imp-ina

imp इम्प् n.--- खोडसाळ पोरटे, कारटे, मूत, बालभूत.
impact इम्पॅक्ट् n.--- स्पर्श, धक्का, धडक, रेटा.
impair इम्पेअर् v.t.--- हानि / नुकसान करणे.
impale इम्पेल् v.t.--- सुळावर देणे.
impart इम्पार्ट् v.t.--- देणे, दान करणे.
impartial इम्पार्शल् a.--- निस्पृह, निःपक्ष.
impatience इम्पेशन्स् n.--- उतावळी.
impatient इम्पेशन्ट् a.--- उतावळा.
impeach इम्पीच् v.t.--- दोषारोप करणे.
impeachable इम्पीचेबल् a.--- दोषार्ह.
impeachment इम्पीच्मेंट् n.--- गुन्हेगारी.
impeccable इम्पेकबल् a.--- स्खलनातीत, प्रमादातीत, पतनशीलतेपासून मुक्त. निर्दोष, बिनचूक, विशुद्ध.
impede इम्पीड् v.t.--- विघ्न करणे, मोडता घालणे.
impediment इम्पेडमन्ट् n.--- (कामात) अडथळा, व्यत्यय, (बोलण्यात) तोतरेपणा.
impel इम्पेल् v.t.--- पुढे लोटणे, चालवणे.
impend इम्पेंड् v.i.--- येऊन भिडणे.
impenetrable इम्पेनिट्रेबल् a.--- अभेद्य.
imperative इम्पेरेटिव्ह् a.--- आज्ञार्थक, आज्ञावाचक, आज्ञाप्रवण, आज्ञाकारी (स्वभावाचा), पालनीय, आवश्यक, अनुलांघनीय. तातडीचा, कर्तव्यभूत. n.--- आज्ञार्थी क्रियापदप्रक्रिया. अनुल्लंघ्य गोष्ट / तत्व.
imperfect इम्पर्फेक्ट् a.--- अपूर्ण, उणा.
imperial इम्पीरियल् a.--- सार्वभौमिक.
imperious इम्पीरिअस् a.---
imperishable इम्पेरिशबल् a.--- अक्षय, अव्यय, अविनाशी, शाश्वत.
impermanence इम्प(र्)मनन्स् n.--- अशाश्वता.
impermanent इम्प(र्)मनण्ट् a.--- अशाश्वत.
impersonal इम्प(र्)सनल् a.--- व्यक्तिरूपविहीन, व्यक्तिवाचक नसलेला, व्यक्तिनिरपेक्ष, वस्तुनिष्ठ.
impersonate इम्पर्सनेट् v.t.--- -ला जिवंत व्यक्तीचे रूप देणे. -चे सोंग घेणे / -चे पातीनिधिक रूप घेणे. (लबाडीने) स्वतःस अन्य व्यक्ति म्हणून सांगणे / दाखविणे, तोतयेगिरी करणे.
impertinence इम्पर्टिनन्स् n.--- आगाऊपणा, चोंबडेपणा, औद्धत्य.
impertinent इम्पर्टिनन्ट्
impetuous इम्पेच्युअस् a.--- जोरदार, हिरीरीचा, आवेशपूर्ण. आडदांड.
impetuosity इम्पेच्युऑसिटी n.--- जोर, जोष, आवेश, हिरीरी. आडदांडपणा, दांडगाई, दादागिरी, दडपशाही.
impetus इम्पिटस् n.--- प्रेरणा, चालना, उत्तेजन, पुढे चालण्यासाठी जोर.
imperturbable इम्पर्टर्बेबल् a.---
impetrate इम्पेट्रेट् v.t.---
impinge (on/upon)इम्पिन्ज् v.t.--- -वर ठसा उमटविणे, -ला आक्रमिणे / बाधा आणणे, -चा भंग करणे.
implacable इम्प्लॅकबल् a.--- दुर्दम्य, अदम्य, अनावर.
