसकट; अनियत. (उपलब्ध पर्यायांतून) मुक्तपणे / स्वैरपणे / लहरीनुसार निवडलेला.
range रेन्ज् v.i.--- फिरणे, हिंडणे, ओळीने बसणे, टप्पा असणे. भटकणे, भ्रमंती करणे. n.--- टप्पा, ओळ, रमणा, मारा, आटोका.
rangy रॆंजी a.--- उंच, सडपातळ बांध्याचा.
rank रॅन्क् v.t.--- मोजणे, रांगेने उभे राहणे, गुणणे, मोडत असणे. a.--- माजलेले, कडक, तीव्र. वादांत, रांगडा. n.--- ओळ, रांग, पदवी.
rankle रॅन्कल् v.i.--- सलणे, डांचणे, खुपणे, जळणे. v.t.--- -ला बोच / सल / वेदना उत्पन्न करणे / देत राहणे. n.--- सल, बोच, टोचणी.
rankness रॅन्क्नेस् n.--- माज, मात, उफाडा.
ransack रॅन्सॅक् v.t.--- हुडकणे, शोधणे, धांदोळणे, लुटणे. -चा कसून शोध घेणे / तपासणी करणे. (of) धांडोळून -मधील वस्तु इ. लुबाडणे. (away) लुटून नेणे. n.--- कसून / कडकपणाने केलेला शोध / तपास; लूट, धांदोळा.
ransom रॅन्सम् v.t.--- खंड भरून सोडविणे. अपहृतास सोडण्यास मागितलेली / दिलेली रक्कम / खंडणी. विमोचन-/मुक्ति- मूल्य. n.--- खंड.
rant रॅन्ट् v.i.--- बडबड करणे. निरर्गलपणे, ओरडा करीत, बरळणे. (बोलण्यांत) आकांडतांडव करणे. n.--- बडबड.
rap रॅप् v.t.--- हात मारणे, ठोकणे, -वर थाप मारणे, तल्लीन करणे. -ला रट्टा / थप्पड / चापटी देणे. -ची निर्भत्सना करणे, -वर प्रतिकूल टीका करणे. To beat the rap --- शिक्षेतून सुटणे. To rap (one) on / over the knuckles --- -ची कानउघाडणी करणे, -चे कान पिळणे. n.--- तडाखा, रपाटा, थाप, रपका. टकटक (आवाज). -सटका, झटका, सपाटा. (निर)भत्सना, तीव्र कानउघाडणी, थप्पड, शिक्षा. पूर्वमुद्रित संगीताच्या तालावर ठेक्यांत (एकट्याने) म्हटलेली / गायलेली अनुप्रासयुक्त शब्दरचना. (उदा. ‘Remix’). = Rap music. Rap - music : वरील ‘rap’ शब्दरचनेस साथ देणारे संगीत.
rapacious रापेशस् a.--- लुटारू, हाताळ, अघाशी.
rapacity रापॅसिटि n.--- लुटारूपणा, लुटालूट.
rape रेप् n.--- बलात्काराने स्त्रीसंभोग. एक वनस्पति (शलगम / मुळा यांच्या जातीची) ज्याचा खाण्यासाठी व बियांपासून तेल काढण्यासाठी उपयोग होतो. v.t.--- अब्रू घेणे, बलात्कार करणे.
rapid रॅपिड् a.--- जलद. n.--- (अनेकवचनांत सामान्यतः प्रयुक्त) उतरणीवरून खळाळत वेगाने वाहणारा जलस्रोत.
rapidity रॅपिडिटि n.--- जलदी, वेग, शीघ्रता.
rapier रेपियर् n.--- सरळ दुधारी टोकदार तलवार.
rapine रॅपिन् n.--- लुटालूट.
rapport रॅपॉर् n.--- संबंध, जवळीक, सख्य, सहानुभूती.
rapprochement रॅप्रॉश्मा / रॅप्रोश्मा n.--- मैत्रीच्या संबंधांची पुनःस्थापना (विशेषतः दोन राष्ट्रांमध्ये), समझोता.
rapture रॅप्चर् n.--- अत्यानंद, ब्रह्मानंद, हर्षोल्हास.
rapturous रॅप्चरस् a.--- अत्यानंदाचा.
rare रेअर् a.--- दुर्मिळ, विरळ, उत्तम, पातळ, सर्वोत्कृष्ट, सूक्ष्म, क्वचित.
rarefy रेरिफाय् v.t.--- पातळ/सूक्ष्म करणे. विरळ / पोकळ करणे.
rarely रेअर्लि ad.--- विरळा, क्वचित.
rarify = Rarefy.
rarity रॅरिटि n.--- विरळता, दुर्मिळता, उत्तमपणा, पातळपणा, अपूर्व गोष्ट / वस्तु, चीज, सूक्ष्मता.