Of आॅफ् prep.--- -चा, -ची, -चे, -विषयी, -पैकी.
Off आॅफ् ad.--- लांब, दूर. int.--- निघ!, चल!, जा!
Off-break आॅफ्-ब्रेक् n.--- भूमीवरील एका टप्प्यानंतर उसळून, ‘off-side’(पहा)-कडून वळून फिरणारी क्रिकेटखेळांतील दक्षिणहस्ती गोलंदाजाची दक्षिणहस्ती फलंदाजाकडे केलेली चेंडूफेक.
Off hand आॅफ हॅन्ड् a.--- तात्कालिक, आयत्यावेळी, सफाईने ना केलेला. ad.--- सहज, तत्परतेने.
Off-side आॅफ्-साइड् n.--- खेळ-पट्टी-/धावपट्टी-च्या लांबीमधून जाणार्या मैदान-दुभाजक रेषेच्या, दक्षिणहस्ती फलंदाजाच्या पावलांच्या चवड्याकडील बाजूचा क्रिकेट मैदानाचा अर्धा भाग (पहा: ‘leg-side’).
Offal आॅफल् n.--- टाकाऊ मांस, कचरा, घाण.
Offence आॅफेन्स् n.--- अपराध, अन्याय, गुन्हा, राग.
Offend आॅफेन्ड् v.t.--- रुसवणे, मर्जी मोडणे, कंटाळा आणणे, पाप / गुन्हा करणे, अपमान करणे.
Offender आॅफेन्डर् n.--- गुन्हेगार, अपराधी, अन्यायी.
Offensive आॅफेन्सिव्ह् a.--- राग आणणारा, दुःखद, त्रासदायक, कुरापत काढणारा, मारक.
Offer आॅफर् v.t.--- अर्पण करणे, पुढे ठेवणे, पतकरणे, बळी देणे, देऊ करणे, देणे, होम करणे, सिद्ध होणे. n.--- अर्पण, बळी, पूजा.
Offerer आॅफरर् n.--- नजर करणारा, अर्पणारा, प्रस्ताव, देकार.
Office आॅफिस् n.--- कचेरी, हुद्दा, काम, कर्तव्य.
Officer आॅफिसर् n.--- कामगार, हुद्देदार, अधिकारी.
Official आॅफिशल् a.--- हुद्याचा, सरकारी कामाचा, ऑफिस- -विषयक/-संबंधीचा, कार्यालयीन. n.--- विशिष्ट पदावर काम करणारा पदाधिकारी. अधिकृत कार्यकर्ता.
Officialdom अफिशल्डम् n.--- अधिकारीगण, अधिकारीवर्ग.
Officialese अफिशलीज् n.--- कार्यालयीन भाषा(-शैली).
Officiate आॅफिशिएट् v.i.--- काम चालवणे, वहिवाटणे.
Officiating आॅफिशिएटिंग् a.--- काम करणारा / चालविणारा.
Officious आॅफिशस् a.--- उपकारी, लुडबुड्या, लुबरा, चोंबडा.
Offload आॅफ्लोड् v.t.--- (सामान / बोजा) उतरविणे, उतरवून घेणे.
Offset आॅफ्सेट् v.t. / v.i.--- (उणीव इ.) भरून काढणे, -ची भरपाई करणे, (तुल्यबल गोष्टीने) छेद देणे / जोर कमी किंवा नष्ट करणे.
Offshoot आॅफ्शूट् n.--- डहाळी, फांदी.
Offspring आॅफ्स्प्रिंग् a.--- संतति, संतान, वंश.
Oft, Often आॅफ्ट्, आॅफन् ad.--- वारंवार, अनेक वेळा.
Ogle ओगल् v.t.--- कटाक्ष फेकणे. n.--- कटाक्ष.
Ogre ओगर् n.--- नरभक्षी राक्षस.
Oh ओ int.--- ओ! आये! आ! अरे! अगे!
Ohm ओम् n.--- विशिष्ट विद्युत वाहकांतून वाहतांना विद्युत-प्रवाहास होणारा विरोध / रोध / अडथळा (विद्युत-रोध) मोजण्याचे माप.
Oil आॅइल् v.t.--- तेल लावणे. n.--- तेल, तैल.
Oil cake आॅइल् केक् n.--- पेंड.
Oilman ऑइलमन् n.--- तेली.
Oily आॅइलि a.--- तेलाचा, तेलकट, तेलसर.
Ointment आॅइन्ट्मेंट् n.--- मलम, माखणे, विलेपन.
Okra ओक्रा n.--- भेंडी.