Rife राइफ् a.--- चालता, जोराचा, सामान्य, विपूल, दाट, पूर्ण. सर्वत्र पसरलेला / वेगाने पसरत चाललेला. सर्वव्यापी, दाटलेला.
Riff-raff रिफ्राफ् n.--- क्षुद्र मनुष्य, हलक्या दर्जाचा माणूस; गावगन्ना लोक, बाजारबुणगे; टाकाऊ सामान, रद्दी माल.
Riffle रिफल् v.t. / v.i.--- घाईने हाताळणे.
Rifle रायफल् v.t.--- नामविणे, लुटणे. n.--- बंदूक. Rifle (through) v.t.--- धुंडाळणे, झडती / शोध घेणे.
Rift रिफ्ट् v.t.--- चिरणे, फाडणे, छेदणे. n.--- भेग, चीर, छेद.
Rig रिग् (up, with) v.t.--- सज्ज करणे, सजवणे. फसविणे, ठकविणे; फसवणुकीने / लबाडीने घडवून आणणे, बनवाबनवीने / अप्रामाणिक कारस्थानांनी बिघडविणे. n.--- पोषाख, चेष्टा. भूमीत छिद्र पाडण्याची साधनसामग्री.
Right राइट् a.--- खरा, बरोबर, सुरळीत, उजवा, उजव्या बाजूचा. ad.--- ठीक, नीट, बरोबर. n.--- न्याय, उजवी बाजू, सत्ता, मालकी. v.t.--- ताळ्यावर आणणे, सुधारणे, बरोबर करणे.
Right angle राइट् अॅङ्गल् n.--- ९० अंशाचा कोण / कोन. काटकोन / काटकोण.
Right-angled राइट् अॅङ्गल्ड् a.--- काटकोन - युक्त. (eg. Right-angled triangle).
Righteous राइचस् a.--- नीतिमान, पुण्यशील, नीतीचा. सात्विक, सत्वगुणोत्पन्न, सदाचारी.
Righteousness राइचस्नेस् n.--- खरेपणा, रास्तपणा, नेकी, सदाचार.
Rightful राइट्फुल् a.--- हक्काचा, रास्त, खरा.
Rigid रिजिड् a.--- खरमरीत, जालीम, ताठ, सक्त.
Rigidity रिजिडिटि n.--- जालीमपणा, ताठरपणा.
Rigmarole रिग्मारोल् n.--- गडबडगुंडा, अकडंतकडं.
Rigor रायगॉर् / रिगर् n.--- अचानक झालेली शीतबाधा.
Rigor mortis रिग(र्) / रायगॉ मॉर्टिस् n.--- मृत्यूनंतर मृतदेहांतील स्नायूंस येणारा तात्पुरता ताठरपणा, मृत्युदार्ढ्य.
Rigorism रिगरिझम् n.--- ताठरपणा, तत्वनिष्ठता.
Rigorist रिगरिस्ट् n.--- करडा तत्वनिष्ठ.
Rigour रिगर् n.--- करडेपणा, सक्ति.
Rigourist रिगरिस्ट् = Rigorist.
Rile राइल् v.t.--- ढवळणे, ढवळून गढूळ / दाट करणे. डिवचणे, सतावणे. Rile (up) --- क्रुद्ध होणे.
Rimy राइमी a.--- हिमपातयुक्त, हिमसंकुल. (हिंदी : बर्फीला).
Ring रिंग् n.--- आंगठी, चक्र, वेढे, वलय, मथ, रंगण, घेरा, पूट, कूट, झणत्कार, ठणठणाट, घणघणाट. दूरध्वनीवरून आलेली हाक, संदेश, सूचना, दूरध्वनिसंदेश. कडी. v.t.--- वाजविणे, अंगठी / कडी घालणे / वाजणे.
Ringleader रिंग्लीडर् n.--- (गुन्हेगारांचा) म्होरक्या, पुढारी.
Ringlet रिंग्लेट् n.--- झुलूप, लहान कडी.
Ringworm रिंग्वर्म् n.--- गजकर्ण, नायटा, दद्रु.
Rinse रिन्स् v.t.--- धुणे, खळबळणे.
Riot रायट् v.i.--- (हिंसक / हिंसायुक्त) दंगा / गर्दी / धुमाळी करणे. n.--- दंगा, धामधूम. To read out the Riot Act to --- -ला दुर्वर्तन ना थांबविल्यास शिक्षेची / कारवाईची ताकीद देणे.
Riotous रॉयटस् a.--- दंग्याचा, गर्दीचा, दंगेखोर.
Rip रिप् v.t.--- फोडणे, उस्तरणे, फाडणे, ओढून काढणे. n.--- पाजी / हलकट माणूस.
Ripe राइप् a.--- पिकलेला, प्रौढ, पक्का, परिपूर्ण.
Ripen राइपन् v.i.--- पिकणे, पिकवणे, गाभुळणे.
Ripple रिपल् v.i.--- खळखळ वाहणे, लाटा उसळणे, खळखळणे. n.--- खळखळ, पिंजणी, पिंजाणी, फणी, खळबळ.
Rise राइझ् v.i.--- वर जाणे, वॉर चढणे, तरंगणे, उंच वाढणे, उभा राहणे, उदय पावणे, चढण लागणे, भाव चढणे, आठवण होणे, हाती येणे, सजीव होणे, बरखास्त होणे, बंड करणे. n.--- उत्थान, चढती कळा, उदय, उत्कर्ष, आरंभ, वाढ, भरती, उथळ, वणचण.
Riser राइझर् n.--- उठणारा, निजून उठणारा.
Risible रिझिबल् a.--- हास्यकारक / हास्यजनक, हसणारा.
Rising रायझिंग् a.--- चढणारा, चढत्या कलेचा, उदयोन्मुख, होतकरू. n.--- उत्थान, उठणे, श्रेष्ठत्व, बंड, उत्कर्ष.
Risk रिस्क् v.t.--- धोक्यात घालणे. n.--- धोका, भय.
Risque रिस्के a.--- अश्लीलप्राय, असभ्य, चावट, फाजील, पाचकळ, चहाटळ, वात्रट.
Rite राइट् n.--- विधि, संस्कार, व्रत, अनुष्ठान.
Ritual रिच्युअल् a.--- संस्काराचा. n.--- संस्कार / शास्त्रविधि.
Rival राय्व्हल् v.t.--- स्पर्धा करणे. n.--- प्रतिस्पर्धा.
Rivalry राय्व्हल्रि n.--- स्पर्धा, मत्सर, सापत्नभाव, सापत्न्य. (पहा: envy).
Rive राइव्ह् v.t.--- चिरणे, छेदणे, फोडणे, तडकणे, फाटणे.
River रिव्हर् n.--- नदी.
Rivet रिव्हेट् v.t.--- खिळवून ठेवणे / टाकणे. खिळ्यांनी जोडणे, न हालेसा करणे, वळवणे. n.--- दोन्ही टोकांनी बोळवलेला खिळा.
Rivulet रिव्युलेट् n.--- ओढा, नाला, ओहळ.