cab कॅब् n.--- एका घोड्याचे वाहन, भाडोत्री वाहन.
cabal कबॅल् n.--- कट, कचाट, कूट, कारस्थान, कारस्थान्यांचा गट (इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्स राजाच्या पांच मंत्रांच्या नावाच्या आद्याक्षरांपासून). v.i.--- मसलत करणे.
cabbage कॅबेज् n.--- कोबी. v.t.--- खाणे.
cabaret कॅबरे / कॅबरेट्
cabbie कॅबी
cabby = Cabbie
cabin कॅबिन् n.--- खोली, झोपडी, जहाजांतील खोली.
cabinet कॅबिनेट् n.--- लहान खोली, मसलतॆचॆ जागा, प्रधानांची खलबत करणारी मंडळी.
cabinet council कॅबिनेट् कौन्सिल् n.--- मंत्रिसभा / मंडळ.
cable केबल् n.--- दोरखंड, जलमार्गाने नेलेले तारायंत्र.
caboodle कबूड्ल् n.--- गट, संघ, समुच्चय.
cacao ककाॅओ / ककेओ n.--- कोको (cocoa) व चॉकलेट (chocolate) बनविण्यासाठी वापरले जाणारे दक्षिण अमेरिकेतील एका वनस्पतीपासून मिळणारे बी. उक्त वनस्पति/वृक्ष.
cache काश् / कॅश् n.--- गुप्त स्थान, गुहा, भुयार, लपण्याची/लपविण्याची जागा; गुप्त भांडार, छुपा माल, गुप्त धन, ठेवणीतली/राखीव गोष्ट/वस्तु. ठेवणीतील/राखीवगोष्ट/वस्तु या अर्थी विशेषणाप्रमाणे उपयोग : The cache audience of cricket remains confined to not more than a dozen countries. v.t.--- -ला गुप्त जांगी लपविणे/साठविणे.
cachet कॅशे n.--- प्रतिष्ठा, महात्म्य; प्रतिष्ठा-मूल्य, प्रतिष्ठा-चिन्ह/-लक्षण/-गुण.
cacigue कॅसीक् n.--- वेस्ट इंडियन -/ अमेरिकन इंडियन - जमातीचा प्रमुख.
cackle कॅकल् n… खदखद हास्य, कलकल, हंसशब्द, थरथर, कंप. v.i.--- हंसासारखा शब्द करणे, खिदळणे, हिहि करून हसणे, थरथरणे, कंप पावणे.
cacolet ककोले(ट्) (फ्रेंच) n.--- (डोंगराळ भागांत फिरण्यासांठी) खेचरावर लादलेली बसावयाची टोपली/डोली/खुर्ची.
cacophony कॅकाॅफनि / ककाॅफनी n.--- कर्कश स्वर, रुक्षोच्चार, विसंगत सूर/आवाज, विसंवादी स्वरजंजाळ, कर्कश गोंगाट, कर्णकटु आवाज.
cad कॅड् n.--- पोऱ्या, पोरगा.
cadavorous कॅडॅव्हरस् a.--- प्रेताचा, प्रेतवत.
caddy कॅडी n.--- वस्तू ठेवण्यासाठी किंवा मांडण्यासाठी (विशेषतः खाने/कप्पे असलेली) पेटी / टोपली. गोल्फच्या खेळात गोल्फच्या काठ्या ठेवायची टोपली किंवा खेळाडूंबरोबर काठ्या घेऊन जाणारा माणूस.
cadence केडन्स् n.--- उतरता स्वर, वाणी, (वाणीची) लयबद्धता.
cadet कॅडेट् n.--- लष्करी शाळेतील विद्यार्थी.
cadge कॅज् n.--- फेरीवाल्यासारखे हिंडणे; भीक मागत फिरणे. मेहरबानीखातर मागून मिळविणे.
cadi कॅडी n.--- काजी (मुसलमानाचा)
cadre के(का)डर् / काद्र n.--- सतत कार्यशील कार्यकर्त्यांचा गट.
caecum सीकम् (plural: Caeca) n.--- मोठ्या आतड्याचा सुरवातीचा भाग. एका बाजूने बंद असलेली नळी.
cafeteria कॅफेटियरिया n.--- स्वतःचे वाढून घेऊन खाण्याची जागा.
caesar सीझर् n.--- रोमन हुकूमशहा Caius Julius Caesar याच्या नावांतील तिसरे नाव (पदवी-/उपनाम-वजा / आडनाव-वजा). (पुढे रोमन इ. साम्राज्यात) सर्वोच्च शास्ता/सम्राट (या अर्थी उपयोग). सीझर (‘Caesar’) -चा /- सदृश / - उद्भव. ‘Caesar’ चा अनुयायी. हुकूमशहा, राज्याचा सर्वोच्च अधिकारी; राजा.
caesarean/Caesarian सीझे(अ)रियन् a.../n.---(Caesarean- birth/-delivery/-section/-operation) नैसर्गिक प्रसूतीच्या (आईच्या योनिमार्गांतून अर्भकाच्या बाहेर पडण्याच्या) प्रक्रियेत अडचण असल्यास, आईचे पोट व गर्भाशय यांचा चेद करून शस्त्रक्रियेने घडवून आणलेली प्रसूति. (Julius Caesar च्या अश्या जन्मावरून प्रचारात.)
cage केज् n.--- पिंजरा. v.t.---पिंजऱ्यात कोंडणे.
cagey केजी n.--- बोलण्यात/सांगण्यात सावध.
cagy केजी = Cagey.
cahoot कहूट् n.--- संग, सहभाग, भागीदारी. संगत/भागीदारी करणे.
cairn केर्न् n.--- खिळा, थडगे, वरंडा.
