Snu-Soj

Snub स्नब् v.t.--- धमकावणे, दटावणे, चापणे. n.--- दटावणी, धमकी, झिडकारा. Snub nosed --- नकटा.
Snuff स्नफ् v.t.--- हुंगणे, कोजळी झाडणे. Snuff out --- मालविणे, नाहीसा करणे. n.--- तपकीर, कोजळी
Snuffers स्नफर्स् n.--- कोजळी झाडण्याची कातर.
Snuffle स्नफल् v.i.--- नाकांत बोलणे, गुणगुणणे. हुंगणे. n.--- गेंगणे, बोलणे, सूंसूं. Snuffles --- नाकाचे चोंदणे.
Snug स्नग् v.i.--- कुशीत चिकटून निजणे. a.--- चिकटलेला. प्रशस्त.
Snuggle स्नगल् v.t./v.i.-- बिलगून बसणे, बिलगणे. जवळ घेणे. v.i.--- अंगाची गुंडाळी करून पडून राहणे. कुणाच्या / कशाच्या तरी आश्रयाने टेकणे / आरामात स्थिरावणे / बसणे. (Snuggle up-)to --- ला बिलगणे / बिलगून बसणे /चिकटणे. v.t.--- -ला आलिंगणे / मिठीत घेणे / अंगाशी / जवळ घेणे.
So सो ad.--- असा, इतका, म्हणून, तसा, त्याप्रमाणे, मग, तसा, अत्यंत. conj.--- जर. Interj --- बस्स! पुरे.
Soak सोक् v.t.--- भिजत पडणे, भिजविणे, शोषून जाणे, मुरणे.
Soap सोप् n.--- साबण, साबू. दैनंदिन जीवनांतील व्यक्तींचे चित्रण असलेली (मालिकाबद्ध) नाट्यकृति. v.t.--- साबू लावणे.
Soap-box सोप्-बॉक्स्
Soap-opera सोप्-आॅपरा n.--- (रेडियो, टेलिव्हिजन इ. मधील) ठरीव चाकोरीतील नाट्य.
Soap-suds सोप् - सड्स् n.--- साबणाचे (वापरलेले) पाणी.
Soar सोअर् v.i.--- उडणे, उंच जाणे. n.--- उड्डाण, भरारी.
Sob सॉब् v.i.--- स्फुंदणे, हुंदका येणे. n.--- स्फुंदन, हुंदका.
Sob-story सॉब्-स्टोरी n.--- अतिशयोक्तिपूर्ण करुणकथा.
Sobbingly सॉबिंग्लि ad.--- हुंदके देऊन.
Sober सोबर् v.i.--- अंमल उतरणे, शुद्धीवर येणे. a.--- अंमल न आलेला, बेताने मद्य पिणारा, सावध, विचारी, थंड, शांत, गंभीर.
Sobriety सोब्राइटि n.--- मितपणा, सावधपणा, मर्यादाशीलता, गाआंभीर्य.
Sobrique सोब्रिके n.--- उपनाम, टोपणनाव, पदवी, किताब.
Soccer सॉकर् n.--- पाय किंवा डोके वापरून चेंडूने खेळायचा एक सांघिक खेळ.
Sociability सोशॅबिलिटी n.--- स्नेहभाव, मैत्रीभाव, मनमिळाऊपणा.
Sociable सोशिएबल् a.--- सोबतीचा भुकेला, स्नेहप्रिय, संगतिप्रिय.
Social सोशल् a.--- स्नेहाचा, संगतीचा, मनमिळाऊ, सामाजिक.
Socialism सोशलिझम् n.--- सर्व व्यवहारांत समाजाचे नियंत्रण असलेली व्यवस्था / तत्सबंधींची विचारसरणी.
Socialist सोशलिस्ट् n.--- समाजसत्तावादी. a.--- ‘Socialism’ चा / विषयक / स्वरूपाचा.
Socialistic सोशलिस्टिक् a.--- = Socialist (a.).
Society सोसायटी n.--- सहभाव, संगति, मंडळी, समाज.
Sock सॉक् n.--- पायमोजा.
Socket सॉकिट् n.--- खाच, खोबण. कोंदण. (See ‘niche’).
Sod सॉड् n.--- गवताळ जमीन, गवतासह मातीचे ढेंकूळ.
Soda सोडा n.--- एक क्षार, सोडा, कापोत.
Sodden सॉड्न् a.--- (पाणी / दारू इ. मुरून) फुगलेला, झिंगलेला, गलितगात्र.
Sodium सोडिअम् n.--- रुपेरी रंगाचे धातुरूप मूलद्रव्य. (रसायनशास्त्रांतील संक्षिप्त नाव : ‘S’).
Sodium bicarbonate सोडिअम् बाय्कार्बनेट् n.--- खाण्याचा सोडा.
Sodium chloride सोडिअम् क्लोराइड् n.--- समुद्राच्या पाण्यात / खनिज-मिठात नैसर्गिकपणे असणारे, घनरूपात स्वाभाविकतया स्फटिकाकार, एक रासायनिक संयुग. मीठ.
Sodomite सॉडमाइट् n.--- ‘Sodomy’ ची विकृति जडलेला.
Sodomize सॉडमाइझ् v.t.--- -वर ‘sodomy’ चा प्रयोग करणे.
Sodomy सॉडमी n.--- अनैसर्गिक (विशे. दोन पुरुषांतील) संभोग.
Sofa सोफा n.--- कोच, मंचक.
Soft सॉफ्ट् a.--- मऊ, नरम, मंजुळ, भुसभुशीत, बिलबिलीत. ad.--- सावकाश, बेताने. interj.--- हं! थांब.
Soften सॉफन् v.t.--- मऊ / नरम करणे / होणे, पाझरणे, द्रवाविणें, विरघळणे.
Softly सॉफ्ट्लि ad.--- हळू, मंजुळ स्वराने.
Softness सॉफ्ट्नेस् n.--- मऊपणा, मंजुळपणा.
Soggy सॉगी a.--- पाण्याने भरलेला, ओलाचिंब, जलाप्लावित .
Soil सॉइल् v.t.--- -ला मळविणे, -ला डागाळणे / कळकट करणे. n.--- मळ, माती, देश. कचरा. रुजण्याचे माध्यम.
Soiree स्वारे n.--- सायंकालीन सहभोजन, संध्याभोजन.
Sojourn सॉर्जन् v.i.--- (अल्प / तात्पुरत्या मुक्कामास) राहणे. n.--- (अल्प, तात्पुरता) मुक्काम.
Sojournment सॉर्जन्मेंट् n.--- मुक्काम.