Mit-Mon

Mite माइट् n.--- सुतेरा, कीड, सुतळीचा तोडा.
Miter माय्टर् = Mitre
Mitigate मिटिगेट् v.t.--- हलका करणे, शमविणे.
Mitigation मिटिगेशन् n.--- उतार, उपशमन.
Mitochondria मायटकॉन्ड्रिअ n.--- जीवपेशींतील केंद्राव्यतिरिक्त द्रव्यातील प्रथिने, वसा, इ. अनेक रासायनिक द्रवयांनी बनलेले ऊर्जोत्पादक सूक्ष्म (एकदशलक्षांश मिलीमीटर वा कमी व्यासाचे) कण.
Mitre माय्टर् n.--- ‘बिशप’ ने विशेष प्रसंगी घालायचा एक प्रकारचा मुकुट / टोपी / टोप.
Mittimus मिट्टिमस् n.--- कैद्यास तुरुंगात घालण्याचे वारंट.
Mix मिक्स् v.t.--- मिसळणे, ढवळणे, गोंधळ करणे.
Mixture मिक्श्चर् n.--- मिश्रण, मिसळ, भेळ, संकर.
Mizzle मिझल् v.i.--- बुरबुर (पाऊस) पडणे / लागणे. n.--- कोंडे पाऊस, बुरबुर.
Mnemonic निमॉनिक् a.--- स्मृतिसाहाय्यकारी, स्मरणशक्तिविषयक. n.--- स्मृति जगविण्याची युक्ति.
Moan मोन् v.i.--- सौम्य कण्हणे, कुंथणे. n.--- हामहूम, हवळणे, (सौम्य) कण्हण्या/कुंथण्या-चा आवाज.
Moat मोट् n.--- खंदक, चर. v.t.--- सभोवती चार खणणे.
Mob मॉब् n.--- दंगेखोर मंडळी. v.t.--- गर्दी करणे.
Mobile मोबाइल् a.--- हालणारा, चंचल.
Mobile phone / Mobile telephone मोबाइल् फोन् / मोबाइल् टेलिफोन् n.--- कोठेही घेऊन जाण्याजोगे बिनतारी दूरध्वनि-/दूरभाष- यंत्र. फिरता दूरध्वनि / दूरभाष, भ्रमणध्वनि.
Mobilize मोबिलाईझ् v.t.--- लढाई करताना सैन्य तयार करून ठेवणे. a.---
Mock मॉक् v.t.--- वेडावणे, थट्टा करणे, हासणे, फसवणे. a.--- खोटा, कुचाळ, नकली, कृतक, तोतया. n.--- थट्टा, टवाळी.
Mockery मॉकरि n.--- कुचाळी, टवाळी, उपहास.
Mockingbird मॉकिंग्बर्ड् n.--- U.S.A. च्या दक्षिण भागांतील, अन्य पक्ष्यांची आवाजाची नक्कल करणारा एक पक्षी.
Mode मोड् n.--- रूप, आकार, रीत, परिपाठ, प्रकार.
Model मॉडेल् v.t.--- बनवणे. n.--- नमुना, सांचा, प्रतिमा, प्रतिरूप.
Modem मोडेम् n.--- माहितीच्या सांकेतिक स्वरूपांत स्थानांतरणमाध्यमाच्या सोयीसाठी ‘modulate’ - ‘demodulate’- क्रियांदवारा आलटापालट करून, एका संगणकांतील माहिती दूरध्वनि (telephone) माध्यमाने दुसऱ्या संगणकास पाठविणारे संगणकास जोडलेले यंत्र.
Moderate मॉडरेट् a.--- नेमस्त, माफक, मर्यादित, बेताचा, थोडा, सौम्य, समतोल. v.t.--- नेमस्त करणे, समतोल/सौम्य/संयमित करणे.
Moderation मॉडरेशन् n.--- नेमस्तपणा, काटकसर, मर्यादा.
Moderator मॉडरेटर् n.--- वादातील मध्यस्थ, नियंता, संयंता.
Modern मॉडर्न् a.--- आधुनिक, अर्वाचीन, नवीन.
Modest मॉडेस्ट् a.--- मर्यादशील, परिमित, पतिव्रता, नम्र, विनीत, शांत.
Modesty मॉडेस्टि n.--- मर्यादा, निरभिमान, पतिव्रत्य, शालीनता.
Modicum मॉडिकम् n.--- अल्प मात्रा . प्रमाण.
Modification मॉडिफिकेशन् n.--- रूपांतर, धाटणी.
Modify मॉडिफाय् v.t.--- रूप फिरविणे, नेमस्त करणे.
Modish मोडिश् a.--- दरबारी चालीचा, नखरेल, डौलीपणाचा.
Modular मॉड्यूलर् a.--- ‘Module’ चा, ‘Module’ रचित.
