U-Una

U : ‘Uranium’ चे रासायनिक संक्षिप्त नांव.
U-turn यू-टर्न् n.--- बरोबर उलट दिशेला घेतलेले वळण, व्यावर्तन, व्यावृत्ति. ‘To take a U-turn’ --- असे वळण / व्यावर्तन घेणे.
U.K. United Kingdom चे संक्षिप्त रूप. युरोपखंडाच्या वायव्यभागांतील एक राष्ट्र.
Ubiquitary युबिक्विटरि a.--- विश्वव्यापक.
Ubiquity युबिक्विटि n.--- विश्वव्याप्ति.
Udder अडर् n.--- ओटी, कास. (जनावराचे / पशूचे) स्तन.
Ugliness अग्लीनेस् n.--- कुरूपता.
Ugly अग्ली a.--- कुरूप, ओंगळ, बेडौल.
Ulcer अल्सर् n.--- (चिघळत जाणारे) क्षत / व्रण.
Ulcerate अल्सरेट् v.i.--- क्षत / व्रण पडणे.
Ulna अल्ना n.--- कोपरापासूनच्या पुढील हाताचे मोठे हाड.
Ulnar अल्नर् a.--- ‘Ulna’ -चा / -विषयक / -संबंधित.
Ultimate अल्टिमेट् a.--- अंतिम, शेवटचा.
Ultimatum अल्टिमेटम् n.--- अंतिम / अखेरचा / शेवटचा / चरम / निर्वाणीचा समज / तंबी / ताकीद / संधिसंदेश / धमकी / धमकावणी / इशारा. चरमाभिसंधि.
Ultra- अल्ट्र prefix.--- -च्या पलीकडील / पुढील / पेक्षा अधिक - अशा अर्थाचे शब्दांतील पूर्वपद.
Ultra vires अल्ट्र व्हायरीज् a.--- विधी (कायद्या) च्या घटनेच्या (संविधानाच्या) पलीकडील: म्हणजेच कायद्याचे / घटनेचे उल्लंघन करणारा. अधिकारातीत, अवैध, घटनाबाह्य. असंवैधानिक.
Ultramarine अल्ट्रॅमरीन् a.--- समुद्रापलीकडचा.
Ululate अल्यूलेट् / युल्यूलेट् v.i.--- (आनंदाने / शोकाने) आरोळ्या मारणे, आक्रोशणे, आकांत करणे.
Ululation अ(यु)ल्युलेशन् n.--- आरोळी, आक्रोश, क्रंदन, किंचाळी.
Umbilic अम्बिलिक् n.--- सभोवती समान बाक असलेला बाकदार पृष्ठभागावरील (नाभिसदृश / बेंबीसारखा) (केंद्र-)बिंदु.
Umbilical अम्बिलिकल् a.--- नाभि- / बेंबी- चा /-संबंधीचा /-संलग्न. गर्भातून / स्त्रीकडून (मातेकडून प्राप्त) नाभि-आकाराचा. केंद्रास्थित, केंद्रीय.
Umbilical cord अम्बिलिकल् कॉर्ड् n.--- नाळ, नाळसदृश अवयव.
Umbilicus अम्बिलाय्कस् / अम्बिलिकस् n.--- नाभि, बेंबी, नाभिसदृश केंद्र.
Umbra अंब्रा n.--- सावली, छाया.
Umbrage अंब्रेज् n.--- रुसवा,अनादर. छाया. To take umbrage --- रुसणे, रागावणे.
Umbrageous अंब्रेजस् a.--- छायेचा.
Umbrella अंब्रेला n.--- छत्री.
Umpire अम्पायर् n.--- मध्यस्थ, तिऱ्हाईत, पंच, लवाद.
Unable अनेबल् a.--- असमर्थ, अशक्त, अक्षम.
Unacceptable अन्अॅक्सेप्टेबल् a.--- नामंजूर, अग्राह्य.
Unaccompanied अन्अकम्पनीड् a.--- संगतीवाचून असलेला, एकाकी.
Unaccomplished अन्अकॉम्प्लिश्ड् a.--- अपूर्ण राहिलेले, अडाणी.
Unaccountable अन्अकाउन्टेबल् a.--- गूढ, कारण सांगता न येणारा.
Unaccustomed अन्अकस्टम्ड् a.--- अनभ्यस्त.
Unacquainted अन्अॅक्वेन्टेड् a.--- गैरमाहीत, अनोळखी.
Unadvised अन्अॅड्व्हाइस्ड् a.--- अदूरदर्शी, उतावळा.
Unamiable अन्एमिएबल् a.--- तुसडा, घुम्या.
Unanimity युनॅनिमिटि n.--- ऐक्य, एकदिल.
Unanimous युनॅनिमस् a.--- सर्वसंमत, मतैक्याचा.
Unanimously युनॅनिमस्ली ad.--- एकमताने.
Unarmed अन्आर्म्ड् a.--- शस्त्र नसलेला, निःशस्त्र.
Unascertained अन्अॅसर्टेन्ड् a.--- निर्णय ना लागलेले, अनिश्चित.
Unasked अन्आस्क्ड् a.--- अयाचित, अनिमंत्रित.
Unassuming अनस्यूमिंग् a.--- विनम्र, निरहंकारी, अमानी, निगर्वी, अनुद्धत.
Unattached अन्अटॅच्ड् a.--- सुटा, मोकळा.
Unattended अन्अटेन्डेड् a.--- चाकर माणसे नसलेला, सडा.
Unauthorized अन्आॅथराइझ्ड् a.--- सनद / हुकूम नसलेला
Unavailing अन्अव्हेलिंग् a.--- निरर्थक, निष्फळ.
Unavoidable अन्अव्हॉइडेबल् a.--- ना निवारण करिता येणारे.
Unawares अनवेअ(र्)ज् ad.--- अकस्मात, एकाएकी, नकळत, अकल्पितपणे.