Feud फ्यूड् n.--- किलह, हाडवैर, भांडण, मोकासा, कुटंबकलह.
Feudal a.--- जहागिरीचा, मोकाशाचा.
Feudary n.--- मोकासदार, जहागिरदार.
Fever n.--- ताप, ज्वर.
Feverish a.--- अंग मोडून आलेला.
Few a.--- कांही थोडे, थोडके.
Fewness फ्यूनेस् n.--- अल्पता, थोडकेपणा.
Fey फे a.--- आसन्नमरण.
Fez फेझ् n.--- गोंड्याची तांबडी मोगली टोपी.
Fiance फिआन्से / फिअँसे / फिऑंसे n.--- नियोजित वर, वाङ्निश्चय झालेला नवरा मुलगा.
Fiancee फिआन्से / फिअँसे / फिआँसे n.--- नियोजित वधू ,वाङ्निश्चय झालेली (नवरी - ) मुलगी.
Fiasco फियास्को n.--- फज्जा, विचका, फजिती.
Fiat फायट् n.--- आज्ञा, हुकुम.
Fibफिब् n.--- लबाडी, थाप v.i.--- खोटे बोलणे थाप, थापा मारणे.
Fibre फायबर् n.--- तंतु, शीर(पानाची).
Fibrosis फायब्रॉसिस् n.--- शरीराच्या अवयवाचे तंतूमध्यें परिवर्तित होऊन क्षीण होण्याचा रोग.
Fibula फिब्यूला n.--- गुडघ्यापासून घोट्यापर्यंतच्या भागातील दोन हाडांपैकी बाहेरच्या बाजूचे (लहान) हाड. [pl.: fibulae / fabulas]
Fickle फिकल् a.--- चंचल, क्षणिकचित्त.
Fickleness फिकल्नेस् n.--- चंचलपणा, चंचल बुद्धि.
Fiction फिक्शन् n.--- कंडी, थोतांड, कादंबरी.
Fictitious फिक्टीशस् a.--- कल्पित, बनावट, खोटा.
Fictive फिक्टिव्ह् (a.)--- fictitious
Fiddle फिडल् n.--- सारंगी v.t.--- सारंगी वाजविणे, रिकामे चाळे करणे.
Fiddler फिड्लर् n.--- सारंगीवाला, सारंगी वाजविणारा.
Fidelity फायडेलिटी n.--- ईमानीपणा, प्रामाणिकपणा.
Fidget फिजेट् v.i.--- चुळबुळणे, n.--- चुळबुळ
Fidget with फिजेट् विथ् v.i.--- ०शी चाळा करणे.
Fidgety फिजेटी a.--- अस्वस्थ, चुळबुळ्या, वलवल्या, बेचैन.
Fie फाय् int.--- छी! छी! छी! छत! शिव शिव!
Fief फीफ् n.--- जहागीर, मोकासा.
Field फील्ड् n.--- क्षेत्र, शेत, पटांगण, खेळातील क्षेत्र रक्षण करणारा पक्ष / बाजू, बंदिस्त जागेबाहेरील (उघडे) मैदान, विशिष्ट कार्य- / अभ्यास - विषय, अशा विषयाचा / कामाचा / अधिकाराचा / प्रभावाचा विस्तार / आवाका, पार्श्वभूमि v.i.--- (क्रिकेट इ. खेळात) ‘फील्डर् (क्षेत्ररक्षक) म्हणून काम करणे v.t.--- ०ची प्रवक्ता, खेळाडू म्हणून निवड करणे, (प्रश्न इ.) ०चा सामना करणे. In the field कार्यालय किंवा प्रयोगशाळा इ. पासून दूर. To take the field कार्यक्षेत्रात / मैदानात काम / मोहीम प्रारंभिणे.
Field day फील्ड् डे n.--- फायदा / यश कमाविण्याची संधी, सैनिकांचा रणभूमिकार्याचा अभ्यास
Fielder फील्डर् n.--- (क्रिकेट इ. मध्येे) मैदानात चेंडू झेलणे / पकडणे / आडविणे / फेकणे इ.कामे करणाऱ्या संघाचा घटक-खेळाडू.
Fielding फील्डिंग् n.--- (क्रिकेट इ. खेळातील) क्षेत्ररक्षण
Field-Marshal फील्ड् मार्शल् n.--- सेनेतील सर्वोच्च पद, या पदावर नियुक्त अधिकारी
Field-officer फील्ड्-आॅफिसर् n.--- एक लष्करी कामदार.
Field-piece फील्ड्-पीस् n.--- बरोबर नेण्यासारखी लहान तोफ.
Field-produce फील्ड्-प्रोड्यूस् n.--- शेतपीक, जिराईत.
Fiend फीण्ड् n.--- भूत, राक्षस, पिशाच्च, झपाटलेली व्यक्ति, वेडावलेली व्यक्ति.
Fiendish फीण्डिश् a.--- राक्षसी, क्रूर, घोर.
Fierce फिअर्स् n.--- क्रूर, प्रखर, कडक, भयंकर, उग्र.
Fiery फायरी a.--- आगीचा, तापट, जाज्वल्य, तल्लख.
Fiesta फिएस्टा n.--- (धार्मिक) मेजवानी, [लंगर (हिंदी)] महाप्रसाद.