spa-spe

spa स्पा
space स्पेस् n.--- जागा, अवधी, पोकळी, आकाश. अंतरिक्ष. विश्वांतील) अवकाश.
spacious स्पेशस् a.--- लांबी-रुंदीचा, अघळपघळ, ऐसपैस.
spade स्पेड् n.--- कुदळ, खनित्र.
spam स्पॅम् n.--- (ट्रेड-मार्क) डबाबंद डुकराचे मांस आदींचे मध्याह्नभोजन. E-mail दवारा येणारे आगंतुक / अवांछित टपाल.
span स्पॅन् v.i.--- वीत टाकून मोजणे. n.--- वीत, गर्भ, विस्तीर्ण. औषधी झरे असलेले विश्रामस्थान. औषधी पाण्याचा झरा.
spangle स्पँगल् n.--- टिकली, चमकी. v.t.--- -ला टिकल्या / चमक्यांनी / तत्सदृश वस्तूंनी भूषविणे, -वर टिकल्या, चमक्या, फुले इ. ची उधळण करणे.
spaniel स्पॅन्यल् n.--- एक कुत्र्याची जात.
spank स्पॅङ्क् n.--- (ढुंगणावर हाताने मारलेली) चापटी, थप्पड, ठोसा. v.--- थप्पड मारणे.
spanking स्पॅङ्किंग् a.--- भव्य, प्रशस्त, उत्तम. उमदा व चपळ (घोडा). जोराचा / सोसाट्याचा (वारा). n.--- = spank.
spar स्पार् v.i.--- कुस्ती / द्वंद्वयुद्ध खेळणे, झोंबाझोंबी करणे. झगडणे.
spare स्पेअर् v.t.--- हाथ राखून खर्च करणे, अडचण पडू न देणे, सोईने देणे. a.--- शिलकी, फालतू, कृश, अपुरा, जादा, जास्ती(चा), फाजील, अधिक.
sparer स्पेअरर् n.--- काटकसर करणारा.
sparingly स्पेअरिंग्लि ad.--- काटकसरीने.
spark स्पार्क् v.i.--- ठिणग्या निघणे / पडणे, झकझकणे, चमचमणे.
sparrow स्पॅरो n.--- चिमणी.
spasm स्पॅझम् n.--- झटका.
spat स्पॅट् (‘Spit’ चे भूतकाळचे रूप) n.--- (पाणी इ.चा हलका) शिपका / हबका / ठिपका. बोलाचाली, बाचाबाची, चकमक, चापटी, क्षुल्लक भांडण. v.t.--- चापटी मारणे. v.i.--- शिडकावणे, शिंपडणे, क्षुल्लक भांडणात गुंतणे.
spatial स्पेSशल् a.--- विरळ, विखुरलेला. a.--- अवकाशांतील, अंतरालसंबंधी.
spatula स्पॅट्यूला n.--- लांब पट्टीचा / दांड्याचा चमचा.
spawn स्पॉन् v.t./v.i.--- अंडी घालणे / वाढविणे. (स्व-)बीजारोपीत करणे, वाढणे, उपजणे, निपजणे, वाढविणे, उपजविणे, प्रसविणे. n.--- माशांची अंडी. उपज, प्रसव.
speak स्पीक् v.i.--- म्हणणे, बोलणे, उच्चार करणे, भाषण करणे, वाद करणे.
special स्पेशल् a.--- वेगळा, आगळा, विशेष, निराळा. विशेष / अधिक महत्वाचा / योग्यतेचा / दर्जेदार. अधिक स्वरूपाचा / कारणापुरता / कामापुरता. n.--- special वस्तु / व्यक्ति / गोष्ट.
specialist स्पेशॅलिस्ट् n.--- तज्ज्ञ. विशेषज्ञ.
speciality स्पेशिअॅलिटी n.--- विशिष्ट दर्जा / खूण (-युक्तता /-पूर्णता). विशेष गुणयुक्त वस्तु / उत्पादन / निर्मिति. विशिष्ट विषयांतील गुणवत्ता / कौशल्य / आवड.
specialty स्पेशल्टी = Speciality.
specie स्पीसी n.--- नगदी, ऐवज, सोने नाणे वगैरे.
species स्पीशीज् n.--- जात, तऱ्हा, प्रकार, वर्ग. ‘Genus’ या वर्गाच्या अंतर्गत प्राण्यांचा पोटवर्ग. उदा. Homo sapiens (यांतील ‘Homo’ हे ‘genus’ चे नाव व ‘sapiens’ हे ‘species चे नाव.
