hap-haz

hap हॅप् n.--- दैव, अद्दृष्ट, प्रारब्ध, दैवगति.
haphazard हॅप्हॅझड् a.--- बेशिस्त, अव्यवस्थित, अस्ताव्यस्त.
happen हॅपन् v.i.--- घडणे, घडून येणे.
happiness हॅपिनेस् n.--- सुख, आनंद, खुशाली.
hapless हॅप्लेस् a.--- दुर्दैवी, कमनशीबी, अभागी.
happy हॅपि a.--- सुखी, आनंदी, यशस्वी, धन्य, कुशल, समर्थ, मंगल.
harangue हॅरॅन्ग् v.t.--- वक्तृत्वपूर्ण / अलंकारिक / जोराचे भाषण. असे भाषण / लिखाण करणे.
harass हॅरॅस् v.t.--- जेरीस आणणे, गांजणे, त्रास देणे.
harbinger हार्बिन्जर् n.--- पुढले तयारीचा, खटपट्या, अग्रदूत, पूर्वचिन्ह.
harbour हार्बर् v.t. and v.i.--- -ला आश्रय देणे/धरणे, -ला धारण करणे, काही वेळ राहणे, तुफानापासून बचाव करणे, आश्रय घेणे. n.--- बंदर, आश्रय, थारा.
hard हार्ड् a.--- कठीण, निबर, बळकट, जुलमाचे, गूढ, कडक,निर्घृण, दयाहीन, जोरदार, प्रखर, सक्त.
harden हार्डन् v.t.--- कठीण करणे, सुदृढ करणे.
hardhanded हार्ड्हॅन्डेड् a.--- कद्रु, लोभी, कवडीचुंबक.
hardly हार्ड्ली ad.--- कष्टाने, क्वचित, संकटाने.
hardness हार्ड्नेस् n.--- कणखरपणा, दृढता.
hardship हार्ड्शिप् n.--- संकट, ओझे, हाल, दुःख.
hardware हार्ड्वेअर् n.--- लोखंडी / पितळी सामान.
hardworking हार्ड्वर्किंग् a.--- कष्टाळू, काटक, मेहनती.
hardy हार्डि a.--- बळकट, कणखर, धीट, काटक.
hare हेअर् n.--- ससा. Hare-brained - उफराट्या काळजीचा, चंचल बुद्धीचा, साहसी. अतिसाहसीपणाचा, अविवेकाचा, बेफाम.
harem हेरम् n.--- जनानखाना, रंगमहाल, अन्तःपुर, राणीबशा.
hark हार्क् int.--- ऐक! ऐका. n.--- मृगया, कोलाहल. v.t.--- -ला कान देणे, ऐकणे. v.i.--- (to) herken. H. back --- गेलेल्या मार्गाचे परतून मुलाचा मार्ग शोधणे, परत फिरणे. स्मरणे / स्मरण करविणे. H. on, forward --- -ला पुढे जाणेस प्रेरणा देणे. “आगे बढो” ची घोषणा देणे.
harlequin हार्लिक्विन् n.--- विदूषक, हंडीबाग.
harlot हर्लॉट् n.--- शिंदळ/छिनाल बायको, रांड.
harm हार्म् v.t.--- अन्याय करणे, उपद्रव देणे. n.--- अन्याय, नुकसानी, उपद्रव, अपराध.
harmful हार्म्फुल् a.--- उपद्रवी, बाधक, दुष्ट.
harmonica हार्मोनिका n.--- जलतरंग.
harmonious हार्मोनियस a.--- सुसंवादी (स्वरसमुच्चय इ.), सुसंगत. मेळ बसणारा / बसविणारा.
harmonium हार्मोनियम् n.--- बाजाची पेटी.
harmonize हार्मोनाइझ् v.t.--- and v.i.--- सूर जमविणे / जमणे.
harmony हार्मनी n.--- मेळ, मिलाफ, ऐक्य, एकवाक्यता, ताळमेळ, मैत्री, सुसंगती, सुसंवाद, सुरचना, सुरेखपणा.
harness हार्नेस् n.--- गाडीच्या घोड्याचा सरंजाम.
harp हार्प् v.i.--- घोकणे, जपमाळ घेणे, वीणा वाजविणे. H. on the same string : कंटाळवाणी पुनरुक्ति करीत राहणे.
harpoon हार्पून् n.--- मासा/मगर मारण्याची बरची. v.t.---
harpy हार्पी n.--- स्त्रीरूपांतील पंख व नखे असलेला क्रूरकर्मा दुष्टशासक राक्षस. ‘Harp on (the same string)’ :
harridan हॅरिडन् n.--- कजाग, खाष्ट स्त्री, त्राटिका.
harrow हॅरो n.--- दांता, इंगा. v.t.--- (‘harrow’ च्या सहाय्याने) (जमीन, मार्ग,इ.)चुरा करणे, फाडणे. ओरबाडणे, इह्जा करणे, पीडा / यातना देणे.
harry हॅरी v.t.--- -वर हल्ले चढविणे, उध्वस्त करणे. छळणे, जाच करणे.
harsh हार्श् a.--- कठोर, निष्ठुर, खरबरीत, आंबट.
harshness हार्श्नेस् n.--- कर्कशपणा, आंबटाई.