Modulate मॉड्युलेट् v.t.--- स्वर काढणे, खाचखोच घेणे, स्वर / विद्युतलहरी / ध्वनिलहरी कमी-जास्त करणे / बदलणे / जुळवणे. काटाछाट करून नियंत्रणात ठेवणे, लगाम लावणे, -चे नियंत्रण करणे.
Module मॉड्यूल् n.--- (विवक्षित रचनेचा / संघटनेचा / यंत्रणेचा)(प्रमाणित) घटक. तळ, अड्डा.
Modus मोडस् n.--- पद्धति, पद्धत, रीत.
Moiety मॉइटि n.--- अर्धुक, अर्धाभाग, निमाई.
Moil मॉइल् v.i.--- लिडबिडने, काबाडकष्ट करणे.
Moist मॉइस्ट् a.--- ओलसर, दमसर, दमट, आर्द्र.
Moisten मॉइसन् v.t.--- ओलावणे, ओलसर करणे.
Moisture मॉइश्चर् n.--- ओलावा, ओलसरपणा, आर्द्रता.
Molar मोलर् a.--- रगडण्याचा, दळण्याचा.
Molasses मलॅसिझ् n.--- काकवी, मळी.
Mold = Mould
Mole मोल् n.--- बंधारा, धक्का, अंगावरचा तीळ, डाग, दोष. चिचुंद्री.
Molecule मॉलिक्यूल् n.---
Molest मो(म)लेस्ट् v.t.--- उपद्रव / पीडा / त्रास / इजा देणे, अंधारात / गुपचुप काम / कारस्थान करणे. कामुकतेने -ला उपद्रव देणे, -वर हात टाकणे, -शी लगट/अतिप्रसंग करणे, -चा विनयभंग करणे, -ची छेड काढणे.
Molestation मो(म)लेस्टेशन् n.--- उपद्रव, अतिप्रसंग, विनयभंग.
Mollify मॉलिफाय् v.t.--- मऊ करणे, शांत करणे.
Mollusk मॉलस्क् n.--- मऊ अंगाचा सकवच प्राणी.
Molly coddle मॉलिकॉड्ल् v.t.--- -ची / -चे अति सेवा /शुश्रूषा / लाड करणे, चोचले पुरविणे. n.--- स्वतःचे चोचले पुरवून घेणारा, चोचलेबाज. लाडावलेला, लाड्या.
Molotov cocktail मॉलटॉफ् कॉक्टेल् n.--- (द्वितीय जागतिक महायुद्धातील रशियन अधीकारी Molotov याच्या नावाने प्रसिद्ध) पेट्रोल आदी ज्वालाग्राही द्रव, चिंध्या इ. बाटलीत भरून बनविलेला (गावठी) विध्वंसक अस्रगोळा.
Molten मोल्टन् a.--- ओतीव, रस केलेला, उष्णतेने वितळलेला.
Moment मोमेन्ट् n.--- क्षण, पळ, वजन, महत्व.
Momentary मोमेन्टरि a.--- क्षणभंगुर, क्षणिक.
Momently मोमेन्ट्लि ad.--- क्षणोक्षणी, प्रतिक्षणी.
Momentous मोमेन्टस् a.--- भारी, वजनाचा, मोठा, ऐतिहासिक, उल्लेखनीय, अर्थपूर्ण.
Momentum मो(म)मेन्टम् n.--- चालण्याचा वेग / जोर, वस्तूचे वस्तुमान (भार) आणि वेक यांचा गुणाकार - अशा गुणाकारानुसार त्या वास्तूतील शक्ति / प्रभाव. आघातशक्ति.
Monarch मॉनर्क् n.--- राजा, सत्ताधीश, पादशाहा.
Monarchism मॉन(र्)किझम् n.--- एक राजाची सत्ता पुरस्कारणारी पद्धति / व्यवस्था (हिंदी: राजतंत्रवाद).
Monarchist मॉन(र्)किस्ट् n.--- ‘Monarchism’ चा पुरकर्ता. (हिंदी : राजतंत्रवादी)
Monarchy मॉनर्की n.--- एकराजसत्ता, एका राजाने शासित राज्य / राष्ट्र.
Monastery मॉनस्टेरी n.--- मठ, आश्रम, तपोभूमि.
Monastic मनॅस्टिक् a.--- तपाचरणाचा, उपासनाजीवनाचा.
Monday मन्डे n.--- सोमवार, इंदुवार.
Monetary मॉ(/म)निटरि a.--- पैशाआडक्याचा, द्रव्यरूपी, चलनसंबंधी.
Money मनि n.--- पैसा, पैका, दाम, द्रव्य.
Moneyed मनिड् a.--- पैकेवाला, धनिक.
Moneyless मनिलेस् a.--- निर्धन, धनहीन.
Moneymaking मनिमेकिंग् n.--- द्रव्यार्जन, द्रव्यसंपादन.
Monger मन्गर् n.---व्यापारी. v.t.--- वयापारी करणे.
Mongrel मंग्रल् / मंग्रेल् a.--- संकर जातीचा, भेळीचा, संकरप्रभव. n.--- संकरोद्भव प्राणी (विशे. कुत्रा).
