Tos-Tra

toss टॉस् v.t./v.i.--- उसळणे, उसळविणे, इकडे-तिकडे झुलविणे. तळमळने, जोराने फेकणे, कोलणे.
toss-up टॉसप् n.--- नाणे-फेक, समान संभाव्यता.
tot टॉट् n.--- बच्चा, बछडा, पोर, बाळ.
total टोटल् n.--- एकंदर, रक्कम, बेरीज, जमा. a.--- सर्व, अवघा, पूर्ण.
totalitarian टोटॅलिटेअरिअन्a.--- ‘Totalitarianism’ च्या स्वरूपाचा, सर्वसत्ताक, अनियंत्रित / निरंकुश सत्ता शाली.
totalitarianism टोटॅलिटेअरिअनिझम् n.--- प्रत्यक्षपणे / थेटपणे सरकार / शासन चालविणारी यंत्रणा, सर्वशक्तिमान असण्याची (अनियंत्रितपणे शक्तिशाली असण्याची) व्यवस्था, सर्वसत्तावाद.
totally टोटलि ad.--- अगदी पूर्णपणे, पुरतेपणी.
tote टोट् v.t.--- -ला हाती / अंगावर घेऊन जाणे / बाळगणे. Eg. ‘gun-toting sleuths’
totem टोटेम् n.--- (विशिष्ट जातीची / जमातीची) खूण, चिन्ह, ध्वज.
totter टॉटर् v.i.--- डळमळणे, लटपटणे, डगमगणे, डगमगत जाणे.
touch टच् v.t.--- स्पर्श करणे, हात लावणे, लागू पडणे, लागणे .
touch upon टच् - अपॉन् --- गोष्ट काढणे. Touch off: बत्ती देणे.
touching टचिंग् a.--- कळवळा आणणारा, हृदयविकारक. Prep.--- संबंधी, विषयी.
touchstone टच्स्टोन् n.--- कसोटी, निकाषग्रावा. निकष. Touch wood --- पेटवण.
touchy टचि a.--- चिरडखोर, हिरवट, शीघ्रकोपी.
tough टफ् a.--- चिवट, कणखर, लोचट, कोडगा, टिकाऊ.
tour टूर् v.i.--- प्रवास / फेरा करणे. n.--- दोर, तागाचे बुरकूल.
tournament टूर्नमंट् n.--- लढाई / स्पर्धात्मक खेळ.
tourney टूर्नी / टर्नी = Tournament
tourniquet ट्यूअर्निकेट् / टूर्निके n.--- शरीरांतील रक्तप्रवाह रोखण्याचे घट्ट आवळणाऱ्या बंधनाच्या रूपाचे साधन. प्रतिबंधाचे साधन / उपाय.
tousle टाउझल् v.t.--- विसकटणे, विखुरणे.
tout टाउट् n.--- (एखाद्या गोष्टीचा) (गिऱ्हाइकांत / इच्छुकांत) शिफारसपूर्वक प्रचार करणारा / दलाल. जाहिरात करणारा. v.i.--- (देय / विक्रेय गोष्टीसाठी) ग्रहणेच्छूंना आवाहन करणे. दलालीचा व्यवसाय / धंदा करणे. v.t.--- (एखादी देय / विक्रेय वस्तु (कर्म) आग्रहपूर्वक देऊ करणे / विकू/खपवू पाहणे. -चा प्रशंसापूर्वक / आग्रहाने पुरस्कार / प्रचार करणे.
tow टो v.t.--- (दोरी वगैरेंच्या साहाय्याने) ओढून नेण्याची क्रिया. In tow --- अनुसरण करीत. अनुच्चारित्व करीत; अनुसरणत. पाठोपाठ.
towards टोअर्ड्स् prep.--- कडे, विषयीं, बद्दल. ad.--- जवळ.
towel टॉवेल् n.--- हातरुमाल, अंगपुसणे, टुवाल.
tower टॉवर् n.--- उंच बंगला, मनोरा, बुरूज, गोपूर.
town टाउन् n.--- शहर, नगर. Town hall टाउन्-हॉल् n.--- नगर-मंदीर. ‘Come to town’ --- प्रकटणे, येऊन ठाकणे, ‘उगवणे.
toxaemia टॉक्सीमिया n.--- रक्तास झालेली विषबाधा, रक्तदोष.
