wou-wry

wound वूण्ड् v.t.--- जखम करणे. n.--- जखम.
wrangle रँगल् n./v.i.--- हुज्जत (घालणे), वादावादी / बाचाबाची (करणे). कलागत करणे. n.--- कलागत.
wrap रॅप् v.t.--- गुंडाळणे, वेष्टणे, उपरणे, लपेटणे. n.--- गुंडाळी, कवच.
wrapper रॅपर् n.--- वेष्टण, रुमाल.
wrath रॅथ् n.-- राग, क्रोध.
wrathful रॅथ्फुल् a.--- रागीट, राग आलेला.
wreak रीक् v.t.--- -ची उधळण / वृष्टि / आघात करणे, (विध्वंस, धिंगाणा इ.) घडवून आणणे. सूड उगविणे, दावा साधणे.
wreath रीद् n.--- वेष्टिलेली / गुंडाळलेली / वक्राकार वस्तु. वेष्टन, गुंडाळी, मुद्रिका. गोलाकार आवरण.
wreathe रीथ् v.t.--- वेष्टिणे, गुंडाळणे, व्यापणे. n.--- हार, माळ, माला.
wrest v.t.--- हिसका देऊन ओढून घेणे/काढून घेणे, फिरविणे, वळविणे. n.--- तंतुवाद्याच्या तारा फिरवून घट्ट किंवा सैल करण्यासाठी (ट्यून करण्यासाठी) वापरायची छोटी किल्ली अथवा पाना.
wrestle रेसल् v.t.--- कुस्ती करणे, खेळणे, लढणे, झुंजणे. कुस्ती, झोंबी.
wrestler रेसलर् n.--- पहिलवान, मल्ल, जेठी.
wrestling रेस्लिंग् n.--- कुस्ती, मल्लयुद्ध.
wretch रेच् n.--- अति-दरिद्री /-दुर्दैवी / अभागी. दळभद्री, करंटा. क्षुद्र / हीन व्यक्ति.
wretched रेचेड् a.--- दुःखी, दरिद्री, भिकारी, दुःखाचा.
wretchedness रेचेड्नेस् n.--- भिकारपणा, दुःख.
wretchedly रेचेड्लि ad.--- भिकारपणाने.
wriggle रिगल् v.i.--- वळवळणे. n.--- लवलव.
wright राइट् n.--- ‘करंटा, ‘कामगार’ ‘कारागीर’ अशा अर्थी बहुधा समस्तपदी. उदा. ‘Playwright’.
wring रिंग् v.t.--- पिळणे, पिळून काढणे, गांजणे, मुरगळणे. (past tense - wrung).
wrinkle रिंकल् v.i.--- सुरकुतणे, सुरकुती पाडणे. n.--- सुरकुती.
wrist रिस्ट् n.--- मनगट.
write v.t.--- लिहिणे, पुस्तक लिहिणे, लिहून दाखविणे, पत्र पाठविणे, कारकुनी करणे.
writer राइटर् n.--- लेखक, कारकून, ग्रंथकार.
writing राइटिंग् n.--- अक्षर, लिखाण, लेख, पुस्तक, दस्तऐवज, शिलालेख, लिपी.
wrong राँग् a.--- चुकीचा, गैरशिस्त, अन्यायाचा, भ्रमाचा. v.t.--- अपराध करणे, जुलूम करणे, दोष लावणे. n.--- चूक, अन्याय.
wrongly राँग्लि ad.--- चुकून, अन्यायाने.
wrongful राँग्फुल् a.--- अन्यायाचा, गैरशिस्त.
wrongfully राँग्फुली ad.--- नाहक.
wroth रॉथ् / राथ् n.--- अतिकोष, क्रोधावेष. a.--- फार रागावलेला.
wryness राय्नेस् n.--- वक्रता, वाकडेपणा.