Mam-Mar

Mamma माम्मा n.--- आई, माई, बये.
Mammal मॅमल् n.--- सस्तन प्राणी.
Mammalian मॅमेलिअन् a.--- ‘Mammal’- विषयक / -जातीचा.
Mammon मॅमन् n.--- संपत्ति, लक्ष्मी.
Man मॅन् n.--- मनुष्य, पुरुष, गडी, मर्द, बाप्या.
Man Friday : चाकर, सेवादार, गुलाम, हरकाम्या, लाचार अनुयायी.
Manacle मॅनाकल् v.t.--- हातबेडी घालणे. n.--- हातबेडी.
Manager मॅनेजर् n.--- कारभारी, व्यवस्थापक.
Managery मॅनेजरी n.--- व्यवस्था, काटकसर.
Mandarin मँडरिन् n.--- सचिवगण, सल्लागार, अमात्यमंडळ.
Mandate मॅन्डेट् n.--- आज्ञा, हुकूम, आदेश, जनादेश, अधिकार -क्षेत्र / -मर्यादा v.--- (विशिष्ट कामासाठी) आदेश / आज्ञा / अधिकार / मार्गदर्शन देणे.
Mandolin / Mandoline मॅण्डलिन् n.--- एक तंतुवाद्य.
Mane मेन् n.--- आयाळ.
Manege मानेज् n.--- अश्वशिक्षाशाला, घोड्यांचा तालीमखाना.
Manful मॅन्फुल् a.--- मर्दपणाचा, मर्दुमकी.
Manger मॅन्जर् n.--- गुरांस दाणा चाटण्याचा कोठिंबा, गव्हाण.
Mangle मँगल् v.t.--- छिन्नविछिन्न करणे, चेंचणे.
Mango मँगो n.--- आंबा, आम्र. Mango gove - आमराई. Preserved mango - गुळांबा. Unripe mango - कैरी.
Mangosteen / Mangostan मँगॉस्टीन् n.--- अमसूल (-फळ /-झाड). अमसूल, कोकम्ब, रातंबा.
Mangrove मँग्रोव्ह् n.--- सागरतीरी दलदलीत घनदाट मुळांचे जाळे पसरून वाढणाऱ्या वनस्पतिविशेष / वनस्पतिजातींचा समूह. खारफुटी.
Manhood मॅन्हुड् n.--- माणूसपणा, प्रौढपणा.
Mania मेनिआ n.--- वेड.
Maniac मेनिअॅक् a. and n.--- वेडा, वेडापिसा, माथेफिरू.
Manicure मॅनिक्युअर् - हात / नखे रंगविणारा / सजविणारा; (हात / नखे वगैरेचा) साज / शृंगार; असा शृंगार करणे; शृंगारणे. (See pedicure).
Manifest मॅनिफेस्ट् v.t.--- उघड करणे, दाखविणे, प्रत्यक्षात आणणे, प्रकटविणे. a.--- उघड, प्रत्यक्ष, व्यक्त.
Manifesto मॅनिफेस्टो n.--- जाहीरनामा (राजाचा). राजकीय पक्ष इ. चे आपल्या ध्येयधोरणाचे व कार्यक्रमाचे अधिकृत विवरणपत्र (विशेषतः आगामी निवडणुकीच्या संदर्भातील). प्रकटन. (हिंदी : (चुनाव-/निर्वाचन-) घोषणापत्र).
Manifold मॅनिफोल्ड् a.--- पुष्कळ प्रकारचा, अनेकरूप.
Manikin मॅनिकिन n.--- खुजा, वामनमूर्ति. = Mannequin.
Mankind मॅकाइन्ड् n.--- मनुष्यजाति, माणसे, जग.
Manlike मॅन्लाइक् a.--- मर्दानी, साहसी, धाडसी.
Manliness मॅन्लिनेस् n.--- मर्दपणा, मर्दाई, पौरुष्य.
Manly मॅन्ली a.--- शूर, मर्द, दिलदार, साहसी. Ad.--- मर्दपणाने, दिलदारपणाने.
Manna मॅना n.--- (ईश्वरदत्त) अन्न. अचानक मोठा लाभ, घबाड.