toxic टॉक्सिक् a.--- ‘Toxin’ चा, ‘Toxin’ -जन्य, विषारी, विषजन्य, विषोद्भव. n.--- विष, विषारी द्रव्य.
toxicity टॉक्सिसिटि n.--- ‘Toxic’ (a.) -पणा.
toxin टॉक्सिन् n.--- जंतुनिर्मित (अति-)विषारी प्रथिन.
toy टॉय् n.--- खेळ. v.i.--- खेळणे, गमणे.
trace ट्रेस् v.t.--- शोध लावणे, अक्षर वळवणे / गिरवणे. -ची बाह्यकृति काढणे, (योजना इ.) -ला रेखाटणे. (खुणा, अवशेष, पुरावा इ.) -चा शोध घेणे / तपास करणे / हुडकणे. -चा भूतकाळ तपासणे. -चे भूतकाळांतील स्वरूप पाहणे. v.i.--- (मागे / भूतकाळांत) जाणे. a.--- पत्ता, शोध, छेडा, मागमूस, ओढण. वाटचालीत सोडलेली / अवशिष्ट खूण/रेखाकृति. अंश.
trachea ट्रेकिया n.--- स्वरयंत्रापासून फुफ्फुसांकडे जाणारा श्वासनलिकेचा फुफ्फुसांकडे वळण्यापूर्वीचा भाग. (pl. Tracheae)
track ट्रॅक् n.--- शोध, छडा, मार्ग, रस्ता, वाट.
tract ट्रॅक्ट् v.t.--- मार्ग काढीत जाणे. n.--- देश, प्रदेश, भाग. लहान धार्मिक पुस्तक.
traction ट्रॅक्शन् n.--- ओढण्याची / खेचण्याची प्रक्रिया. कर्षण, वहन.
trade ट्रेड् v.t.--- व्यापार करणे. n.--- व्यापार, धंदा, वाणिज्य.
trademark ट्रेड्मा(र्)क् n.--- व्यापरचिन्ह, विशिष्ट निमीत्यासाठी / विक्रेत्यासाठी विधी-अनुसार राखून ठेवलेले विशिष्ट विक्रेयवस्तूचे नाव / खूण. एखाद्या व्यक्तीचे खास वैशिष्ट्य.
trader ट्रेडर् n.--- व्यापारी.
tradition ट्रॅडिशन् n.--- दंतकथा. परंपरागत / पिढीजात आचार / रूढी.
traditional ट्रॅडिशनल् a.--- पारंपरिक, रूढ.
traditionary ट्रॅडिशनरी a.--- पारंपरिक, रूढ. परंपरानिष्ठ. दंतकथेचा.
traducement ट्रडूस्मेंट् n.--- कुटाळी, निंदा, कुटाळकी, बदनामी.
traffic ट्रॅफिक् n.--- व्यापार, व्यवहार.
tragedy ट्रॅजिडी n.--- दुःखपरिणामी नाटक, संकट, विघ्न, मृत्यु, शोकपर्यवसायी नाटक.
tragic ट्रॅजिक् a.--- अनिष्ट, घातकी.
trail ट्रेल् v.t.--- फरपटत नेणे / ओढणे. n.--- माग, वास, सरपट, पायवाट. मागून फरपटत जाणारा / ओढत नेला जाणारा भाग / वस्तु. अशा वस्तूने जमीन इ. वर काढलेली / सोडलेली रेखा / खूण. v.i.--- लोम्बत जमिनीवर लोळत / सरकत जाणे. फरपटत (मागून / अनिच्छेने / कष्टाने) जाणे, मागोमाग जाणे. (तुलनेने) मागे पडणे / कमी पडणे, कमी होणे, रोडावणे.
trailblazer ट्रेलब्लेझर् n.--- नेता किंवा एखाद्या क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती. पथदर्शी. अवघड परिस्थितीत बाहेर पडायचा मार्ग दाखवणारा.
trailblazing ट्रेलब्लेझिंग् a.--- (एखाद्या क्षेत्रात) अग्रेसर, अग्रगण्य.
trailer ट्रेलर् n--- मुख्य गाडीस मागे जोडलेला / जोडावयाचा गाडा / टाकी / वाहिका. जोडवाहिका. चित्रपटांतील निवडक / आकर्षक भागांच्या तुकड्यांनी संकलित परिचयासाठी / जाहिरातीसाठी केलेला लघु-(चित्र)-पट.
