ren-rep

renaissance रिनेसन्स् / रिनेसन्स् / रेनसान्स् n.--- (मूळ फ्रेंच भाषेतील अर्थ : पुनर्जन्म / नवजन्म) अशा पुनरुज्जीवनाचा काळ (युरोपात इ.स. चे १४ वे ते १७ वे). पुनरुज्जीवन, जीर्णोद्धार. ‘प्रबोधनकाल’. (हिंदी : नवजागरण, पुनर्जागरण).
renal रीनल् a.--- मूत्रपिंडाचा, मूत्रपिंडातील.
end रेन्ड् v.t.--- चिरणे, फाडणे, दुभागणे, हिसकणे.
render रेन्डर् v.t.--- परत देणे, भाषांतर करणे.
rendezvous रॉन्दिव्हू / रॉन्देव्हू n.--- जमण्याची जागा, टिपण, नियोजित जागेवर घडलेली भेट / बैठक.
rendition रेण्डिशन् n.--- कृति, प्रयोग, निर्मिति, प्रात्यक्षिक (गायन, वादन, नृत्य, अनुवाद इ. मधील).
renegade रेनिगेड् n.--- स्वधर्मत्यागी, फितुरी, शत्रूला मिळणारा, च्युतव्रत, मार्गभ्रष्ट, त्यक्तव्रत. अंगीकृत कार्यापासून चळलेला. द्रोही, बंडखोर, फितूर. बहिष्कृत पक्षद्रोही, विचार(धारा)द्रोही. v.i.--- ‘renegade’ होणे / -सारखे वागणे.
renege रिनि/ने/ग् v.t. / v.i.--- (नियम) सोडून देणे / त्यागीने / मोडणे. Renege on --- (स्वीकृत तत्व, निष्ठा, जबाबदारी, भूमिका, निश्चय, पक्ष, वाचन इ.) -पासून हटणे / तोंड फिरविणे / माघार घेणे / पळ काढणे / च्युत / भ्रष्ट होणे.
renew रिन्यू v.t.--- नवा करणे, जीर्णोद्धार करणे.
renounce रिनाउन्स् v.t.--- अंगाबाहेर टाकणे, -ला त्यागिणे / सोडणे. -पासून परावृत्त होणे.
renovate रेनव्हेट् v.t.--- -चे नूतनीकरण करणे, -ची डागडुजी करणे.
renovation रेनव्हेशन् n.--- नूतनीकरण, डागडुजी, जीर्णोद्धार.
renown रिनाउन् n.--- नांव, प्रख्याति, आख्या, कीर्ति.
renowned रिनाऊन्ड् a.--- प्रख्यात, नामांकित.
rent रेन्ट् v.t.--- भाड्याने देणे, सार्याने लावणे. n.--- भाडे, जमिनीचा सारा, फाळा, खंड, भोक, चीर.
rentier रेण्टिए n.--- व्याजरूप मिळकतीवर जगणारा, सावकारीवर उपजीविका करणारा, बसून खाणारा.
rentroll रेन्ट्रोल् n.--- जमाबंदी, तहशील.
renunciant रिनन्शियण्ट् n./a.--- त्यागी, संन्यासी, त्यागप्रवण, विरक्त, बैरागी.
renunciation रिनन्सिएशन् n.--- उत्सर्ग, त्याग, सन्यास, निवृत्ति, परावृत्ति, अनासक्ति, मनःसंयम.
renunciative रिनन्शटिव्ह् a.--- ‘Renunciation’ - संबंधीचा.
reorganisation रिआॅर्गनायझेशन् n.--- पुनर्घटना.
repair रिपेअर् v.t.--- डागडुजी करणे, तोठा भरणे, सुधारणे, परतणे. n.--- डागडुजी, जीर्णोद्धार, दुरुस्ती.
repairable रिपेरेबल् a.--- डागडुजी करण्याजोगे.
reparation रिपेरेशन् n.--- डागडुजी, भरपाई, फेड.
repartee रिपार्टी n.--- हजीरजबाब, समर्पक उत्तर, रोखटोक प्रत्युत्तर, हजरजबाबीपणा.
repast रिपास्ट् n.--- भोजन, आहार, अन्न, जेवण.
repay रिपे v.t.--- परत देणे, फेडणे, प्रतिदान करणे.
repeal रिपील् v.t.--- रद्द करणे. n.--- मोड, भंग, लोप, विलोपन.
repeat रिपीट् v.t.--- पठाण करणे, पुनः बोलणे.
repel रिपेल् v.t.--- मागे हटवणे, विरोध करणे.
repellent रिपेलन्ट् n.--- प्रतिबंधक, प्रतिरोधक.
repent रिपेन्ट् v.i.--- पश्चात्ताप वाटणे, मन पालटणे.
repentance रिपेन्टन्स् n.--- पश्चात्ताप, अनुताप.
repercussion रिपर्कशन् n.--- परावर्तन, प्रतिध्वनि, उलट, उसळी.
repertoire रेपर्टवार् / रिपट्वा(र्) n.--- नाट्यसंस्था इ. चे प्रयोगासाठी बसविलेले विविध खेळ / कार्यक्रम. एखाद्या संस्थेकडे / दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या सेवांची / विक्रेय वस्तूंची यादी / माहितीसंग्रह.
repertory रेपर्टरि n.--- कोठा, कोठी, भांडार. नाट्यप्रयोग सादर करणारी नाट्यसंस्था. अशा संस्थेचे नाट्यगृह. = Repertoire.
repetition रिपिटिशन् n.--- पुनरावृत्ति, पठन.