specific स्पसिफिक् a.--- असाधारण, नेमका, हटकून, गुणकारी. विशिष्ट (गुण-/व्यक्ति-/स्थिति- संबधीचा. स्पष्ट, असंदिग्ध, स्पष्टोल्लिखित, विनिर्दिष्ट. n.--- विशेष गुण / लक्षण.
specification स्पेसिफिकेशन् n.--- विशेष वर्णन / निर्देश.
specify स्पेसिफाय् v.t.--- क्रमवार लिहिणे / सांगणे.
specimen स्पेसिमेन् n.--- नमुना, मासाला, वानगी, वानोळा.
specious स्पीशस् a.--- लाघवी, दिखाऊ, दर्शनी.
speck स्पेक् n.--- डाग, ठिपका, कण.
speckle स्पेकल् v.t.--- डाग पाडणे, (ठिपक्यांनी) अंकित करणे.
speckled स्पेकल्ड् a.--- चित्रविचित्र, ठिपक्यांचा.
spectacle स्पेक्टॅकल् n.--- चमत्कार, खेळ, मौज.
spectacles स्पेक्टॅकल्स् n.--- चष्मा, उपनेत्र.
spectacular स्पेक्टॅक्युलर् a.--- डोळ्यांत / मनांत भारण्याजोगा, ठसठशीत, नेत्रदीपक, दृष्टिवेधक.
spectator स्पेक्टेटर् n.--- खेळ बघणारा, तमासगीर, प्रेक्षक.
spectral स्पेक्ट्रल् a.--- भुतासारखा.
spectre स्पेक्टर् n.--- भूत, छाया, समंध.
spectro- स्पेक्ट्रो ‘Spectrum’ या अर्थाचे समासगत-पद .
spectrogram स्पेक्ट्रोगॅम् n.--- ‘Spectrum’ चे छायाचित्र.
spectrograph स्पेक्ट्रोग्रॅफ् n.--- ‘Spectogram’ काढण्याचे यंत्र. = Spectrogram.
spectrum स्पेक्ट्रम् n.--- प्रकाश वीज इ. च्या झोतांत समाविष्ट विविधप्रकारच्या तरंगांची प्रकारानुसार मांडणी / पृथक्करण. विशिष्ट समूहातील प्रकारांचा आवाका. वैविध्यपूर्ण गट; विविधप्रकारांचा एक समूह. (रंग)प्रकारपट. संघातविशेष-पृथक्कृतांश-चित्रमाला.
speculate स्पेक्युलेट् v.i.--- कल्पना करणे. अज्ञाताबद्दल तर्क.
speculation स्पेक्युलेशन् n.--- विचार, कचाट, सट्टा, तर्क, कल्पना.
speculative स्पेक्युलेटिव्ह् a.--- तात्त्विक, व्यावहारिक.
speculator स्पेक्युलेटर् n.--- खटपट्या, तर्क करणारा.
speech स्पीच् n.--- भाषण, भाषा, वाणी.
speechify स्पीचिफाय् v.i.--- भाषण-/ व्याख्यान-/ बाजी करणे.
speechless स्पीच्लेस् a.--- कुंठित, मुका, निरुत्तर.
speed स्पीड् n.--- वेग, जय, यश, लाभ, त्वरा. v.t.--- त्वरा करणे, यश येणे, ठार करणे.
speedy स्पीडी a.--- वेगाचे, त्वरित.
speedily स्पीडिली ad.--- जलदीने, लौकर, जलदी.
spell स्पेल् v.t.--- शब्दाचे वर्ण सांगणे, वाचणे; मंत्र घालणे. n.--- मंत्र, भारणी, कवटाळ, सोडवणूक, काळ, वेळ.
spelling स्पेलिंग् n.--- वर्णरचना, जोडणी.
spend स्पेन्ड् v.i.--- खर्च होणे, झिजणे, संपणे, क्षीण होणे. v.t.--- खर्च करणे. संपविणे.
spent स्पेन्ट् a.--- उडवलेला, घालवलेला.
sperm स्पS(र्)म् n.--- पुरुषबीज (पेशी), वीर्य, धातु, शुक्र. (हिंदी : शुक्राणु)
spermatorrhoea स्पर्मॅटोरीअ n.--- जननेंद्रियांतून होणाऱ्या स्त्रावामुळे होणारा दाह. प्रमेह / परमा / स्वप्नावस्था आदि.
spew स्प्यू v.i.--- ओकणे, ओकारी काढणे; मुखावाटे बाहेर सोडणे, थुंकून टाकणे; (चिळकांडी वगैरे द्वारा) बाहेर सोडणे / टाकणे.