train ट्रेन् v.t.--- शिकविणे, वळण लावणे, शिक्षण घेणे, अभ्यास करणे. n.--- खटले, ओळ, क्रम, रांग, आगगाडीच्या डब्यांची माळिका. परंपरा.
traitor ट्रेटर् n.--- फितूर, विश्वासघातकी, राजद्रोही.
traitorous ट्रेटरस् a.--- विश्वासघातकी, स्वामिद्रोही (मनुष्य, कृत्य इ.).
trajectory ट्रॅजेक्टरी n.--- ग्रह, क्षेपणास्त्र आदींचा गोलाकार / वक्र / वक्राकार मार्ग. अशा प्रकारचा प्रगति इ. अन्य गोष्टींचा मार्ग / तो दाखविणारी आकृति.
trammel ट्रॅमेल् n.--- जाळे. v.t.--- फेऱ्यांत घालणे, अटकावणे.
trample ट्रॅम्पल् v.t.--- तुडवणे, उपमर्द करणे.
trance ट्रान्स् n.--- बेभान अवस्था, बेहोशी, देहातीतवृत्ति. समाधि, ध्यानावस्था.
tranche ट्रान्च् / ट्रांश् n.--- हिस्सा, भाग, हप्ता. भागभांडवलात घातलेला पूरक हिस्सा. (मूळ फ्रेंच शब्द)
tranquil ट्रॅङ्क्विल् a.--- शांत, स्थिर, अविचल, अचल.
tranquillity ट्रँक्विलिटी n.--- शांति, स्थैर, अविचलता.
tranquilize ट्रॅङ्क्विलाइझ् v.t.--- शांत करणे.
tranquilizer ट्रॅङ्क्विलाइझर् n.--- मनांतील तणाव, चिंता, दुःख आदि कमी करण्याचे औषध.
transact ट्रॅन्झॅक्ट् v.t.--- वहिवाटणे, करणे.
transaction ट्रॅन्झॅक्शन् n.--- वहिवाट, व्यवहार.
transcend ट्रॅन्सेंड् v.t.--- -ला पार करून / -च्या अतीत जाणे / असणे / होणे.
transcendent ट्रॅन्सेंडण्ट् a.--- पारग, पारगामी, अतीत अवस्थेतील, विशिष्ट मर्यादांच्या पलीकडील.
transcendental ट्रॅन्सेंडेण्टल् a.--- अपार, असीम, अतींद्रिय, मौलिक, आद्य, सर्वोच्च.
transcendentalism ट्रॅन्सेंडेण्टॅलिझम् n.--- गुणातीत / द्वंद्वातीत / अतींद्रिय असण्याची / होण्याची स्थिति / पद्धति / विचारसरणि.
transcribe ट्रॅन्स्क्राइब् v.t.--- नक्कल करणे. अन्य भाषेत / लिपीत रूपांतरित करून लिहिणे. लेखबद्ध करणे.
transcript ट्रॅन्स्क्रिप्ट् n.--- तोंडी सांगितलेल्या / टिपून घेतलेल्या मजकुराची व्यवस्थित लिहून काढलेली प्रत. अधिकृत नक्कल / प्रत, व्यवस्थित लेखबद्ध रूप.
transcription ट्रॅन्स्क्रिप्शन् n.--- नक्कल / अन्य भाषेत / लिपीत केलेले रूपांतर. अशी नक्कल / रूपांतर करण्याची प्रक्रिया. = transcript.
transfer ट्रॅन्स्फर् v.t.--- बदलणे, स्थलांतर करणे. (Past participle --- Transferred. ad. --- Transferring)
transference ट्रॅन्स्फरन्स् n.--- स्थलांतर, बदली.
transfix ट्रॅन्स्फिक्स् v.t.--- भोसकणे. भोसकून एका जागी खिळवून ठेवणे. स्तंभित करणे.
transform ट्रॅन्स्फॉर्म् v.t.--- रूपांतर करणे, स्वभाव / वृत्ति बदलणे.
transfuse ट्रॅन्स्फ्यूज् v.t.--- -ला पसरविणे, -चा प्रसार / फैलाव करणे. (रक्त इ.) (शरीरांत इ.) घालणे, -ला बाहेरून आंत सोडणे.
