baw-bes

bawl बॉल् v.i.--- ओरडणे, किंकाळी फोडणे, जोरजोरात रडणे, बोंबलणे, आरडाओरडा करणे, खेकसणे, असभ्यपणे मोठ्याने ओरडणे.
beguile बिगाइल् v.t.--- मोहात पाडणे, भुरळ घालणे, मोहिनी घालणे, आकर्षित करणे.
beguiling बिगाइलिंग् a.--- मोहक, भुरळ पाडणारी, फसवी, आकर्षक.
benediction बेनेडिक्शन् n.--- धार्मिक समारंभाच्या शेवटी आशीर्वादांचा उच्चार, आशीर्वचन, आशीर्वाद.
beseech बिसीच् v.t./v.i.--- विनवणी करणे, निकडीची मागणी करणे, याचना करणे, कळकळीची विनंती करणे.
beset बिसेट् v.t.--- घेरणे, व्यापणे.
besotted बिसॉटेड् a.--- धुंद झालेला, मद्य किंवा प्रेम या मुळे मूढ झालेला, दिवाणा झालेला, कैफ चढलेला.