caison केसन् n.--- दारूगोळा ठेवण्याची पेटी.
caitiff केटिफ् n.--- गुलाम, हरामी.
cajole कजोल् v.t./v.i.--- ((खोटी) आश्वासने, प्रशंसा इ. नी) मनधरणी करणे/आर्जव करणे.
cajolery कजोलरी n.--- (ढोंगी/नकली) मनधरणी/आर्जव.
cake केक् n.--- पोळी, वडी. v.t.--- गोठणे, जमणे.
calamine कॅलामिन् n.--- कलेखापरि.
calamitious कॅलामिटस् a.--- विपत्तीचा, दुःखद.
calamity कॅलामिटि n.--- हाल, विपत्ति, संकट, अनर्थ.
calcareous कॅल्केरिअस् a.--- चुन्याच्या गुणाचा.
calcification कॅल्सिफिकेशन् n.---
calcine कॅल्सिन् v.t.--- मारणे, भस्म करणे.
calcitrant कॅल्सिट्रंट् a.--- शिरजोर, न ऐकणारा.
calculable कॅल्क्युलेबल् a.--- गणनीय, गण्य.
calculate कॅल्क्युलेट् / कॅल्क्यलेट् v.t. and v.i.---हिशेब करणे, अटकळ करणे, (फलित/परिणाम) तपासणे/जोखणे.
calculation कॅल्क्युलेशन् n.--- हिशेब, गणना, अटकळ.
calculator कॅल्क्युलेटर् n.--- गणक (-यंत्र) / गणनयंत्र.
caldron कॅल्ड्रन् n.--- हांडा, कढई, काहील.
calendar कॅलेन्डर् n.--- पंचांग, याद, पातडे.
calf काफ् n.--- वांसरू, पारडू; पायाची पोटरी, पिंढरी.
caliber कॅलिबर् n.--- तोफेच्या तोंडाचा व्यास, ग्रहणशक्ति, आवाका.
calibrate कॅलिब्रेट् v.t.--- ढोबळ मोजमापाचे अचूक प्रमाण (मानांक) एखाद्या निश्चित मानदंडानुसार निश्चित करणे. (तापमानदर्शक इ. यंत्रात) व्यास/आवाका निश्चित करणे / त्याची विभागणी करून विव्हागाञ्चे क्रमांक दर्शविणे. निश्चित मानदंडानुसार / निकषानुसार मोजणी / तपासणी करणे, जोखणे, अजमावणे.
calico कॅलिको n.--- कापसाचे कापड, चीट, छीट.
calif = Caliph
caliph कॅलिफ् / केलिफ् n.--- धर्मगुरु. खालिफ/खलीफा (महंमद काळांतील मुस्लिमांचा मुख्य धर्मगुरु व शासक).
caliphat(e) कॅलिफेट् n.--- खिलाफत (खलिफा-पद / खलिफाचे अधिकार-क्षेत्र / खलिफ़ाचे राज्य).
calisthenics (plural)कॅलिस्थेनिक्स् n.--- कसरतीचे खेळ, (शारीरिक व अन्य) कौशल्यपूर्ण प्रयोग / प्रदर्शन.
call काॅल् v.t.--- बोलावणे, नाव देणे, म्हणणे, नेमणूक करणे, ओरडणे, विचारणे.
call-centre काॅल् सेंटर् n.--- विशिष्ट संस्थे-/ संघटने-साठी दूरध्वनिव्यवस्था चालविणारे/हाताळणारे केंद्र /कार्यालय.
callosity कॅलाॅसिटि n.--- बधिरत्व, कोडगेपणा.
callous कॅलस् a.--- निर्जीव, निलाजरा, कोडगा, कठिण, कठोर, कडक. संवेदनाशून्य, भावनाशून्य, निष्ठुर, सहानुभूतिहीन, करुणाविहीन. v.t.--- -असा बनविणे.
callus कॅलस् n.--- तुटलेल्या हादास जोडणारे शरीर-/अस्थि-/-गत द्रव्य. (अश्या सारख्या द्रव्याने झालेली गाठ/घट्टा.
callused कॅलस्ड् a.--- घट्टा / घट्टे पडलेला.
callow कॅलो a.--- कच्चा, अपक्व, पोरकट, बालिश, उथळ.
calm काम् n.--- निवांत, शांतभाव, स्थैर्य, शम. a.--- शांत, थंड.
calmness काम्नेस् n.--- शांतता, धीर, शांति.
calomel कॅलोमेल् n.--- पाऱ्याची मात्रा.
caloric कॅलाॅरिक् n.--- उष्णता. a.--- उष्णतेचा.
calorie n.--- = Calory.
calorific कॅलाॅरिफिक् n.--- तापजनक.
calorific value कॅलाॅरिफिक् व्हॅल्यू n.--- विशिष्ट परिमाणाच्या इंधनाने/अन्नाने उपजणाऱ्या उष्णतेचे मूल्य/मूल्यांक.
calory = Calorie कॅलरी n.--- परिमाण/एकक (१ ग्राम पाण्याचे तापमान १ सेंटिग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता = १ कॅलरी), उष्मांक (विशेषतः आहाराचे उर्जामूल्य मोजण्यास); मोठे परिमाण/एकक (एक पाण्याचे तापमान १ सेंटिग्रेडने वाढण्यास लागणारी उष्णता = १ कॅलरी).
calumny कॅलम्नि n.--- तुफान, आळ, तोहमत.
calumniate कॅलम्निएट् v.t.--- आळ घेणे, दूषण लावणे.
calve काव्ह् v.i.--- विणे (गाय), प्रसविणे.
calx कॅल्क्स् v.i.--- भस्म (धातूचे).
calyx कॅलिक्स् n.--- पुष्पकोष, पुष्पवेष्टन.