transgender ट्रॅन्स्जेण्डर् a.--- भिन्न- / विरुद्ध -लिंग -स्वभावाचा /-स्वभावाचा /-लक्षणी / -स्वभावी. (The regressive law-section 377, Indian Penal Code - had been used to criminalise homosexual and trangender people in India.)
transgress ट्रॅन्स्ग्रेस् v.t.--- उल्लंघणे, आज्ञाभंग करणे.
transgression ट्रॅन्स्ग्रेशन् n.--- उल्लंघन, आज्ञाभंग, अपराध, अन्याय, भंग.
transient ट्रॅन्झिअण्ट् a.--- क्षणिक, चंचल, क्षणभंगुर, अल्पजीवी, अल्पकालीन, अल्पकाळ.
transit ट्रान्सिट् / ट्रान्झिट् n.--- जाणे, संक्रमण, रस्ता, मार्ग. v.t./v.i.--- -च्या मधून / वरून (सरकत / फिरत) जाणे. n.--- अशी जाण्याची प्रक्रिया. In transit --- संक्रमणावस्थेतील / -वस्थेत. प्रवासांतील /प्रवासांत.
transition ट्रॅन्झिशन् n.--- स्थित्यंतर, बदलकाल-वस्ती, संक्रमण, वाटचाल.
transitive ट्रॅन्झिटिव्ह् a.--- सकर्मक. ‘Transition’ -युक्त / -स्वरूपाचा.
transitory ट्रॅन्झिटरि a.--- क्षणभंगुर, क्षणिक, चंचल
translate ट्रॅन्स्लेट् v.t.--- भाषांतर करणे, स्थानांतर करणे.
translation ट्रॅन्स्लेशन् n.--- भाषांतर, स्थानांतर.
translator ट्रॅन्स्लेटर् n.--- भाषांतरकार.
translucence ट्रँन्स्ल्यूसन्स् n.--- अर्धपारदर्शिकता.
translucent ट्रँन्स्ल्यूसण्ट् a.--- अर्धपारदर्शक.
transmigrant ट्रॅन्समाय्ग्रण्ट् a./n.--- ‘Transmigrate’ करणारा (जीव, प्रवासी इ.).
transmigrate ट्रॅन्समि(माय्)ग्रेट् v.i.--- (जीव इ.चे) एका शरीरांतून दुसऱ्यात जाणे, देहांतर करणे, स्थलांतर करणे.
transmigration ट्रॅन्समाय्ग्रेशन् / ट्रॅन्स्मिग्रेशन् n.--- जन्मांतर, पुनर्जन्म, देशांतर, ठाणापालट.
transmigrator / Transmigratory a./n.--- = Transmigrant
transmissible ट्रॅन्स्मिसिबल् a.--- एकीकडून दुसरीकडे पाठविण्याजोगा / पाठविला जाऊ शकणारा. प्रेषणीय, स्थानांतरणीय.
transmission ट्रॅन्झ्मिशन् n.--- स्थानांतरण. प्रेषण.
transmit ट्रॅन्स्मिट् v.t.--- पार जाऊ देणे. एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविणे / सोडणे.
transmute ट्रान्स्म्यूट् v.t.--- (to, into) -ला -मध्ये परिवर्तित करणे, -ला -चे रूप देणे.
transparency ट्रॅन्स्पेरेन्सि n.--- पारदर्शकपणा, स्वच्छपणा, स्पष्टपणा, खरेपणा, सरळपणा.
transparent ट्रॅन्स्पेरेन्ट् a.--- पारदर्शक, स्वच्छ, प्रांजळ.
transpire ट्रॅन्स्पायर् v.i.--- प्रसिद्ध होणे, फुटणे, बाहेर पडणे, घडणे, चव्हाट्यावर येणे.
transplant ट्रॅन्स्प्लॅण्ट् / ट्रॅन्स्प्लाण्ट् v.--- प्रत्यारोपित करणे, प्रत्यारोपण. v.t.--- दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावणे.
transport ट्रॅन्स्पोर्ट् v.t.--- नेणे, आनंदित करणे, काळ्या पाण्यावर पाठविणे, हद्दपार करणे, देहभान नाहीसे करणे. n.--- परमानंद, सामान वाहणारे गलबत, अत्यानंद, भर, आवेग.
