Deco-Dee

Decontextualization डीकॉन्टेक्स्च्युअलाइझेशन् n.--- संदर्भहीन (आणि तद्द्वारा विकृत) करण्याची प्रक्रिया. असंबद्ध करून विकृत बनविण्याचे कार्य.
Decontextualize डीकॉन्टेक्स्च्युअलाइझ् v.t.--- -ला संदर्भविहीन करून (संदर्भापासून तोडून) समजणे / विकृत करून दाखविणे.
Decorate डेकोरेट् v.t.--- शृंगारणे, शोभा आणणे.
Decoration डेकोरेशन् n.--- सजावट, शोभा.
Decor डेकोर (भवनाची अंतर्गत) शोभा, शृंगार, सजावट.
Decorous डेकरस् a.--- विनय-/ शिष्टाचार-/ मर्यादा- युक्त, विनीत, शालीन.
Decorum डिकॉरम् n.--- विनय, शिष्टाचार, शालीनता, मर्यादा.
Decoy डिकॉय् v.t.--- आशा दाखवून फसवणे, -ला भुलविणे / भुलवून पकडणे, -ची दिशाभूल करणे. ‘Decoy one to’ … -ला फसवून -कडे नेणे. (Krishna cunningly decoyed Kalayavan to the cave where Muchkund was sleeping.) ‘Decoy -check / -investigation … ‘Decoy’ द्वारा अपराधांचे नियंत्रण वा तपास करण्याची प्रक्रिया. n.--- पक्ष्यांना भुलवून पकडण्याचा तलाव. दिशाभूल करण्यास /फसविण्यास / फसवून पकडण्यास वापरले जाणारे (कोणतेही) साधन/व्यक्ति.
Decrease डिक्रीज् v.t.--- कमी करणे. n.--- तूट, क्षय.
Decree डिक्री n.--- हुकूमनामा, कायदा, नियम, ईश्वरी संकेत. v.t.--- हुकूम करणे, ठराव करणे, व्यवस्था करणे.
Decrement डिक्रीमेंट् n.--- उतार, सूट, क्षय.
Decrepit डेक्रिपिट् a.--- जर्जर, खप्पड, वयातीत.
Decrepitude डेक्रिपिट्यूड् n.--- जरा, वृद्धपणा, जीर्णता.
Decry डिक्राय् v.t.--- नावाने हाका मारणे, दोष ठेवणे.
Dedicate डेडिकेट् v.t.--- नजर करणे, समर्पण करणे.
Dedication डेडिकेशन् n.--- ग्रंथार्पण, वाहने, अर्पणे.
Deduce डिड्यूस् v.t.--- अनुमान/तर्क करणे, तर्क/अनुमान द्वारा (पहा: ‘infer’ / ‘inference’)निश्चित, सर्वसाधारण नवा निश्चय करणे/मांडणे.
Deduct डिडक्ट् v.t.--- वजा करणे.
Deducted डिडक्टेड् a.--- वजा केलेला.
Deduction डिडक्शन् n.--- अनुमान, वजा केलेली रक्कम. वस्तु स्थितिसंबंधीचे अनेक निश्चय, त्यांमधील दृष्ट समान घटक आणि त्या समानघटकांबद्दलचा निश्चित सर्व साधारण सिद्धांत यांच्या आधारे केलेला व्यक्ति-विशिष्ट / वस्तुविशिष्ट निश्चय. असा निश्चय करण्याची प्रक्रिया. (उद.: All men are mortal. Socrates is mortal.) (पहा: ‘’inference’ / ‘induction’)
Deed डीड् n.--- काम, खात, रोखा, दस्तऐवज.
Deed of acquittance डीड् आॉफ् अक्वीटन्स् n.--- राजीनामा, पावती.
Deed of agreement डीड् आॉफ् अॅग्रीमेन्ट् n.--- करारनामा.
Deed of gift डीड् आॉफ् गिफ्ट् n.--- दानपत्र, बक्षिशपत्र, बेचनपत्र.
Deed of mortgage डीड् आॉफ् मॉर्ट्गेज् n.--- गहाणपत्र/खत.
Deed of sale डीड् आॉफ् सेल् n.--- फरोक्त खत.
Deed of divorce डीड् आॉफ् डिव्होर्स् n.--- फराकत.
Deem डीम् v.t.---स्वीकारणे, मानणे, समाजाने, गणणे, मत असणे, (विशिष्ट स्थान, योग्यता, पद, इ. विशिष्ट व्यक्ति, संस्था इ. बद्दल) स्वयंसिद्ध म्हणून अधिकृतपणे मानणे.
Deemed डीम्ड् a.--- ‘deem’ केला गेलेला, अभिमत. (That institute is a deemd university. ती संस्था अभिमित विद्यापीठ (म्हणून मान्यप्राप्त) आहे.)
Deep डीप् a.--- खोल, गूढ, गहन, गंभीर, तीक्ष्ण, दीर्घ, गडद, मग्न (eg. deep in meditation). n.--- समुद्र, गहन.
Deepen डीपन् v.t. / v.i.--- दृढ/घट्ट करणे, खोल करणे.