Sil-Sim

Silence सायलेन्स् v.t.--- उगे राहणे. n.--- मौन, शांतता. interj.--- चप्प! गप्प!
Silent सायलेन्ट् a.--- उगा, मौनी, मुका.
Silently सायलेन्टलि ad.--- मुकाट्याने, गपचीप, शांतपणे, निमूट, उगी.
Silhouette सिलूएट् n.--- एखाद्या वस्तूची बाह्यरेषांमध्ये सर्व काळा रंग (अंधार) भरून चित्रित केलेली आकृति. हलक्या रंगाच्या पृष्ठभूमीवर चित्रित बाह्याकृति. v.--- ‘silhouette’ च्या रूपांत किंवा समान दर्शविणे.
Silica सिलिका n.--- खडकामधील एक खनिज दरवाय (सिलिकॉनचे ऑकसाइड) (SiO2).
Silicate सिलिकेट् n.--- सिलिसिक ऍसिडच्या प्रक्रियेने बनलेला क्षार.
Silicic सिलिसिक् a.--- सिलिकापासून बनविलेले. Silicic acid : H4SiO4
Silicon सिलिकॉन् n.--- पृथ्वीमध्ये विपुल प्रमाणात सापडणारे (बहुशः : Silica च्या रूपात) एक अधातु मूलद्रव्य. (Si). इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील अत्यावश्यक द्रव्य (विशुद्ध केलेले).
Silicosis सिलिकॉसिस् n.--- सिलिका-भुकटीमुळे होणारा पुप्फुसाचा रोग.
Silk सिल्क् n.--- रेशीम, रेशमाचे कापड.
Silk-worm सिल्क्-वर्म् n.--- रेशमाचा किडा.
Silken सिल्कन् a.--- रेशमाचे.
Sill सिल् n.--- चौकटीची खालची बाजू, उंबरठा. दार, खिडकी इ. च्या चौकटीच्या तळाचा भाग.
Silliness सिलिनेस् n.--- खुळेपणा, भोळेपणा.
Silly सिलि a.--- खुळा, भोळा.
Silt सिल्ट् n.--- प्रवाहासह वाहात जाऊन साचलेला मातीचा / बारीक वाळूचा गाळ. v.--- अशा गाळाने भरून जाणे; Silt up with --- गाळात तुंबणे / तुंबविणे.
Silver सिल्व्हर् n.--- रुपे, चांदी. a.--- रुप्याचा, रुपेरी, चांदीचा. v.t.--- रुप्याचा मुलामा देणे, रुपेरी करणे.
Silver jubilee सिल्व्हर् n.--- पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा वाढदिवस समारंभ / उत्सव. रजत-जयंती (-समारोह).
Sima सायमा n.--- पृथवीच्या कवचाचा सागरतळाशी असणारा भाग.
Simia सिमिअ n.--- (प्राण्यांचा) वानरवर्ग (विशे. पुच्छहीन) या वर्गातले प्राणी. (pl.--- ‘simiæ’ सिमिई).
Simial सिमिअल् a.--- = Simian (a.).
Simian सिमिअन् a.--- ‘Simia’ चा / -संबंधीचा /-जातीचा /-सदृश /-विशिष्ट. n.--- वानर, माकड.
Similar सिमिलर् a.--- सादृश्य, समता.
Similarity सिमिलॅरिटि n.--- सादृश्य, समता.
Simile सिमिलि a.--- दृष्टांत, उदाहरण, दाखला, उपमा, तुलना. उपमालंकार.
Similitude सिमिलिट्यूड् n.--- सारखेपणा, दृष्टांत, उपमा.
Simious सिमियस् a.--- = Simian.
Simmer सिमर् v.t.--- चरचरणे, मंदाग्नीवर शिजविणे, उकळत्या तप्तावस्थेत स्फोटाच्या बेतात असणे. खदखदणे.
Simper सिम्पर् v.i.--- गालांत हसणे, वरकरणी हांसणे. वेडपट / कृतक स्मित (करणे).
Simperingly सिम्परिंग्लि ad.--- खुळचटपणे / वरकरणी स्मित करीत.
Simple सिम्पल् a.--- साधा, सरळ, भोळा, केवळ, शुद्ध.
Simple-minded सिम्पल् माइन्डेड् a.--- भावार्थी, निष्कपट.
Simpleton सिम्पल्टन् a.--- मोळवट.
Simpliciter सिम्प्लिसिटर् ad.--- निव्वळ, शुद्ध, निखळ.
Simplicity सिम्प्लिसिटि n.--- सरळपणा, भोळेपणा, साधेपणा.
Simultaneous सायमल्टेनिअस् a.--- एकेकाळीच, एककालीन, समकालीन.
Simply सिम्प्ली ad.--- निखालस, फक्त.
Simulate सिम्युलेट् v.t.--- -चे सोंग आणणे, -चा आव आणणे, -ची बाह्य लक्षणांनी नक्कल करणे, कृत्रिम अनुकरण करणे, कृतक भूमिका वठविणे. (अभ्यास / प्रयोग / पडताळा इ. साठी) (विशिष्ट प्रत्यक्ष स्थिती) चे कृत्रिक (प्रति-)-रूप उभे करणे. Simulated सिम्युलेटेड् a.--- कृतक, नकली, सोंगाडेपणाचा.
Simulator सिम्युलेटर् n.--- (अभ्यास /प्रयोग / पडताळा इ. साठी) प्रत्यक्षवस्तुस्थितीचे कृत्रिमपणे प्रतिरूप उभारणारी यंत्रणा.