hart हार्ट् n.--- हरीण. Hart’s horn n.--- हरणाचे शिंग.
harvest हार्वेस्ट् n.--- कापणीची वेळ, सुगी, पीक, उत्पन्न, फलित, उपज, श्रमाचे फलित, परिश्रमापासून झालेला लाभ. v.t.--- (पीक, उपज, निसर्गसम्पत्ति, लाभ, इ.) काढणे / काढून घेणे / पदरात घेणे / हस्तगत करणे.
hash हॅश् v.t.--- चोंचावून तुकडे करणे. n.--- पुनरावृत्ति. काला, चुथडा.
hasp हास्प् n.--- (दाराची / झाकणाची कोयंड्यात (staple) अडकवण्याची) कडी.
hassle हॅसल् n.--- वाद, तंटा, समस्या, घोळ, छालाणूक, सतावणूक, कटकट. v.--- वाद घालणे, घोळ घालणे, तंटा मांडणे, -ची छालाणूक करणे, सतावणे, पिडणे.
haste हेस्ट् n.--- घाई, त्वरा, जलदी, धांदल, निकड.
hasten हेसन् v.t.--- घाई/जलदी करणे, वश करणे, वेग देणे.
hasty हेस्टी a.--- जलदॆचा उतावळा, तापट, हूड.
hat हॅट् n.--- उभी टोपी. At the drop of a hat:
hat-trick हॅट्-ट्रिक् n.--- चेंडूफळी (क्रिकेट) च्या खेळांत एकाच गोलंदाजाने केलेला, पाठोपाठ तीन फलंदाजांस बाद करण्याचा विक्रम. अशाच प्रकारचे एकाने तीन सलगपणे मिळविलेले विजय.
hatch हॅच् v.t.--- n.--- (वाट म्हणून वापरण्याचे जमिनीवरील / जहाजावरील) छिद्र / भोक; पळवाट.
hatchet हॅचेट् n.--- लहान कुऱ्हाड, परशु. ‘bury the hatchet’: युद्ध / भांडण थांबविणे. ‘take’ or ‘dig up the hatchet’: युद्धास / भांडणास प्रारंभ करणे; संघर्षास उभे राहणे.
hate हेट् v.t.--- द्वेष करणे/ठेवणे. n.--- द्वेष, वैर, दावा.
hateful हेट्फुल् a.--- खल, दुर्जन, द्वेष्टा.
haughtiness हॉटिनेस् n.--- गर्व, दिमाख, आढ्यता.
haughty हॉटि a.--- मगरूर, गर्विष्ठ, दिमाखाचा.
haul हॉल् n.--- ओझे वाहून नेण्याचे काम, अवजड काम. अशा कामात काटावयाचे अंतर. साठवलेला / प्राप्त केलेला ऐवज / माल. v.t.--- ओढणे, ओढून नेणे, खेचणे. haul up: v.t.--- अधिकाऱ्यासमोर / न्यायासनासमोर (जबाब देण्यासाठी इ.) नेणे.
haum हॉम् n.--- धान्याचे ताट / पेरे / जुडगा.
haunch हॉन्च् n.--- मांडी, कमरेचा खवाटा, मांड.
haunt हॉन्ट् v.t.--- फेरी घालणे, येणेजाणे करणे. वावर करणे, वावरणे (भूत, पिशाच्च, इत्यादींचे), भंडावणे, सतावणे, अस्वस्थ करणे.
haute ओट् a.--- अहंकारी, अहमंध, उद्धट, मगरूर.
hauteur होटोर् / ओटS(र्) n.--- वर्चस्व, वरचढपणा, तापट अहंभाव, औद्धत्य, ऐट, रुबाब.
have हॅव् v.t.---
haven हेव्हन् n.--- बंदर, नांगरवाडा, आश्रय, वसतिस्थान, आधार, सुरक्षित / संरक्षित (आधार- / आश्रय-) स्थान. उदा: Tax-haven.
haversack हॅवरसॅक् n.--- खांद्यावर / पाठीवर बांधावयाची पोतडी / तरटाची पिशवी.
havoc हॅव्हॉक् n.--- कत्तल, अनर्थ, धूळघाण, प्रलय.
hawk हॉक् n.--- बहिरीससाणा. आक्रमक / लढाऊ वृत्तीचा/ जहाल आसामी/व्यक्ति. पहा: ‘Dove’, ‘Falcon’. v.t.--- शिकार करणे. v.i.--- फेरीने माल विकणे, खादरून काढणे, खाकरणे.
hawker हॉकर् n.--- फेरीवाला.
hay हे n.--- वाळवलेले गवत.
hayride हेराइड n.--- वाळलेले गवत असलेल्या गाडीत बसून, गंमत/मजा म्हणून फिरायला जाणे.
haywire हेवायर् n.--- गोंधळ, गुंतागुंतीची / किचकट गोष्ट, बट्ट्याबोळ. To go haywire: गोंधळात पडणे.
hazard हॅझर्ड् n.--- जोखीम, भय, धोका.
haze हेझ् n.--- वातावरण धूसर करून टाकणारी धूळ, वाष्प, धूर आदींची गर्दी/प्रसार. आकलनातील धूसरता / अस्पष्टता / अंधुकता / अनिश्चितता.
hazy हेझी a.--- धूसर, अंधुक, अस्पष्ट, अनिश्चित.