Mannequin मॅनिक्विन् / मॅनिकिन् n.--- कपड्याच्या दुकानांतील वस्त्रप्रदर्शनासाठी वगैरे केलेला मानवी पुतळा, मानवी प्रतिकृति.
Manner मॅनर् n.--- चाल, रीत, तऱ्हा, मार्ग.
Mannerliness मॅनर्लिनेस् n.--- शिष्टता, सभ्यता, शिष्टाई.
Mannerly मॅनर्लि a.--- शिष्ट, सभ्य.
Mannish मॅनिश् a.--- मानवी, मर्दानी, पौरुषेय.
Mansion मॅन्शन् n.--- वाडा, हवेली, महाल. चंद्राच्या आकाशगोलांतील भ्रमणमार्गाचा १३ अंश २० मिनिटे एवढा भाग, नक्षत्र.
Mantel मॅण्ट्ल् n.--- = Mantelpiece = Mantelshelf.
Mantelpiece मॅण्ट्ल्पीस् n.--- आगीच्या जागेवर / भोवती केलेले आलंकारिक लाकडी / दगडी काम.
Mantelshelf मॅण्ट्ल्शेल्फ् n.--- अग्निस्थानावरील कट्टा / प्रस्तर.
Mantle मॅन्टल् v.t.--- आच्छादणे, लपविणे, पांघरून घालणे. n.--- अंगवस्त्र, चादर, आच्छादन, झगा.
Manual मॅन्युअल् a.--- हातचा, हातकामाचा, हस्तसंबंधी, पुस्तिका.
Manufactory मॅन्युफॅक्टोरी n.--- कारखाना, शिल्पशाला.
Manufacture मॅन्युफॅक्चर् v.t.--- कारागिरीने करणे, तयार करणे. n.--- रचना, घटना, कारागिरीची वस्तु.
Manufacturer मॅन्युफॅक्चरर् n.--- कारागिर, शिल्पी.
Manumission मॅन्युमिशन् n.--- गुलामीतून सुटका. दास्यमुक्ति.
Manumit मॅन्युमिट् v.t.--- (गुलाम इ.) ला दास्यमुक्त करणे.
Manure मॅन्यूर् v.t.--- खत घालणे. n.--- खत (शेण इ. प्राणिज पदार्थांपासून बनलेले).
Manuscript मॅन्युस्क्रिप्ट् n.--- हाताने लिहिलेला कागद / पुस्तक, हस्तलेख. a.--- हाताने लिहिलेला, हस्तलिखित.
Many मेनि a.--- पुष्कळ, बहुत. Many one - पुष्कळ लोक. The many - बहुतेक लोक. Too many - फार बलिष्ठ समुदाय.
Map मॅप् n.--- नकाशा. v.t.--- नकाशा काढणे, वर्णन करणे.
Mar मार् v.t.--- नासणे, बिघडविणे, दुखवणे, मोडणे. n.---
Marathon मॅरथन् n.--- दीर्घ अंतर पायी पळून काटण्याची शर्यत. जागतिक ऑलिम्पिक खेळांतील २६ मैल ३८५ यार्ड अंतराची पायी पाळण्याची शर्यत. (इ.स. पूर्व ४९० मध्ये झालेल्या ग्रीसमधील मॅरथन - युद्धातील अथेन्सच्या पर्शियनांवरील विजयाची वार्ता कळविण्यासाठी एका ग्रीक सैनिकाने पायी पळत काटलेले अंतर).
Maraud मॅरॉड् v.i.--- लुटणे. n.--- लूट.
Marauder मॅरॉडर् n.--- लुटारू, पुंड.
Marble मार्बल् a.--- संगमरवरी. n.--- संगमरवरी दगड, गोटी. v.t.--- रंगीबेरंगी करणे.
March मार्च् n.--- इंग्रेजी वर्षांचा तिसरा महिना. v.t.--- कवाऐटीने चालविणे, कूच करणे. v.i.--- मिरवत चालणे.
Mare मेअर् n.--- घोडी.
Margin मार्जिन् n.--- काठ, किनारा, समास, तफावत.
Marginal मार्जिनल् a.--- कडेचा, समासाचा.
Marginaliz(s)e मार्जिनलाइझ् v.t.--- बाजूस सारणे, कोपऱ्यात बसविणे, दुय्यम / गौण / हलके स्थान / दर्जा / अवस्था देणे, उपेक्षिणे.