Monism मॉनिझम् n.--- अद्वैतसिद्धांत, अद्वैतवाद. सृष्टीचे मूलतत्व एकच मानणारी विचारसरणी.
Monist मॉनिस्ट् n.--- Monism चा अनुयायी / पुरस्कर्ता, अद्वैतवादी.
Monistic मॉनिस्टिक् a.--- अद्वैतविषयक.
Monition मोनिशन् n.--- ताकीद, इशारत, बातमी.
Monitor मॉनिटर् n.--- शिक्षक, मंत्री, उपदेशक. विशिष्ट काम / प्रक्रिया / हालचाल यांवर लक्ष ठेवणारी व्यक्ति / यंत्र. शिक्षकास वर्ग चालवितांना शिस्त-/व्यवस्था -पालनावर लक्ष ठेवून साहाय्य करणारा विद्यार्थी. इष्ट माहिती दाखविणारा संगणकाचा काचेचा पडदा / पट. अतिशय मोठ्या पाली-/घोरपडी-/सरड्या- सारखा एक प्राणी. v.t.--- -वर लक्ष ठेवणे, -चे लक्षपूर्वक नियंत्रण करणे.
Monk मन्क् n.--- मठवासी, जोगी, बैरागी, मुनि, व्रतस्थ, धर्मप्रचारक.
Monkey मंकी n.--- वानर, माकड, कपी, मोगरा.
Monochromatic मोनोक्रोमॅटिक् a.--- = Monochromic.
Monochrome मॉनोक्रोम् n.--- एकाच रंगाने काढलेले चित्र / आकृति. एकवर्णता.
Monochromic(al) मॉनोक्रोमिक्(-कल्) a.---एक रंगाचा, एकरंगी. एकाच रंगाने काढलेला / बनवलेला. एका आवर्तनमानांचे (प्रकाशकिरण इ.) काळ्या-पांढऱ्या रंगाचा, श्वेत-श्याम.
Monochromous मॉनोक्रोमस् a.--- = Monochromic
Monochromy मॉनोक्रोमी n.--- ‘Monochrome’ ची कला / विद्या.
Monocle मॉनकल् n.--- एका डोळ्यापुरता चष्मा / चष्म्याचे भिंग.
Monoculous मोनॉक्युलस् a.--- एकडोळ्या, एकाक्ष.
Monody मॉनोडी n.--- एकाने म्हणावयाचे शोकगीत.
Monogamy मोनॉगमी n.--- एकपत्नीव्रत, एकभार्याव्रत.
Monogram मोनोग्रॅम् n.--- चित्ररूप नाव / ओळखीची खूण; खुणेची अक्षरे जोडून बनवलेले / छापलेले चिन्ह, नाममुद्रा.
Monograph मोनोग्रॅाफ् n.--- एक विशिष्ट वस्तु / विषयावरील पुस्तकर निबंध. विवेचनात्मक लेख / ग्रंथ.
Monopolist मोनोपॉलिस्ट् n.--- मक्ता घेणारा.
Monopolize मोनॉपोलाइझ् v.t.--- मक्ता / साठा घेणे.
Monopoly मोनॉपोलि n.--- मक्ता, खोटी, एकाधिकार.
Monosyllable मोनोसिलेबल् n.--- एकाक्षरी शब्द.
Monseigneur मोंसेन्यर् n.--- श्रेष्ठ दर्जाच्या माणसास लावण्याचे उपपद, ‘महाराज’.
Monsieur मस्य(र्) श्रीयुत. ‘महाशय’(संबोधन) (pl. Messieurs मेस्यज्).
Monsoon मॉन्सून् n.--- पावसाळा, पाऊसकाळ. वर्षाकाल, पर्जन्यकाल, मेघकाल.
Monster मॉन्स्टर् n.--- राक्षस, ध्यान, भयंकर प्राणी. a.--- जंगी, राक्षसी, प्रचंड.
Monstrous मॉन्स्ट्रस् a.--- विजातीय, विलक्षण, विकृताकार, विरूप, विद्रूप, अक्राळविक्राळ, प्रचंड, अगडबंब. अतिमूर्खपणाचा, गाढवपणाचा.
Montage मॉन्टाज् n.--- अनेक (छाया-)चित्रांची (एक) (चित्र-)मालिका. विविध प्रसंगांवर आधारलेली एक कथा / निवेदन. विविध चित्रांचे / प्रसंगांचे अशा रीतीने संपादन करण्याची पद्धति.
Month मन्थ् n.--- महिना, मास (संस्कृत ‘मुंथ’ पासून)
Monthly मन्थ्लि a.--- महिन्याचा, मासिक. ad.--- दरमहा.
Monument मॉन्युमेंट् n.--- थडगे, स्मारक, छत्री.
Monumental मॉन्युमेंटल् a.--- आठवणुकीचा, थडग्याचा; भव्य, प्रचंड.