Hydrate हाइड्रेट् n.--- पाणी एक घटक असलेले रासायनिक संयुग. v.t.--- -ला पाण्याच्या संयुगात रूपांतरित करणे / पाण्याशी संयुक्त करणे. पहा: ‘dehydrate’.
Hydration हाइड्रेशन् n.--- पाण्याशी संयुक्त करण्याची प्रक्रिया. पहा: ‘dehydration’
Hydro- / Hydr- हैड्रो / हैड्र पाणी, द्रव, स्त्राव, हायड्रोजन (hydrogen) इत्यादि अर्थी लागणारे उपपद.
Hydrocarbon हैड्रोकार्बन् n.--- ‘Hydrogen’ व ‘Carbon’ यांचे संयुग. (या प्रकारची संयुगे हा ‘Organic’ Chemistry’ या रसायनशास्त्रशाखेचा विषय.)
Hydrogen हायड्रोजन् n.--- उज्ज(न) (वायु). रासायनिक संक्षिप्त संज्ञा: ‘H’.
Hydrophobia हाय्ड्रोफोबिअ n.--- कुत्र्याच्या चावण्यामुळे येणारी मानसिक विकृति; जलसंत्रास, रसभीति.
Hyena / Hyaena हायीना n.--- तरस.
Hygiene हाय्जीन् n.--- आरोग्यशास्त्र. (आरोग्यार्थ आवश्यक) स्वच्छताशास्त्र.
Hygrograph हायग्रोग्रॅफ् n.--- हवेतील आर्द्रतेमधील बदल नोंद करणारे स्वयंचलित यंत्र.
Hygrometer हायग्रोमीटर् n.--- हवेतील आर्द्रता मोजणारे यंत्र. आर्द्रतामापक.
Hygroscopic हायग्रोस्कोपिक् a.--- आर्द्रतेबाबत संवेदनशील.
Hymen हाय्मेन् n.--- (कुमारिकेच्या) योनिमार्गातील श्लेष्मल त्वचा.
Hymn हिम् n.--- स्तोत्र, स्तव, भजन.
Hype हाइप n.--- अति प्रसिद्धि, अति बोलबाला, गाजावाजी, अतिरंजित प्रचार. स्तोम, बनवाबनवी. v.i.--- ‘Hype’ च्या रूपांत सांगणे / मांडणे. -ला अतिरंजित रूप देणे.
Hyperbole हाइपर्बोली n.--- अतिशयोक्ति (अलंकार), अतिरंजितता, भडकपणा.
Hypercritic हायपर्क्रिटिक् n.--- चिकित्साखोर.
Hypermetropia हाइपर्मेट्रोपिया n.--- दीर्घदृष्टित्व, दीर्घदृष्टिदोष.
Hypermnesia हायपर्मनीझा n.--- एकाएकी उद्भवणारे स्मरण अत्यंत तीव्र / व्यापक / अद्भुत स्मरणशक्ति.
Hyperopia = Hypermetropia
Hyphen हाय्फन् n.--- लेखनांतील अक्षरे, अंक, शब्द इ. मधील वेगळेपण किंव्हा जोड (संयोग) दाखविणारी ‘-’ अशी खूण / विरामचिन्ह.
Hypnosis हिप्नोसिस् n.--- निद्रापन, कृत्रिमपणे आणलेली निद्रा, संमोहन.
Hypnotic हिप्नॉटिक् a.--- कृत्रिम निद्राजनक.
Hypnotise / Hypnotize हिप्नॉटाइझ् v.t.--- भुरळ घालणे. v.i.---
Hypnotism / Hypnotizm हिप्नॉटिझम् n.--- संमोहनशास्त्र, मोहिनीविद्या. = Hypnosis.
Hypo- हायपो / हिपो खालचा, उणा, कमी, मंद, क्षीण, इ. अर्थाचे उपपद.
Hypochondria हायपकॉन्ड्रिअ n.--- स्वतःच्या आरोग्याबद्दलची विकृत (अति-) चिंता. स्वतःची प्रकृति बिघडल्याचा मनोविकार. (ज्ञात) कारण मानसिक-विषण्णता.
Hypochondriac हायपकोन्ड्रिअॅक् n.--- ‘Hypochondria’ चा विकार जडलेली व्यक्ति.
Hypocrisy हिपॉक्रिसी n.--- ढोंग, दंभ, बकध्यान.
Hypocrite हिपक्रिट् n.--- ढोंगी, दांभिक, भोंदू.
Hypocritical हिपक्रिटिकल् a.--- ढोंगीपानाचा, खोटा, अप्रामाणिकपणाचा, भोंदूगिरीचा.
Hypodermic हैपडर्मिक् a.--- कातडीखालील भागाशी संबंधित. n.--- कातडीखालील भागाशी टोचण्याचे औषध, असे औषध टोचण्याची पिचकारी.
Hypothalamus हायपथॅलमस् a.--- मुख्य मेंदूखाली असणारे भावभावना / शरीरतापमान चे नियंत्रण करणारे इंद्रिय.
Hypothermia हाइपथर्मिया n.--- शरीराचे आत्यंतिक थंड होणे. शारीरिक तापमानाची असाधारण घसरण.
Hypothesis हायपॉथिसिज् n.--- विश्लेषण / विचार यासाठी / वादार्थ (वादासाठी) तात्पुरता मांडलेला सिद्धांत. कच्चे प्रमेय परीक्षणीय गृहीतकृत्य. अनुमान, कल्पना(विलास), संभावना, अटकळ, ठोकताळा, अनुमानधपका.
Hypoxia हायपॉक्सिआ / हिपॉक्सिआ n.--- प्राणवायूचा अपुरा पुरवठा.
Hysterectomy हिस्टेरेक्टमी n.--- गर्भाशयच्छेदन, गर्भाशय काहून टाकण्याची शस्त्रक्रिया.
Hysteria हिस्टेरिया / हिस्टीअरिआ n.--- आंकडी येणे, फेफरे, स्त्रियांस होणारी एक प्रकारची वायुबाधा.
Hysteric हिस्टीरिक् n.--- फेफरे / आकडी चा विकार असलेला माणूस.
Hysterical हिस्टीरिकल् / हिस्टेरिकल् a.--- फेफरे किंव्हा आकडी चा विकार जडलेला.
Hysterics हिस्टेरिक्स् n.--- फेफरे किंव्हा आंकडीचा अथवा अनिवार हसू वा रडू येण्याचा झटका.