Marginally मार्जिनलि ad.--- समासांत.
Marigold मॅरिगोल्ड् n.--- झेंडू, झेंडूचे फूल, मखमल.
Marine मरीन् n.--- आरमारी काम, नौदलांतील आरमारी शिपाई.
Marionet मॅरिआॅनेट् n.--- कळसूत्री बाहुली, कठपुतली.
Maritime मॅरिटाइम् a.--- समुद्रकाठचा, जहाजाचा. n.--- v.t.---
Marjoram मा(र्)जरम् n.--- ‘पुदिना’ जातीची वनस्पति. पहा: ‘Mint’, ‘Oregano’.
Mark मार्क् n.--- निशाणी, खूण. v.t.--- निशाणी / खूण करणे, ध्यानात धरणे. Mark out - निवडून काढणे.
Marker मार्कर् n.--- चिन्हदायक / चिन्हभूत (रंग, आकार, इ.) गुणदायक पदार्थ / वस्तु. Petroleum Ministry is thinking on re-introducing a chemical marker in kerosine to check its diversion for adulteration.) (Kerosine-marker-system will be re-introduced (2011 A.D.))
Market मार्केट् n.--- बाजार, जत्रा. v.t.--- विक्रीस मांडणे, विकणे. Market day - बाजाराचा दिवस. Market place - बाजाराची जागा. Market rate - बाजारभाव. Market town - बाजार गांव. Market woman - बाजारकरीण.
Marketing मार्केटिंग् n.--- सौदा / बाजार करणे.
Marking मार्किंग् n.--- खूण, निशाणी.
Marking nut मार्किंग्नट् n.--- बिब्बा, बिबा, भिलावा.
Marksman मार्क्स्मन् n.--- निशाण मारणारा.
Marl मार्ल् n.--- चिकणमाती. v.t.--- चिकणमाती लावणे.
Marmalade मार्मलेड् n.--- मुरब्बा = jam.
Marmoset मार्मोझेट् n.--- एक विशिष्ट छोट्या जातीचे माकड.
Maroon मरून् v.t.--- निर्जन बेटावर / किनाऱ्यावर सोडणे / त्यागणे. असहाय अवस्थेत एकाकी ठेवणे. n.--- गडद तपकिरी झाक असलेला लाल रंग.
Marquee मार्की n.--- मांडव, मंडप, (मोठा) तंबू. सभामंडप.
Marriage मॅरेज् / मॅरिज् n.--- लग्न, विवाह.
Married मॅरिड् a.--- विवाहित, लग्न झालेला, संयोग, जोड(ण).
Marrow मॅरो n.--- मेंदू, गीर, मगज, चरबी, मज्जा.
Marry मॅरि v.i.--- लग्न करणे. v.t.--- लग्न करून देणे.
Mars मार्स् n.--- मंगळग्रह.
Marsh मार्श् n.--- दलदल. Marshy मार्शी a.--- दलदलीचा.
Marshal मार्शल् v.--- (सैन्य, सामान, कागदपत्र इ. ची) व्यवस्थित मांडणी / रचना करणे.
Marshy मार्शि
Marsupial मार्सूपिअल् a.--- ‘Marsupium’ धारण करणारा (प्राणी).
Marsupium मार्सूपिअम् n.--- ९अपरिपक्व अवस्थेत जन्मणाऱ्या) पिलांना ठेवण्यासाठी असलेले खिशासारखे शरीरांग (उदा. कांगारू मादीच्या पोटाशी असलेली पिशवी).
Mart मार्ट् n.--- पेठ, बाजार, विक्रयस्थान.
Martial मार्शल् a.--- युद्धाचा, युद्धोपयोगी, लढाऊ, लष्करी, शूर.
Martyr मा(र्)ट(र्) n.--- स्वधर्मासाठी प्राण देणारा. हुतात्मा. v.t.--- छळणे.
Martyrdom मा(र्)ट(र्)डम् n.--- स्वधर्मासाठी प्राण देणे. (विशिष्ट कार्यासाठी केलेले) प्राणार्पण, प्राणाहुति.
Marvel मार्व्हेल् v.i.--- चमत्कार / नवल वाटणे. n.--- चमत्कार, नवल.
Marvelous मार्व्हलस् a.--- नवलाचा, अद्भुत.