transportation ट्रॅन्स्पोर्टेशन् n.--- काळ्या पाण्याची शिक्षा.
transpose ट्रान्स्पोझ् v.t.--- स्थलांतर करणे, अदलाबदल करणे, पालट करणे.
transversal ट्रान्झ्व्ह(र्)सल् n.--- (भूमितीत) दोन वा अधिक रेषांना / रेषापद्धतीस छेदून जाणारी रेषा, छेदिका.
transverse ट्रॅन्स्व्हर्स्
transvestite ट्रॅन्झ्वेस्टाइट् n.--- भिन्नलिंगी व्यक्तीचा पोषाख / वर्तन करणारी व्यक्ति. a.--- अशा व्यक्ति-/वर्तना-/संबंधीचा.
trap ट्रॅप् n.--- सांपळा, डाव, पेंच, कमानीची गाडी, ईटीदांडू. Trap door --- चोरदार.
trapeze ट्रपीझ् n.--- कसरतीचे खेळ करण्याचा आडव्या दांडीचा झोपाळा.
trapezium ट्रॅपीझिअम् n.--- आमोरसमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असलेला चौकोन.
trappings ट्रॅपिंग्झ् n.--- साज, शृंगार, भूषणे. नेपथ्य.
trapstick ट्रॅप्स्टिक् n.--- विटी-दांडू(चा खेळ).
trash ट्रॅश् v.t.--- -ला कचरा समजणे / कचरा म्हणून निकालांत काढणे. n.--- केरकचरा, कचराकुचरा, घाण.
trauma ट्रॉमा / ट्राउमा n.--- जखम, इजा, मानसिक आघात / धक्का. यांमुळे आलेली मानसिक विकृति / बिघाड. (Pl. Traumata / Traumas).
traumatic ट्रॉमटिक् a.--- अपाय / आघात /-संबंधी /-स्वरूपाचा
traumatise ट्रॉमटाइझ् v.t.--- -ला ‘Trauma’ ची शिकार / भक्ष्य बनविणे / ‘Trauma’ ने ग्रासणे.
travail ट्रॅव्हेल् v.i.--- वेणा येणे. n.--- प्रसूतिवेदना. तीव्र वेदना / हाल / कष्ट.
travel ट्रॅव्हल्
traveller ट्रॅव्हलर् n.--- मुशाफर, प्रवासी, उतारू.
travelogue ट्रॅव्हलॉग् n.--- प्रवासवर्णनात्मक, किंवा प्रेक्षणीय स्थलवर्णनात्मक लेख, / पुस्तक / व्याखान.
traversal ट्रॅव्हSर्सल् n.--- आक्रमून पार करण्याची क्रिया (एखाद्या क्षेत्राचा) या टोकापासून त्या टोकापर्यंत आढावा घेण्याची प्रक्रिया.
traverse ट्रॅव्हSर्स् ट्रॅव्हSर्स् n./a.--- -वर आडवी पसरलेली / -वरून उल्लंघून जाणारी / -ला आक्रमिणारी / चढून वा उतरून पार करणारी (वस्तु). असा मार्ग / रस्ता / चढ / उतार. असे पसरून राहण्याची स्थिति / पसरण्याची क्रिया. v.t.--- वरून / ओलांडून / आक्रमून जाणे. ‘Traverse’ च्या क्रियेत / स्थितींत असणे. -ची सर्वांगीण / व्यापक तपासणी करणे. (उदा. ‘Nothing in Respondent’s reply be treated as admitted unless specifivally traversed and expressly admitted hereunder.)
travesty ट्रॅव्हेस्टी / ट्रॅव्हिस्टी n.--- हास्यास्पद नक्कल, (साहित्यिक, कलात्मक, आचारात्मक) हीन दर्जाचे / अनुचित विडंबन / थट्टा /चेष्टा. माकडचेष्टा, विकृत विडंबन.
trawl ट्रॉल् v.--- ‘Trawl (n.)’ च्या साहाय्याने मासे मासे मारी करणे. n.--- शंकुआकाराचे समुद्रांत मासे धरण्याचे जाळे.
trawler ट्रॉल(र्) n.--- ‘Trawl (v.)’ करण्यासाठी बनविलेली नौका. मासेमारीची नाव.
tray ट्रे n.--- ताट, तबक, परात.