implead इम्प्लीड् v.t.--- विनविणे, हाती पायी पडून / पदर पसरून विनवणी करणे, -वर (न्यायालयात) दावा करणे / लावणे / काम चालविणे. -ला (न्यायालयीन / न्यायप्रविष्ट प्रकरणी) पक्षकार करणे / पक्षकार म्हणून गुंतवणे / समाविष्ट करणे. (उदा: Buta Singh impleaded as a party respondent to the writ petition.)
implode इम्प्लोड् v.i.--- कोसळून पडणे, कोलमडणे, आंतल्याआंत फुटणे.
implore इम्प्लोर् v.t.--- विनवणी करणे, गयावया करणे, आर्जव करणे.
imply इम्प्लाय् v.t.--- गर्भित अर्थ असणे, सुचविणे, ध्वनित करणे.
impolite इम्पोलाइट् a.--- अशिष्ट, असभ्य.
impolitic इम्पॉलिटिक् a.--- अविवेकी, अदूरदर्शी, अयुक्त.
imponderable इम्पॉन्डरबल् n./a.--- अज्ञातबल, अविदितप्रभाव.
import इम्पोर्ट् v.t.--- दुसर्या देशांतून आपल्या देशात आणणे. अर्थ असणे.
importance इम्पॉर्टन्स् n.--- महत्व, मोठा अर्थ, वजन.
important इम्पॉर्टन्ट्
impose इम्पोस् v.t.--- आग्रह धरून मागणे, गळी पडणे. घालणे, ठेवणे, फसवून गळ्यात घालणे, पृष्ठे छापखान्यात ठोकणे.
imposition इम्पोसिशन् n.--- घालणे, ठेवणे, बसवलेला कर.
impossible इम्पॉसिबल् a.--- अशक्य, असाध्य, असंभवनीय.
imposter इम्पोस्टर् n.--- तोतया.
imposture इंपॉश्चर् / इंपोश्चर् n.--- तोतयेगिरी; फसवणूक
impression इम्प्रेशन् n.--- ठसा, छाप, मुद्रा, भान, वचक, समजूत, आवृत्ति.
impressive इम्प्रेसिव्ह् a.--- प्रभाव पाडणारा, छाप टाकणारा, आदर उत्पन्न करणारा, प्रभावी, वजनदार, भारदस्त.
imprimatur इंप्रिमेटर् n.--- छापण्यास हुकूम, पसंत केल्याबद्दलची खूण / निशाणी. अधिकृत मान्यता, (औपचारिक) मंजुरी.
imprison इम्प्रिझन् v.t.--- तुरुंगात ठेवणे, कैद करणे, कोंडून ठेवणे.
imprisonment इम्प्रिझन्मेन्ट् n.--- कैद, बंदी.
improbable इंप्रॉबेबल् a.--- न होण्यासारखा, असंभाव्य, दुर्वट, दुरापास्त.
improper इंप्रॉपर् a.--- अयोग्य, नालायक, अनुचित, गैरवाजवी.
improve इंप्रूव्ह् v.t.--- अधिक चांगला करणे, सुधारणे. v.i.--- चांगला होत जाणे.
improvidence इंप्रॉव्हिडन्स् n.--- अदूरदर्शीपणा.
improvident इम्प्रॉव्हिडंट् a.--- अदूरदर्शी.
improvisation इम्प्रव्हायझेशन् n.--- झटपटकृति, तात्पुरती कामचलाऊ योजना / उपाय.
improvise इम्प्रव्हाइझ् v.i.--- तात्पुरती जुळवाजुळव करून रचणे / बनविणे / योजिणे / पुरविणे.
improvised इम्प्रव्हाइझ्ड् a.--- झटपट व तात्पुरता बनवलेला. कामचलाऊ.
imprudence इंप्रूडंस् n.--- पुढचा विचार न करणे, अविवेक.
impudence इंप्युडन्स् n.--- निर्लज्जपणा, धिटाई, औद्धत्य.