repine रिपाइन् v.i.--- मनांत झुरणे, खंत घेणे.
replace रिप्लेस् v.t.--- पुनः ठेवणे, परत देणे, बदली देणे, नवा बदल करणे. (Replace (one) (with / by)) -ची जागा भरून काढणे.
replenish रिप्लेनिश् v.t.--- तंतोतंत भरणे, पुनः भरणे.
replete रिप्लीट् a.--- परिपूर्ण, पुरा.
replica रेप्लिक n.--- प्रतिकृति, प्रतिमा, मूर्ति, नक्कल, प्रतिरूप, प्रत, (पुनर्-)आवृत्ति.
replicate रेप्लिकेट् v.t.--- -ची आवृत्ति / प्रतिकृति करणे, पुनःपुनः करणे, (चित्र वगैरे ची) हुबेहूब नक्कल करणे.
replication रेप्लिकेशन् n.--- प्रतिकृति, प्रतिरूप, (पुनर्-)आवृत्ति. ‘Replicate’ करण्याची प्रक्रिया. = Replica.
reply रिप्लाय् v.t.--- उत्तर देणे. n.--- उत्तर, जबाब.
report रिपोर्ट् v.t.--- लिहिणे, हकीकत सांगणे, कळविणे, टिपण घेणे, रपोट करणे. n.--- हकीकत, कैफियत, बातमी, वार्ता, सूचना, बोलवा, रपोट, आवाज, बार, निवाडापत्र, अहवाल. (हिंदी: विवरण)
reportage रिपॉ(र्)टाज् / रिपॉ(र्)टिज् n.--- वृत्तलेखन(-क्रिया), वृत्तांकन(-कार्य) / (पद्धति).
repose रिपोझ् v.i.--- निजणे, स्वस्थ असणे, लवंडणे; विश्वास ठेवणे. n.--- विसांवा, स्वास्थ्य, निद्रा.
reposit रिपॉझिट् v.t.--- ठेवणे, जपून ठेवणे.
reprehend रिप्रिहेन्ड् v.t.--- दोष / ठपका लावणे.
reprehensible रिप्रेहेन्सिबल् a.--- दोषास्पद, निंद्य, गर्हणीय.
reprehension रिप्रिहेन्शन् n.--- दोष, ठपका, बोल.
represent रिप्रिझेन्ट् v.t.--- दाखविणे, वर्णन करणे, चित्र काढणे, सोंग घेणे, प्रतिनिधि होणे, मांडणे.
representation रिप्रिझेन्टेशन् n.--- दाखविणे, वर्णन, चित्र, सोंग, प्रतिनिधित्व, नमुना, नकाशा.
representative रिप्रिझेन्टेटिव्ह् n.--- प्रतिनिधि. a.--- प्रतिनिधिस्वरूप.
repress रिप्रेस् v.t.--- दाबणे, दडपणे, दबविणे.
repression रिप्रेशन् n.--- दडपण, दाब.
reprieve रिप्रीव्ह् v.i.--- शिक्षेची तहकुबी करणे. n.--- शिक्षेची तहकुबी. त्रासातून तात्पुरती सुटका.
reprimand रेप्रिमांड् v.t.--- तोंडची शिक्षा / धमकी देणे. -ची निर्भर्त्सना करणे (सामान्यतः रीतसर वा औपचारिकपणे या अर्थी), -ची कानउघाडणी करणे, -ला धिक्कारणे / फटकारणे. n.--- धमकी, वाग्दण्ड, ताकीद, (निर्-)भर्त्सना, धिक्कार.
reprisal रिप्रायझल् n.--- प्रत्यपहार, प्रतिहरण.
reproach रिप्रोच् v.t.--- निंदा करणे, बोल लावणे. n.--- निंदा, अपवाद, लज्जाकारण, लज्जापवाद.
reproachable रिप्रोचेबल् a.--- निंद्य, गर्ह्य, निंदास्पद.
reprobate रिप्रोबेट् v.t.--- नापसंत करणे, नाकारणे. a.--- माणसांतून उठलेला. n.--- पापांत लोळणारा.
reprobation रिप्रोबेशन् / रिप्रबेशन् n.--- नापसंती, निंदा, बोल, नामंजुरी, धिक्कार.
reproduction रिप्रॉडक्शन् n.--- प्रजनन.
reproof रिप्रूफ् n.--- शब्द, बोल, शब्दप्रहार.
reprove रिप्रूव्ह् v.t.--- शब्दांचा मार देणे, बोलणे.
reptile रेप्टाइल् a.--- नीच, अधम, सरपटणारा.
republic रिपब्लिक् n.--- लोकसत्तात्मक राज्य.
repudiate रिप्यूडिएट् v.t.--- घटस्फोट करणे, अंगाबाहेर टाकणे, टाकून / सोडून देणे, नाकारणे.
repugnance रिपग्नन्स् n.--- वांकडेपणा, कंटाळा, विरोध, नाखुषी, तीव्र तिरस्कार, किळस, घृणा, तिटकारा, हाडवैर, विसंगति, विरोधाभास.
repugnant रिपग्नन्ट् a.--- वांकडा, प्रतिकूल.
repulse रिपल्स् v.t.--- मागे लोटणे. n.--- निवारण, थप्पड.
repulsive रिपल्सिव्ह् a.--- निवारक, तुटक, अप्रसन्न. त्रासदायक, किळसवाणा, नकोसा.
reputable रेप्युटेबल् a.--- प्रतिष्ठित, अब्रूचा.
reputation रेप्युटेशन् = Repute (n.)
repute रेप्यूट् n.--- लौकिक, अब्रू, ख्याति.