impulse इम्पल्स् n.--- चेव, हुरूप, मनोविकाराची उचल, जार, आघात.
impunity इंप्युनिटी n.--- शिक्षेची माफी. (अपायापासून) अभय.
impure इंप्युअर् a.--- अपवित्र, मलीन, अशुद्ध, पापी, भ्रष्ट, विटाळलेला.
imputation इंप्युटेशन् n.--- आरोप, ठपका, अपवाद.
impute इंप्यूट् v.t.--- Impute to…-ला (अर्थ, मूल्य, गुण, इ.) लावणे / चिकटविणे. (eg. a national value is imputed to the benefit flowing from self-occupation of house-property).
in इन् prep. आंत, मध्ये, मधी. Ins and outs : पूर्ण माहिती / खडान्खडा माहिती.
in as much as ad.--- कारण के, कां की, ज्या अर्थी.
in extenso = at full length, सर्वशः सविस्तर, ‘विस्तरेण’.
in limine (= on the threshold) उंबरठ्यावरच, प्रारंभीच, प्राथमिक अवस्थेतच, प्राथमिक चौकशीमध्ये.
in situ इन्सिट्यू a. / ad.--- नैसर्गिक / मूळ स्थितीतील / स्थितीत.
inability इनॅबिलिटि n.--- सामार्थ्याभाव, अशक्तता.
inaccessibility इन्अॅक्सिसिबिलिटि n.--- अगम्यता, दुर्गमता.
inaccurate इन्अॅक्युरेट् a.--- निष्काळजीपणे केलेला, अशुद्ध, चुकीचा, नादुरुस्त.
inactive इन्अॅक्टिव्ह् a.--- रिकामा पडलेला, सुस्त, निरुपयोगी.
inadequacy इन्अॅडिक्वसि n.--- अपुरेपणा, अयोग्यता, थिटेपण.
inadvertence इनड्व्हर्टन्स् n.--- अजाणतेपणा, दुर्लक्ष, निष्काळजीपणा, अनावधान, अनावधानाने झालेली चूक.
inadvertently इन्अॅड्व्हर्टन्टलि adv.--- गैरसावधपणाने, प्रमादाने, न कळून, नजरचुकीने.
inane इनेन् a.--- अर्थहीन, अर्थशून्य, व्यर्थ, वायफळ, पोकळ, फोल, बाष्कळ. मूर्ख, आचरट, गाढव. n.--- ‘inane’ वस्तु / व्यक्ति.
inanity इनॅनिटी n.--- पोकळपणा, अर्थहीनता, गाढवपणा. ‘Inanity’ चे कृत्य / वचन.
inapplicable इन्अॅप्लिकेबल् a.--- अनुपयुक्त.
inapt इनॅप्ट् a.--- अयोग्य, अनुचित.
inaptitude इनॅप्टिट्यूड् n.--- ‘Aptitude’ चा अभाव. आवश्यक अंगभूत गुणांचा / शक्तींचा / पात्रतेचा अभाव.
inattentive इन्अटेन्टिव्ह् a.--- गैरसावध, गाफील, लक्ष न देणारा.
inaudible इन्आॅडिबल् a.--- अश्राव्य, ऐकू न येणारा.
inaugural इनॉग्युरल् a.--- औपचारिक, सुरवातीचा, उद्घाटनसंबंधी, उद्घाटनविषयक, उद्घाटनाचा.
inaugurate इनॉग्युरेट् v.t.--- -ला समारंभपूर्वक विशिष्ट स्थानी / पदी स्थापिणे / नेमणे. -चे उद्घाटन/प्रारंभ/सुरवात करणे. अभिषेक करणे, समारंभाने सुरवात करणे, प्रसिद्ध करणे.
inauguration इनॉग्युरेशन् n.--- औपचारिक सुरवात, उद्घाटन. औपचारिक प्रारंभ/ उद्घाटन/ (विशिष्ट स्थानी) स्थापना.